वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ११/१ पृ. १५-१९
  • “जोराचा यत्न करा”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “जोराचा यत्न करा”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही आत्ताच “झटले” पाहिजे
  • “अरूंद दरवाजा”ने का
  • येशूच्या शब्दांचा तुमच्यासाठी कोणता अर्थ होतो?
  • पायनियरींग करता येण्यासाठी तुम्ही यत्न करू शकाल का?
  • शक्य आहे तेवढे सर्व तुम्ही करता का?
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • पायनियर सेवा—तुम्हाला ती जमेल का?
    आमची राज्य सेवा—१९९८
  • पाहिजेत—४,००० सहायक पायनियर तुम्ही मार्च, एप्रिल वा मे महिन्यांत सहायक पायनियरींग करू शकाल का?
    आमची राज्य सेवा—१९९७
  • पायनियर सेवेचे वरदान
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ११/१ पृ. १५-१९

“जोराचा यत्न करा”

“अरूंद दरवाजाने आत जावयाला जोराचा यत्न करा कारण मी तुम्हास सांगतो की, पुष्कळ लोक आत जावयास पाहतील. परंतु त्यांच्याने जाववणार नाही.”—लूक १३:२४.

१. बहुतेकांठायी कशाची इच्छा आहे?

सहा वर्षांच्या रॉबीला विचारा की त्याला राज्य सभागृहात जायला का आवडते, तो म्हणेल की, “मला तेथे यहोवा देव आणि नंदनवन याबद्दल शिकायला मिळते. मला या नंदनवनात चांगल्या प्राण्यासोबत खूप काळपर्यंत खेळायला व जिवंत राहायला मिळेल.” त्याचा तीन वर्षांचा चुलत भाऊ डस्टीन याला त्याच्या आईवडीलांची नित्यक्रम ठाऊक आहे. वेळ झाली की तो सुद्धा म्हणतो, “मला राज्य सभागृहात जायचे आहे!” रॉबीने जे म्हटले व डस्टीन जे बोलण्याचा प्रयत्न करीत आहे ते पुष्कळांना अपीलकारक वाटेल—जीवन, सार्वकालिक जीवन. लोकांना “तारणप्राप्ती”ची इच्छा आहे. पण ते कसे शक्य आहे? नुसत्या धार्मिक उपासनेला उपस्थित राहण्याने का?

२. (अ) तारण प्राप्त करून का घेता येऊ शकत नाही? (ब) तारणासाठी काय करणे जरूरीचे आहे असे येशूचे लूक १३:२४ मधील शब्द सांगतात?

२ सभेला उपस्थित राहून किंवा कोणा अन्य मार्गाद्वारे तारणाची प्राप्ती करता येऊ शकत नाही. ते मोफत असून देवाकडील देणगी आहे. तरीपण देवाकडील हे सार्वकाळच्या जीवनाचे बक्षीस मिळावयाचे आहे तर त्यासाठी तो आम्हाकडून काही हालचाल अपेक्षून आहे. (रोमकर ६:२३) ती काय आहे? यापैकीची एक आहे, त्याच्या सेवेतील जोराचा यत्न! ही हालचाल खऱ्‍या रसिकतेने उद्‌भवली पाहिजे. एका माणसाने एकदा देवाचा पुत्र येशू ख्रिस्ताला विचारले: “प्रभुजी, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय?” येशूने आपल्या उत्तरात केवळ प्रश्‍नकर्त्याचा नव्हे तर तारणाविषयक आस्थेवाईक असणाऱ्‍या इतर सर्वांचा व आमचाही समावेश केला. त्याने म्हटले: अरूंद दरवाजाने आत जावयाला जोराचा यत्न करा. कारण मी तुम्हास सांगतो की, पुष्कळ लोक आत जावयास पाहतील परंतु त्यांच्याने आत जाववणार नाही.”—लूक १३:२३, २४.

३. (अ) त्या माणसाचा प्रश्‍न असाधारण का होता? (ब) येशूने त्याच्या उत्तरात आमचा सुद्धा कसा समावेश केला?

३ त्या निनावी माणसाचा प्रश्‍न असाधारण होता. त्याने ‘तारणप्राप्ती होत असलेल्या थोड्या लोकात मी आहे का?’ किंवा ‘माझे कसे तारण होईल’ असे न विचारता “तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय?” असे विचारले. कदाचित त्या माणसाला, केवळ थोड्या लोकांना तारण मिळणार असे यहुदी तत्वज्ञान माहीत असावे व यामुळेच कदाचित तो प्रश्‍न त्याने विचारला असावा.a या प्रश्‍नाचा उगम कसला असला तरी येशूने त्या प्रश्‍नाला तात्विक साच्यातून बाहेर काढून त्याविषयीचा व्यवहारिक अवलंब—व्यक्‍तीगत अवलंब स्पष्ट केला. त्याने प्रश्‍न विचारणाऱ्‍याला तारणाकरता त्याने स्वतः काय करणे जरूरीचे आहे त्याचा विचार करायला लावले. यापेक्षा अधिक म्हणजे, “जोराचा यत्न करा” हे येशूचे शब्द अनेकवचनी असल्यामुळे त्यांनी आम्हाला, आमच्या उपासनेच्या पद्धतीसंबंधाने गंभीर विचार करायला लावले पाहिजे.

४. सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी आम्ही काय केलेच पाहिजे?

४ अशाप्रकारे सार्वकालिक जीवन, कित्येकांना वाटते तसे, मिळविणे सोपे नाही. येशूने याकरता परिश्रम, “अरूंद दरवाज्याने आत जावयाला” सातत्याचे प्रयत्न करावेत असे म्हटले. या अविश्रांत परिश्रमाला टिकाऊ विश्‍वास, ख्रिस्ताच्या शिक्षणास आज्ञांकित राहणारा विश्‍वास याचे पाठबळ आहे. यास्तव तारण मिळविण्यासाठी ‘त्याची वचने ऐकण्या’पेक्षा अधिक केले पाहिजे. याकरता त्याप्रमाणे ‘कृति करण्यासाठी’ स्वतःला पुढे सरसावले पाहिजे.—लूक ६:४६–४९; याकोब १:२२–२५.

तुम्ही आत्ताच “झटले” पाहिजे

५. (अ) “जोराचा यत्न करा” या येशूच्या शब्दांचा काय अर्थ होतो? (ब) ते शब्द आमच्या पवित्र सेवेच्या दृष्टीकोणाला कोणता अधिक अर्थ देतात?

५ “जोराने यत्न करा” या संज्ञेचा काय अर्थ होतो? मूळ ग्रीक भाषेत ती संज्ञा अ.गो.नी’झे.स्थे अशी आहे. ती (अ.गॉन’) या शब्दापासून निर्मित असून त्याचा अर्थ “स्पर्धेची जागा” असा होतो. द किंग्डम इंटरलिनियर ट्रान्स्लेशन येथे “झटा” हा शब्द टाकते. याच ग्रीक शब्दापासून आम्हाला “अगोनायझ्‌” हा शब्द मिळतो हे मनोरंजक आहे. तर आता एखाद्या प्राचीन काळच्या आखाड्यात कोणा खेळाडूची बक्षीस प्राप्ती साठी केवढी तळमळ होत आहे किंवा तो आपले सर्वस्व पणाला लावून केवढा झटत आहे याचे चित्र समोर उभे करा. अशा प्रकारे येथे ज्या ग्रीक शब्दाचा संबंध आला आहे तो ग्रीसमधील खेळासाठी वापरला जाणारा तांत्रिक शब्द असला तरी येशूने अंतःकरणापासून कृति करा या दिलेल्या सूचनेच्या महत्वावर तो जोर देतो.—लूक १०:२७; पडताळा १ करिंथकर ९:२६, २७.

६. आम्ही आत्ताच जोराचा यत्न का केला पाहिजे?

६ “अरूंद दरवाजाने आत जाण्यासाठी” कधी व किती काळाकरता ‘झटले’ पाहिजे? (लूक १३:२४ द न्यू इंग्लीश बायबल) आता येशूच्या लूक १३:२४ मधील शब्दांकडे लक्ष द्या आणि त्याने “जोराचा यत्न करा” व “जावयास पाहतील” यातील वर्तमानकालीन व भविष्यकालीन क्रियेचा भेद कसा स्पष्ट केला ते लक्षात घ्या. याकरवी सूचित होते की झटण्याचा काळ आत्ताचा आहे. जे आपल्या सोयीस्कर वेळेप्रमाणे आत जाण्याचा प्रयत्न करतील त्यांना प्रवेश नाकारण्यात येईल. तेव्हापर्यंत खरे पाहता, खूप उशीर झाला असेल आणि संधि समाप्त होऊन द्वार बंद झालेले असणार. त्यामुळेच येशू लूक १३:२५ मध्ये पुढे म्हणतो की, “एकदा घरधन्याने उठून दार बंद केले म्हणजे लोक बाहेर उभे राहून दार ठोकून म्हणतील, ‘प्रभूजी, आम्हास उघडा.’ तेव्हा तो त्यांना उत्तर देईल: ‘तुम्ही कोठले आहा हे मला माहीत नाही.’” यहोवा देवाच्या भक्‍तिला जे आता प्राधान्य देत नाहीत त्यांच्यासाठी केवढा वाईट प्रसंग थांबून आहे!—मत्तय ६:३३.

७. फिलिप्पैकर ३:१२–१४ प्रयत्न सातत्याने होण्यास हवा हे कसे सूचित करते व हे का जरूरीचे आहे?

७ आमचे झटणे ही नित्याची गोष्ट आहे. “अरूंद दरवाजा”तून आम्ही कोणीही आतापर्यंत पूर्णपणे प्रवेश मिळविलेला नाही. पौलाला याची जाणीव होती. त्याची जीवनाची धाव प्रतिदिवशी पराकाष्ठेची होत होती. त्याने लिहिले: “मी इतक्यात मिळविले, किंवा इतक्यात मी पूर्ण झालो असे म्हणत नाही. तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्‍यात घेतले ते मी आपल्या कह्‍यात घ्यावे म्हणून मी त्याच्या पाठीस लागत आहे. बंधुजनहो, मी अद्यापि ते आपल्या कह्‍यात आणले असे मानीत नाही. तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टीकडे लक्ष लावून ख्रिस्त येशू मध्ये देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचा पण जिंकण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे धावतो.” (तिरप्या अक्षराकचे वळण आमचे.)—फिलिप्पैकर ३:१२–१४.

८. (अ)सार्वकालिक जीवनापासून ‘पुष्कळांना’ कशामुळे रोकले जाते? (ब) हे आमच्यासाठी कोणता इशारा प्रतिध्वनित करते?

८ ते “पुष्कळ” कोण आहेत व यांना आता का जाता येत नाही? हे “पुष्कळ” ख्रिस्ती धर्मराज्याशी संबंधित आहेत, खासपणे त्याचा धर्मपुढारी गट आहे. ते येशूला निकटपणे ओळखतात, त्याच्या बरोबर ‘खाणे पिणे’ करीत असल्यामुळे त्याच्या कुटुंबापैकीचे भाग आहोत असा त्यांचा दावा आहे. तरीपण त्यांना देवाच्या नव्हे तर स्वतःच्या पद्धतीने तारण हवे असल्यामुळे येशू त्यांच्याविषयीची ओळख साफ नाकारतो व त्यांना ‘अधर्म करणारे’ असे म्हणतो. (लूक १३:२६, २७) दार बंद करण्यात आल्यामुळे ज्यांचा प्रवेश सार्वकालिक जीवनाकरता नाकारला गेला त्यामध्ये यहोवाच्या पवित्र सेवेत शिथिल बनणारे आणि खऱ्‍या उपासनेच्या बाबतीत ‘सारे काही चालू शकते’ असा दृष्टीकोण राखणाऱ्‍यांचाही समावेश राहील. त्यांची राज्याविषयीची आस्था कोमट झालेली असते. (प्रकटीकरण ३:१५, १६) त्यांच्याठायी सुभक्‍तीचे स्वरूप म्हणजे नाममात्र क्षेत्र सेवा व नाममात्र सभांची उपस्थिति या गोष्टी असतील पण खऱ्‍या उपासनेसाठी प्रेरक असणारी शक्‍ती, खरा विश्‍वास याची मात्र उणीव राहील. (पडताळा २ तिमथ्यी ३:५) “अरूंद दरवाज्याने” आत जाण्याचा नुसता प्रयत्न करणे पुरेसे नाही हे त्यांना कळत नाही. आत शिरण्यासाठी त्यांनी झटायला हवे असते.

“अरूंद दरवाजा”ने का

९. अरूंद दरवाजाने प्रवेश मिळविण्याकरता जोराचा यत्न का जरूरीचा आहे?

९ तारणाचा अरूंद दरवाजा सर्वांसाठी खुला आहे. तरीपण त्यामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी ‘पुष्कळांना’ झटणे आवडत नाही. ज्याकरता एवढ्या जोराचा यत्न करावा लागतो त्या अरूंद दरवाज्यात शिरण्याविषयी काही विशिष्ट गोष्टीं कोणत्या आहेत? याकरता प्रथम पवित्र शास्त्र सत्याचे ज्ञान त्या व्यक्‍तिने संपादून यहोवा देव व येशू ख्रिस्त यांजविषयीची ओळख प्राप्त करून घेतली पाहिजे. (योहान १७:३) याचा अर्थ होतो की जागतिक धर्म व शिवाय ख्रिस्ती धर्मराज्याचे सर्व संप्रदाय व प्रथा यांना त्या व्यक्‍तीने दूर भिरकावले पाहिजे येशूने पृथ्वीवर असताना केले त्याप्रमाणे त्याने देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास हवे. (१ पेत्र २:२१) समर्पित व बाप्तिस्मा घेतलेला शिष्य या नात्याने त्याने जडवाद, अनैतिकता व या जगाचा अशुद्धपणा टाळावा. (१ योहान २:१५–१७; इफिसकर ५:३–५) यांना काढून टाकून ख्रिस्तठायी असणारे गुण परिधान करण्यास हवे.—कलस्सैकर ३:९, १०, १२.

१०. सार्वकालिक जीवन मिळण्याच्या गोष्टीसोबत आत्मसंयमनाचा कोणता संबंध आहे?

१० त्या ‘थोड्या’ लोकांना उपाध्यपणातील आवेश, आत्म्याच्या फलप्राप्तीचे व खासपणे आत्मसंयमनाचे प्रदर्शन याविषयीचे महत्व माहीत आहे. (गलतीकर ५:२३) देवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीने आपला हात पुढे सारून सार्वकालिक जीवनाच्या ध्येयाप्रत धावण्याच्या रोखाने स्वतःच्या शरीराला पुढे रेटत आहेत.—१ करिंथकर ९:२४–२७.

येशूच्या शब्दांचा तुमच्यासाठी कोणता अर्थ होतो?

११. (अ) जीवनातील कोणत्या क्षेत्रात काहींना जोराचा यत्न करण्याची गरज आहे व का? (ब) मात्र कोणत्या कामात सर्वांनाच जोराचा यत्न करता येईल?

११ आम्ही बाप्तिस्मा घेतलेले नवीन लोक आहोत किंवा यहोवाच्या संस्थेबरोबर मिळून कित्येक दशके क्रियाशील राहिलेली माणसे आहोत, देवास संतुष्ट करण्याच्या आमच्या प्रयत्नामध्ये शिथिलता उत्पन्‍न होता कामा नये. येशूचे शब्द अगदी साधेपणात दाखवितात की आम्ही यहोवास व्यक्‍त करीत असलेल्या निष्ठेत पूर्ण हृदयी असण्यास हवे आणि अरूंद दरवाजाने कोणाही किंमतीवर प्रवेश करण्याची इच्छा धरली पाहिजे. येथे येशू देवाच्या सेवेत आमच्याकडून अपेक्षित असणारी वाढ आणि सुधारणा याविषयीची चर्चा करीत नव्हता तरीपण आमच्यामध्ये काहींना आपला स्वभाव सुधारण्याच्या बाबतीत आणि आम्हातील वाईट सवयापासून दूर होण्यासाठी जोराचा यत्न झाला पाहिजे ते यासाठी की आम्ही स्वतःला ‘अडखळण्याचे कारण बनवू देऊ नये’ (२ करिंथकर ६:१–४) आमच्यापैकी इतरांनी व्यक्‍तिगत अभ्यासाच्या कार्यक्रमाच्या बाबतीत कसोशीने लक्ष देण्याचे अगत्य आहे म्हणजे ‘अचूक ज्ञान व पूर्ण समज याबाबतीत आमची प्रीती वाढत राहील. (फिलिप्पैकर १:९–११) आणखी काहींना मंडळीच्या सभा व खासपणे मंडळीच्या पुस्तक अभ्यासाकरता नियमितपणे उपस्थित राहून सहभागी होण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील. (इब्रीयांस १०:२३–२५) आम्हातील प्रत्येक जण सुद्धा स्वतःच्या क्षेत्र कार्याकडे कटाक्ष टाकून पाहू शकतो की “सुवार्तिकाचे काम” करण्यात आम्ही खरेपणाने किती जोराचा यत्न करीत आहोत.—२ तिमथ्यी ४:५.

१२. आमच्या आध्यात्मिक यत्नाची पातळी तपासून पाहण्यासाठी आम्ही कोणते प्रश्‍न विचारावेत?

१२ यहोवा देवाला संतुष्ट करण्यामध्ये जोराचा यत्न राखल्यामुळेच पुष्कळांना साहाय्यक पायनियर, नियमित पायनियर आणि बेथेल कार्यकर्ते ही ध्येये गाठता आली. तुमच्याबद्दल काय? तुम्ही राज्य प्रचारक आहात तर वर्षातून अनेकदा तुम्हाला साहाय्यक पायनियर सेवा करणे जमेल का किंवा नियमित पायनियर होता येईल का? तुम्ही साहाय्यक पायनियर आहात नियमित पायनियर बनण्याचे ध्येय बाळगून आहात का? नाही, तर तसा विचार का राखू नये? याकरवी यहोवा देव व येशू ख्रिस्त यांच्यासोबत जवळचे नातेसंबंध जोपासण्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळू शकेल.—स्तोत्र संहिता २५:१४.

पायनियरींग करता येण्यासाठी तुम्ही यत्न करू शकाल का?

१३. (अ) तुम्हाला पायनियर व्हावयाचे आहे तर कोणत्या दोन गोष्टी महत्वपूर्ण आहेत? (ब) पायनियर बनण्यासाठी जीवनातील कोणत्या क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज भासेल?

१३ तुम्हाला नियमित पायनियर होण्याची संधि आहे पण ते होता येत नाही तर तुम्हाला तुमच्या जीवनात थोडेफार बदल करण्यासाठी “झटता” येईल का म्हणजे पायनियर बनता येईल? याकरता दोन गोष्टींची जरूरी आहे. पहिली, तुम्हाठायी इच्छा असली पाहिजे. दुसरी तुमची सुयोग्य स्थिती असावयास हवी. इच्छेची उणीव असल्यास त्याकरता प्रार्थना करा. दुसऱ्‍या पायनिरांसोबत बोला. मंडळ प्रचारकाच्या नात्याने तुमचे सध्याचे कार्य वाढवा. शक्य आहे तेथे साहाय्यक पायनियर कार्यात सहभागी व्हा. तुमची परिस्थिति सध्या तुम्हाला मुभा देत नसली तर त्यात कोणती सुधारणा करता येऊ शकते ते पाहा. नोकरी करणाऱ्‍या पत्नीला नोकरीची गरज असेलच असे नाही. सेवानिवृत्त असणाऱ्‍यांना पुढे काम करण्याची गरज राहीलच असे नाही. उच्च राहणीमान, खर्चिक सुट्या, अत्याधुनिक मोटारगाड्या इत्यादि गोष्टी जीवनावश्‍यक नाहीत.—लूक १२:१५; १ योहान २:१५–१७.

१४. (अ) एक विवाहीत जोडपे केवळ मंडळ प्रचारक राहण्यात का समाधानी राहिले नाहीत? (ब) त्यांनी आपल्या मुलांपुढे कोणते ध्येय ठेवले?

१४ तीन मुले, ज्यापैकी दोघे युवकावस्थेत आहेत त्यांच्या वडीलांनी सहा वर्षाआधी पायनियरींग सुरु केली. का? “मला अधिक करण्याची जिज्ञासा होती” ते म्हणतात. “मला नियमित पायनियर बनणे शक्य आहे तरीपण तसे करून दाखवीत नाही याचा अर्थ मी माझ्या समर्पणानुरूप जगत नाही असा होतो.” त्यांच्या पत्नीने सुद्धा नियमित पायनियरींग आरंभिली. ते का? “मी सतत चार वर्षे नियमित रूपात साहाय्यक पायनियर होते आणि मला कळून चुकले की ते करणे सोपे आहे.” असे त्या म्हणतात. “पुनरावृत्ती होऊ न शकणाऱ्‍या या कार्यात पूर्ण सहभाग घेण्याची माझी इच्छा आहे. शिवाय आमच्या मुलांपुढे योग्य उदाहरण राहावे असेही मला वाटते.” या नवरा–बायकोला त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणानंतर सत्य शिकायला मिळाले. “आम्ही चार वर्षे कॉलेजला जात राहावे असा आमच्या पालकांनी हट्ट धरला होता.” वडील म्हणतात. तर आता यांनी आपल्या मुलांसाठी कोणते ध्येय ठेवले आहे? “मी माझ्या मुलांना कळविले की त्यांनी पायनियर बनावे आणि चार वर्षे बेथेलमध्ये घालवावी अशी आमची इच्छा आहे.”

१५. (अ) काहींनी कोणत्या कारणास्तव नियमित पायनियर या अर्थी स्वतःला झटविले? (ब) कोणत्या कारणामुळे तुम्हाला पूर्ण वेळेच्या कार्यात सहभागी व्हावेसे वाटते?

१५ काहींनी नियमित पायनियर होण्याची का इच्छा व्यक्‍त केली त्याची ही कारणे आहेत:

“मला आध्यात्मिकदृष्टया जादा काही करता येत नव्हते. त्याची मला खंत वाटत राहिली.” (रॉबर्ट एच.)

“नियमित प्रचारक यात मी समाधानी राहू शकलो नाही.” (रेहा एच.)

“पायनियरींग माझ्या जीवनाला मार्गदर्शन व उद्देश देते.” (हंस के.)

“मला यहोवाची सेवा पूर्णपणे करण्याची इच्छा होती आणि पायनियरींग नेमके तेच करण्याचा मार्ग ठरला.” (चरणजीत के.)

“या मोठ्या कार्यात मी माझा उत्साह, शक्‍ती व यौवनकाल दिला नसता तर त्याची मला खंत वाटली असती.” (ग्रेगरी टी.)

“यहोवा प्रयत्नांवर आशीर्वाद आणतो. आशीर्वाद मिळावा याकरता मी काहीतर देण्याची गरज होती.” (ग्रेस ॲन टी.)

“मला यहोवाबद्दल कसे वाटते ते व्यक्‍त करण्यात पायनियरींग मला मदत देते.” (मार्को पी.)

“पायनियरांमध्ये जे समाधान व जो आनंद मला आढळून आला तो प्रापंचिकरित्या पूर्णवेळेचे काम करण्यात मला मिळू शकला नाही.” (नॅनसी पी.)

या यादीत आणखी कोणती कारणे तुम्ही जोडू शकाल?

शक्य आहे तेवढे सर्व तुम्ही करता का?

१६. जोराचा यत्न करणाऱ्‍यांमध्ये केवळ पायनियरच असतात का?

१६ यहोवाच्या साक्षीदारांपैकी कित्येकांनी स्वत:च्या व्यक्‍तिगत स्थितिचे प्रामाणिकपणे व प्रार्थनापूर्वक परीक्षण केले तेव्हा सध्याच्या स्थितीत करता येईल तेवढे सर्व ते करीत आहेत असे त्यांना आढळले. कदाचित तुम्ही त्यापैकी असाल. तसे आहे तर धीर धरा. यहोवा देव व त्याचा पुत्र यांना तुमची काळजी वाटते तुमच्या पूर्ण जिवाच्या सेवेबद्दल त्यांना खरी आत्मीयता वाटते. (पडताळा लूक २१:१–४) काही देशात सुयुक्‍त अशी राजकीय व आर्थिक स्थिति नसल्यामुळे आमच्या बांधवांना जीवनावश्‍यक गोष्टींची प्राप्तता करण्यासाठी प्रतिदिवशी आठ ते नऊ तास आणि आठवड्यातून पाच ते सहा दिवस काम करावे लागते. ज्या देशात यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला सरकारी बंदी आहे तेथे जे पायनियरींग करतात त्यात बहुधा सेवा निवृत्त व्यक्‍ती, रात्रपाळीत काम करणारे युवक आणि ज्यांना देशात प्रापंचिक व्यवसायातून सूट मिळाली आहेत त्या माता (आपल्या मुलांसहित) आढळतात. अशा या देशात पायनियरांची संख्या वाढती आहे.

१७. एपफ्रदीतचे प्रकरण कसे दाखवते की, आम्ही देवाचे किती कार्य करतो त्यावर देव आमच्या यत्नाचे मोजमाप करीत नाही?

१७ तुम्ही कदाचित म्हणाल, ‘माझ्या ठायी शरीरिक बळ असते. मी अद्याप तरूण असतो तर ते बरे झाले असते!’ तरीपण निराश होऊ नका. देवाच्या पवित्र कार्यात आम्ही केवढे कार्य उरकतो त्याच्या आधारावर आमच्या यत्नाचे मोजमाप होत नाही. एपफ्रदीत आठवतो ना? तो आजारी असताना “प्रभूच्या कामात” तो जेवढे आवेशी कार्य करू शकला त्याची तुलना तो बरा असताना त्याने जे केले त्याच्याशी होऊ शकत नव्हती. तरीपण पौलाने त्याच्या प्रयत्नाविषयी अभिनंदन केले. खरे म्हणजे पौलानेच सुचविले की ‘अशा पुरुषांचा व स्त्रियांचा मान राखावा.’—फिलिप्पैकर २:२५–३०.

१८. (अ) मर्यादित स्थिति असणारे मंडळीत पूर्ण वेळेच्या कार्याला कसा भर देऊ शकतात? (ब) मंडळीतील पायनियर आत्म्यास प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही स्वतः काय करू शकाल?

१८ तरीपण, मंडळीत पूर्ण वेळेच्या सेवेची वाढ करण्यासाठी तुम्हाला काही करता येण्याजोगे आहे. ते काय? पायनियरचा आत्मा प्रदर्शित करण्यात जोराचा यत्न दाखवा. उदाहरणार्थ, कौटुंबिक जबाबदाऱ्‍यांमुळे तुम्हाला सध्या पायनियरींग जमत नसली तर कुटुंबातील इतरांना—तुमची बायको, मुले, भाऊ, बहिण—यांना पायनियर बनण्याची तुम्ही मुभा द्याल का? ज्यांचे आरोग्य ठीक नाही किंवा इतर काही पंगुत्व आहे ते सुद्धा आपल्या परिस्थिती प्रमाणे क्षेत्रावर जाऊन पायनियरांबरोबर कार्यकरून त्यांच्याबद्दल खरी आस्था दाखवू शकतात. (पडताळा १ करिंथकर १२:१९–२६) याप्रकारे मंडळीतील सर्व पूर्ण वेळेच्या कार्यावर भर देऊ शकतात. यापासून निष्पण्ण होणारे परिणाम सर्वांना प्रोत्साहनदायक ठरतील.

१९. आमचा निर्धार कोणता असावा?

१९ जोराने यत्न करण्याचा तुम्हासाठी काय अर्थ होतो? तुम्ही बाप्तिस्म्याप्रत प्रगति साधावी हा आहे का? काही वाईट सवयांवर मात करणे आहे का? यहोवाबरोबरचे नाते काही मार्गाने दृढ करणे आहे का? साहाय्यक पायनियरींग, नियमित पायनियरींग किंवा बेथेल सेवा हा त्याचा अर्थ होऊ शकेल का? आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी तुम्हाबाबत जी अपेक्षा आहे त्यासाठी आत्ताच जोराचा यत्न करणे योग्य आहे. याकरताच आपण सर्वजण सार्वकालिक जीवनाप्रत नेणाऱ्‍या अरूंद दरवाजाने आत जाण्याचा जोराचा यत्न झटून करू या!

[तळटीपा]

a  किती जणांना तारणप्राप्ती होणार याविषयी रब्बीत फार मोठा तात्विक वाद होता. एक पवित्र शास्त्र सांदर्भिक पुस्तक म्हणते: “रब्बीत दिसणारा विचित्रपणा हा होता की ते या किंवा त्या वचनातील अक्षरांकरवी आकड्याच्या रूपात किती लोकांना तारणप्राप्ती होणार त्याची संख्या ठरवीत होते.”

विचार करण्याजोगे मुद्दे

◻ “जोराचा यत्न करा” अशी सूचना देण्यात येशूचा काय अर्थ असावा?

◻ येशूचे शब्द तुम्हाला केव्हा व कसे लागू होतात?

◻ अरूंद दरवाजाने आत जाण्याचे ‘पुष्कळांना’ का जमत नाही?

◻ मर्यादित स्थिति लाभलेले कसे जोराचा यत्न करू शकतात?

◻ अरूंद दरवाज्याने आत जाण्याचा यत्न केवढा काळ करीत राहिले पाहिजे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा