“एकदम दचकून चित्तस्थैर्य सोडू नका”
“आम्ही तुम्हास अशी विनंति करतो की, तुम्ही एकदम दचकून चित्तस्थैर्य सोडू नका, . . . किंवा . . . आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका.”—२ थेस्सलनीकाकर २:१, २.
१. आम्हाला सत्य पहिल्यांदा शिकायला मिळाले त्यावेळेचा काळ आठवल्यास कोणत्या सुखद आठवणी समोर येतात?
देवाच्या वचनातील सत्य आपल्याला पहिल्यांदाच शिकायला मिळाले तो काळ आम्ही ख्रिश्चनांनी आठवला तर सुखद अशा आठवणी आम्हासमोर तरळू लागतात. ते सत्य खरेच सुंदर, व्यवहार्य व तृप्तीदायक होते. यहोवा देव, त्याचे उच्चतम गुण, त्याचे अगाध प्रेम व दया याबद्दल आम्ही शिकलो तेव्हा आमची अंतःकरणे केवढी उचंबळून आली! खरे ख्रिस्ती प्रेम दाखवणाऱ्या आणि पवित्र शास्त्रीय तत्वानुरूप जीवन व्यतित करणाऱ्या समाविश्वासूंचा सहवास आम्हाला लाभला त्यावेळी खराच आनंद झाला.
२. यहोवाचे सेवक या अर्थी आमचे भवितव्य काय आहे व आम्हाला आता कोणत्या आध्यात्मिक दशेत असल्याचे दिसते?
२ यहोवा लवकरच वेदना, दुःख व मृत्यूही काढून टाकील हे शिकायला मिळाले म्हणून केवढे कृतज्ञतेचे वाटले! (प्रकटीकरण २१:३, ४) परिपूर्ण आरोग्य व पूर्ण समाधान यासहित नंदनवनमय पृथ्वीवर सदासर्वकाळ जिवंत राहण्याचा विचार करा! असे काही घडणार याची शाश्वती आम्हाला वाटत नव्हती. पण ते सारे काही खरे होते. त्याला देवाच्यावचनाची पुष्टी होती. ते थरारक होते! आम्हाला जणू, येशू पुनरुत्थानानंतर प्रथमतःच त्याच्या शिष्यांना भेटल्यावर त्यांना जसे वाटले होते तेच वाटायला लागले होते. त्यांनी एकमेकांस म्हटले होते: “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती का?” (लूक २४:३२) होय, सत्य शिकून घेतल्यामुळे आणि यहोवास आपल्या जीवनाचे समर्पण केल्यामुळे आम्हाला स्वतःला आध्यात्मिक नंदनवनात ठेवता आले. केवढा हा आशीर्वाद!
३. यहोवाच्या आध्यात्मिक फायद्यांपासून आम्हाला मुकवावे यासाठी दियाबल व इतर विरोधक कसा प्रयत्न करतात?
३ तरीपण यहोवाच्या आध्यात्मिक नंदनवनात असणे ही गोष्ट गृहीत धरून चालता येणार नाही. आम्ही या नंदनवनात स्वेच्छेने आलो आहोत; पण तेच आम्ही विश्वास नाकारणाऱ्या गोष्टी धरल्या किंवा स्वेच्छापूर्ण रितीने यहोवाचे नीतीमान कायदे मोडले तर आमचे पाय तेथून आम्हाला बाहेर नेतील. तथापि, आम्ही ‘आपली पहिली प्रीती’ दृढ टिकवून ठेवली आणि आम्हास आध्यात्मिकदृष्टया बळकट राखणाऱ्या यहोवाच्या सर्व तरतुदींची जाण राखली तर अर्थातच हे घडणार नाही. (प्रकटीकरण २:४) तरीपण दियाबल सैतान व खऱ्या उपासनेचे त्याचे विरोधक फसविण्यात मोठे पटाईत आहेत. आमची सचोटी भंगविता आलीच तर ती ते भंगविण्यास सदैव तयार असतात हे आम्ही कधीही विसरता कामा नये. आमच्या विश्वासास कमकुवत बनवावे, देवाबद्दलची आमची प्रीती थंड करावी, आमच्या मनात शंकांचे बीजारोपण करावे—होय आध्यात्मिक नंदनवन हे मुळी नंदनवन नाहीच असे भासवावे यासाठीच त्यांचा प्रचार आयोजलेला असतो.
४. आम्ही आमचा विश्वास दुबळा होऊ दिला आणि गंभीर संशयांना बळावू दिले तर काय परिणाम निष्पण्ण होतील?
४ याचा परिणाम, अलंकारिक भाषेत सांगावयाचा झाल्यास आमची स्थिती इतक्या खालावण्याप्रत जाईल की आम्हाला आध्यात्मिक नंदनवनातील घनदाट वन दिसणारच नाही उलटपक्षी अपूर्ण असे मानवी रूपाचे सडपातळ वृक्षच नजरेत भरतील. देवाच्या वचनातील सत्य शिकून घेण्यातील थरारकता, आम्हास लाभलेली भव्य आशा, देव व आमच्या आध्यात्मिक बांधवांच्या बाबतीत आम्ही जोपासलेली प्रीती आणि यहोवाच्या सेवेकरता असणारा आमचा आवेश निस्तेज होईल. अशी ही आध्यात्मिक कीड काढून टाकण्याची सत्वर पावले न घेतल्यास देवाच्या प्रेमळ गरजा मोठ्या भाराप्रमाणे वाटू लागतील. “विश्वासू व बुद्धीमान दास” वर्गामार्फत येणारे पुष्टीदायक अन्न तिरस्करणीय भासेल आणि यहोवाच्या प्रेमळ सेवकांचे बंधुत्व घरातलेच शत्रूत्व वाटू लागेल. तेव्हा आपल्या सोबतच्या दासांची निंदा करणे व अर्धवट सत्याकरवी त्यांचा प्रतिकार करीत राहणे असे हे विपरीत स्वरूपाचे समाधान एवढचे काय ते राहील.—मत्तय २४:४५–५१.
५. एदेनातील नंदनवनाबाहेर आदाम व हव्वेला हाकून लावल्यामुळे त्यांना जे नुकसान प्राप्त झाले त्याच्याबरोबर एखाद्याच्या नुकसानीची कशी तुलना होऊ शकते?
५ होय, आम्ही आता आध्यात्मिक नंदनवनाच्या अशीर्वादांनाच केवळ मुकणार नाही तर अधिक गंभीर ते हे की, पृथ्वीवरील नंदनवनात चिरकालिकपणे जिवंत राहण्याची आशाही गमावून बसू. आदाम व हव्वा ज्या कारणास्तव एदेनातील नंदनवनाला मुकले त्याच कारणासाठी आम्हालाही आपले वतन मुकावे लागेल. पूर्ण तऱ्हेचा आनंद प्राप्त होण्याजोगे सर्व काही त्यांना होते व ते सदासर्वकाळ जिवंतसुद्धा राहू शकत होते. तरीपण यहोवाची आज्ञाधारकता आणि एदेनातील आशीर्वाद यापेक्षा एका वेगळ्या शिक्षणाचा—स्वातंत्र्याचा—त्यांनी ध्यास धरला होता. हव्वेला फसविले गेले. आदामाच्या बाबतीत बघता तो फसवला गेला नाही तरीपण घडलेल्या परिस्थितीचा प्रभाव आणि बायकोविषयी त्याला वाटणारी ओढ यांनी त्याला पापास प्रवृत्त केले. याकारणास्तव त्या दोघांनाही नंदनवनाबाहेर हाकलून देण्यात आले आणि त्यांना मरणापावेतो दैन्यावस्थेचे जीवन व्यतित करण्यास सोडले गेले. त्यांनी आपणाकरता सार्वकालिक जीवनाचे भवितव्य तर गमावले पण शिवाय आपल्या संतानाकरता पाप व मरणाचा वारसा बहाल केला. (उत्पत्ती ३:१–७, १४–१९, २४; १ तिमथ्यी २:१४; रोमकर ५:१२) ज्या स्वातंत्र्याप्राप्तीची त्यांनी लालसा धरली त्याची ही केवढी भयंकर किंमत!
६. (अ) करिंथच्या मंडळीतील काही जणांच्या बाबतीत पौलाने कोणती चिंता व्यक्त केली? (ब) थेस्सलनीका मंडळीला लिहिलेल्या पत्रात त्याची हीच चिंता कशी परावर्तित झाल्याचे दिसते?
६ प्रेषित पौलाला ती काळजी वाटत होती. “जसे सापाने कपट करून हव्वेला ठकविले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे” असे तो म्हणाला. (२ करिंथकर ११:३) पौलाला त्याच्या काळी जे चुकीचे शिक्षण प्रसारित होत होते त्याबद्दल लिहिणे जरूरीचे वाटले. या कारणास्तव थेस्सलनीका मंडळीस लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात त्याने लिहिले: “आम्ही तुम्हास अशी विनंति करतो की तुम्ही एकदम दचकून चित्तस्थैर्य सोडू नका . . . यहोवाचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका. कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका.”—२ थेस्सलनीकाकर २:१–३.
धर्मत्याग्यांसोबत कोणतेही दळणवळण राखू नका
७. (अ) टपालाद्वारे धर्मत्यागी प्रकाशन आले तर कोणते प्रश्न उद्भवतात? (ब) धर्मत्याग्यांच्या प्रभावापासून स्वतःचे रक्षण करण्याच्या बाबतीत फाजील आत्मविश्वास का घातक ठरत असतो?
७ आता तुम्ही कोणा धर्मत्यागी शिक्षणाला—युक्तिबाज विचारधारेस सामोरे झाला की, यहोवाचे साक्षीदार या नात्याने तुम्ही जो विश्वास बाळगून आहात तो खरा नाही, अशावेळी तुम्ही काय कराल? उदाहरणार्थ, तुम्हाला एखादे पत्र वा साहित्य आले व ते उघडता खणीच तुम्हाला दिसले की ते कोणा धर्मत्याग्यापासून आहे, तर काय? त्यात काय लिहिले आहे ते पहावे या औत्सुक्याखातर तुम्ही ते वाचणार का? तुम्ही कदाचित म्हणाल: ‘याचा मजवर परिणाम होणार नाही. मी तर सत्यात मजबूत आहे. आपल्यापाशी सत्य आहे तर भीती बाळगण्याचे कारण नाही. सत्य वादळी परिक्षात टिकून राहीलच.’ असा विचार राखून काहींनी आपल्या मनात धर्मत्यागी विचार धारा भरविली. याचा परिणाम हा झाला की ते गंभीर प्रश्न व शंकांना बळी पडले. (पडताळा याकोब १:५–८) यास्तव १ करिंथकर १०:१२ मधील इशारा लक्षात घ्या: “आपण उभे आहे असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून संभाळावे.”
८. संशयाने ग्रस्त झालेल्यांसाठी कोणती मदत देण्याची गरज आहे?
८ काळजी वाहणाऱ्या बांधवाकरवीच्या प्रेमळ मदतीद्वारे ज्या काहींमध्ये धर्मत्याग्यांनी शंका पेरल्या त्यांना आध्यात्मिक गोंधळ व मानसिक त्राग्यातून सुटका मिळाली. ह्या यातना बहुधा टाळता आल्या असत्या. नीतीसूत्रे ११:९ मध्ये आम्हाला सांगितले आहे: “अधर्मी आपल्यातोंडाने आपल्या शेजाऱ्याचा नाश करतो; पण धार्मिक आपल्या ज्ञानाने मुक्त होतात.” यहुदाने सह ख्रिश्चनांना म्हटले की, “जे कित्येक जण संशयात आहेत त्यांच्यावर दया करा. त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा.” पौलाने तिमथ्यी या देखरेख्याला सल्ला दिला की “विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा असे असावे. कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्चातापबुद्धी देईल; आणि सैतानाने त्यांना धरून ठेवल्यानंतर ते त्याच्या पाशातून सुटून देवाच्या इच्छेस वश होण्याकरता शुद्धीवर येतील.”—२ तिमथ्यी २:२५, २६.
९. खऱ्या भक्तिचा त्याग करणाऱ्यांना कोणता भयंकर परिणाम संभवतो?
९ काही संपूर्णतयः काळोखात, ख्रिस्ती धर्मराज्याच्या चुकीच्या शिक्षणाकडे परतले ही बरीच घातक गोष्ट ठरली आहे. जे प्रथम सत्यामध्ये चालले पण नंतर बाजूला पडले अशांना मिळणाऱ्या भयप्रद परिणामाविषयी पेत्राने लिहिले. तो म्हणाला: “प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानाच्या द्वारे जगाच्या घाणीतून सुटल्यावर ते पुन्हा जर तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले तर त्यांची शेवटली दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झाली आहे.” पेत्राने म्हटले की ते जणू आपल्या ओकारीकडे परतणारे कुत्रे आणि अंग धुतल्यावर गाळात लोळण्यास परतलेली डुकरीण यासारखे बनतात.—२ पेत्र २:२०–२२.
१०. (अ) धर्मत्याग्यांचे श्रवण करण्याविषयी यहोवा काय म्हणतो? (ब) धर्मत्याग्यांकरवीची लिखाणे वाचणे हे जणू काय करण्यासारखे आहे?
१० कोणी सहमानव आम्हाला म्हणतो की, ‘हे वाचू नका’ किंवा ‘त्याकडे लक्ष देऊ नका’ त्यावेळी आम्हाला त्या सल्लयाकडे कानाडोळा करण्याचा मोह होत असतो. पण हे लक्षात घ्या की येथे यहोवा आम्हाला त्याच्या वचनाकरवी काय करावे ते सांगतो. तर मग, तो धर्मत्याग्यांविषयी काय म्हणतो? “त्यांच्यापासून दूर व्हा.” (रोमकर १६:१७, १८) “तशांची संगत धरू नये.” (१ करिंथकर ५:११) आणि “त्यांना घरात घेऊ नका व त्यांचे क्षेमकुशल विचारू नका.” (२ योहान ९, १०) हे जोरदार शब्द आहेत, ते स्पष्ट निर्देश करतात. आम्ही औत्सुक्य म्हणून कोणा परिचित धर्मत्याग्याचे लिखाण वाचले तर ते, खऱ्या उपासनेच्या या शत्रूला आपल्या घरात बोलावून आणून आपणासमोर बसवून त्याला त्याच्या धर्मत्यागी विचारांना सांगण्याची परवानगी द्यावी यासारखे नसणार का?
११, १२. (अ) धर्मत्यागी लिखाणाचे वाचन आम्हाला साळसूदपणे करता येणार नाही याची समज होण्यासाठी कोणते उदाहरण हदले आहे? (ब) याचाच अवलंब, यहोवा आपल्या लोकांविषयी जी चिंता करतो त्याला कसा लागू करता येईल?
११ याविषयाचे विदारण आपण या पद्धतीने पाहू या. समजा तुमच्या तरूण मुलाला अश्लील स्वरूपाचे साहित्य टपालाद्वारे मिळाले. तुम्ही याबद्दल काय करणार? औत्सुक्य म्हणून ते साहित्य वाचण्याचा त्याचा कल असेल तर तुम्ही त्याला, ‘मुला वाच ते साहित्य, ते तुला इजा देणार नाही. आम्ही तुला लहानपणापासून सांगत आलो आहे की अनैतिकता चुकीची आहे. शिवाय वाईट काय आहे ते पाहण्यासाठी जगात काय चालले आहे हे तू बघण्याची गरज आहेत’ असे म्हणणार का? तुम्ही अशीच त्याच्याशी चर्चा करणार का? मुळीच नाही! उलटपक्षी, अश्लील साहित्याच्या वाचनामुळे जे धोके संभवतात त्याकडे तुम्ही निर्देश कराल व त्यामुळेच ते साहित्य नष्ट करावे असे सांगाल. का बरे? कारण कोणी सत्यात कितीही बळकट असला तरी त्याने त्या लिखाणात आढळणाऱ्या विपर्यासी कल्पना आपल्या मनात भरवत राहिल्या तर याद्वारे त्याच्या मनावर व अंतःकरणावर परिणाम होणार हृदयाच्या एका खोबणीत रोविलेली चुकीची इच्छा रेंगाळत राहिली तर ती ओघाओघाने विपरीत लैंगिक ओढ निर्माण करीत राहील. आणि परिणाम? याकोब म्हणतो की चुकीची वासना परिपक्व होते तेव्हा ती पापाला जन्म देते आणि पाप मृत्यूप्रत नेते. (याकोब १:१५) तरमग प्रतिक्रियेची ही साखळी का सुरु करावी?
१२ आपल्या मुलांनी त्या अश्लील साहित्याला बळी पडू नये याविषयी आपण एवढी दक्षता घेतो तर मग आमच्या प्रेमळ स्वर्गीय पित्याने सुद्धा याच पद्धतीने आम्हाला इशारा देऊन आमचे आध्यात्मिक व्यभिचार व धर्मत्याग यापासून संरक्षण करावे अशी आम्ही अपेक्षा धरू नये का? तो तेच म्हणतो, त्यापासून दूर राहा!
१३. धर्मत्याग्यांनी केलेले वक्तव्य वा लिखाण यांना अनुलक्षून असणारा आव्हानात्मक प्रश्न, आम्ही घरोघरच्या प्रचारकार्यात सहभागी असताना कोणी विचारला तर काय केले जाऊ शकते?
१३ पण समजा आम्ही सुवार्तेचा प्रसार करीत आहोत व लोक, धर्मत्याग्यांप्रमाणेच निरनिराळे प्रश्न वा आक्षेप आम्हासमोर मांडतात, तर काय? आम्हाला हे दिसते की असा अडथळा मांडणाऱ्या माणसाची वृत्ति प्रामाणिक नाही तर नुसता वादविवाद निर्माण करण्याकडे त्याचा कल आहे त्यावेळी अर्थातच आम्ही आपले संभाषण आटोपते घेऊन पुढच्या घरी भेट देणे बरे! पण तेच कोणी धर्मत्याग्यांच्या विशिष्ठ दाव्याबद्दल प्रामाणिकपणे विचारणा करीत आहे तर काय करता येण्याजोगे आहे? प्रथमतः आम्ही हे विचारावे की कशामुळे त्याला ही काळजी वाटली आहे? त्याचे एक किंवा दोन मुद्दे असतील. तेव्हा आपण याच मुद्यांना धरून त्याची उत्तरे शास्त्रवचने, संस्थेची प्रकाशने व त्या विषयाबद्दल आम्हाला जे खरे माहीत आहे त्याच्या आधारावर देऊ शकतो. विरोध्याचे शिक्षण व खोट्या दाव्यांचे खंडण करण्यासाठी आपल्याला निंध व अर्धवट सत्याने भरलेली त्यांची पुस्तके वा पुस्तिका वाचल्या पाहिजेत असा निर्णय करण्याची काहीही गरज नाही.
यहोवावरील आत्मविश्वास
१४. आमच्या स्वर्गातील पित्याला आम्हाबद्दल कोणती प्रेमळ कळकळ वाटते आणि आपण त्याच्यावर आपला पूर्ण आत्मविश्वास का ठेवू शकतो?
१४ आम्ही पुढे जात विश्वासाची उभारणी करीत राहिलो व राज्याच्या सेवेत स्वतःला मग्न ठेवीत राहिलो तर आम्ही आपला भरवसा यहोवावर पूर्ण आत्मविश्वासाने ही खातरी राखून टाकू शकतो की आमचा प्रेमळ स्वर्गीय पिता या नात्याने आम्हास उत्तम ते द्यावे हीच त्याची इच्छा आहे. देव आम्हास शिकवितो, तो आम्हाला इशाराहि देतो. हे तो आपले वचन व त्याच्या दृश्य संघटनेकरवी दिलेल्या स्पष्ट मार्गदर्शनाकरवी करतो. आम्ही कोणाप्रेमळ पालकाला भाकर व माशाची विनंति केली तर तो आम्हाला धोंडा किंवा साप देणार नाही. याचप्रमाणे देव ही आपल्याला फसविणार किंवा मुर्ख बनविणार नाही. (मत्तय ७:७–११) तरीपण, देव आम्हाला मोहपाश किंवा फसव्या लबाड्या आणि सैतानी प्रचार यापासून पुर्णपणे आड ठेवणार नाही. तो स्वतःबद्दल म्हणतो: “तुला जे हितकारक ते मी यहोवा तुझा देव तुला शिकवितो. ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.” (यशया ४८:१७) होय, यहोवा ‘जे हितकारक ते आपल्याला शिकवितो.’ धर्मत्यागी व त्यांचे शिक्षण यापासून आम्ही स्वतःला आमच्या संरक्षणार्थ दूर ठेवावे असे तो आम्हाला सांगतो. यातच आमचे जीवन आहे.
१५. शिष्यांना बहकविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांबद्दल प्रेषित पौलाने कोणती ताकीद देऊ केली?
१५ प्रेषित पौलाने आपल्या सोबतीच्या ख्रिस्ती वडीलांना ताकीद दिली: “तुम्हापैकीही काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागें ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील.” (प्रे. कृत्ये २०:३०) फसवे वादविवाद व खास कारणमीमांसा आम्ही ऐकतच राहिलो तर या “विपरीत गोष्टी” आम्हाला जणू सरळच आहेत वाटतील. मना केलेल्या फळाकडे हव्वा सारखी बद्यत राहिली आणि दियाबलाच्या विपरीत कारणांकडे ती लक्ष देऊन ऐकत राहिल्यामुळे तिला दियाबलच खरा आहे असे वाटायला लागले. पौलाने, याचकारणास्तव ताकीद दिली: “खिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या.” (कलस्सैकर २:८) प्रेषिताने आणखी सूचित केले की, “गोड व लाघवी भाषणाने [धर्मत्यागी लोक] भोळया भाबडयांची अंतःकरणे भुलवितात.” (रोमकर १६:१७, १८; पडताळा २ करिंथकर ११:१३–१५) अशा प्रकारच्याप्रचारामुळे थोडेजण बहकले याचा अर्थ आम्ही त्यांच्या मार्ग जावे असा नाही. तरीपण आम्हाला सतत जागृत राहिलेच पाहिजे.
१६. लोकांना फसवून खऱ्या उपासनेपासून मार्गभ्रष्ट करणाऱ्या सैतानाच्या प्रयत्नांपुढे टिकाव धरण्याकरता कोणत्या शास्त्रवचनीय इशाऱ्यांचा अवलंब साहाय्यक ठरेल?
१६ एदेनापासून दियाबलाचा कावेबाजपणा बदलला नाही. तो फसवी प्रश्नमालिका सादर करतो व स्वार्थ आस्थेला चेतावणी देतो. पेत्राने लिहिले: “तुम्हातही खोटे शिक्षक होतील. ते विध्वंसक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील . . . ते लोभ धरून बनावट गोष्टी सांगतील आणि तुम्हावर पैसे मिळवितील.” (२ पेत्र २:१–३) बनावट असणाऱ्या गोष्टी खऱ्या आहेत अशा भासविल्या जातात. तिमथ्याला दुसऱ्या पत्रात २:१४–१९ पौलाने सर्व प्रकरणे ठीक करण्यासाठी यहोवाच्या वचनाच्या वापराचे महत्व जोरदारपणे मांडले पण सोबत धर्मत्याग्यांना टाळण्याचाहि इशारा दिला, कारण यांच्या ‘रिकाम्या वटवटी जे पवित्र त्याला भ्रष्ट करतात.’ त्यांचे “शिक्षण काळ पुळीसारखे चरेल.”
१७, १८. (अ) धर्मत्याग्यांचे शिक्षण काळपुळीसारखे वा शरीराच्या सडलेल्या भागासारखे कसे आहे? (ब) आम्हाला खऱ्या भक्तीपासून दूर नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांबद्दल प्रेषित पेत्र कोणता इशारा देतो? (क) पुढिल अभ्यासाच्या लेखात कोणत्या प्रश्नांची उत्तरे मिळतील?
१७ केवढी ही तंतोतंत साम्यता! शरीराच्या सडलेल्या भागाप्रमाणे असणारी धर्मत्याग्यांची विचारधारा त्वरेने लागण करून आध्यात्मिक मृत्यू ओढावून आणते. वस्तुतः मंडळीचे सदस्य एका शरीराप्रमाणे असल्यामुळे हा संसर्ग इतरांनाही होण्याचा धोका असतो. धर्मत्यागी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्याला देववचनाच्या उटण्याच्या प्रेमळ पण निश्चयी अवलंबनाने आध्यात्मिक सुद्दढ दशेत परत आणता आले नाही तर या सदस्याला निखळून काढणे (बहिष्कृत करणे) हाच एक मार्ग शरीराच्या इतर सदस्यांच्या संरक्षणार्थ पर्यायाने स्विकारावा लागेल. (पडताळा तीत १:१०, ११) तर मग अशा मरणप्राय आध्यात्मिक सडण्याचा संसर्ग स्वतःला होऊ देऊ नका! धर्मत्यागी विचारांकरवी स्वतःला प्रदुषित होण्यापासून दूर ठेवण्याकरता उत्तम आध्यात्मिक सुदृढतेत स्वतःला ठेवा. पेत्राचे दुसरे पत्र ३:१७, १८ मधील सबळ सल्ला ग्रहण करा: “तर प्रियजनहो, ह्या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत म्हणून तुम्ही अनीतीमान लोकांच्या भ्रांतिप्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये ह्यासाठी जपून राहा. आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा.”
१८ पण आपल्याला धर्मत्यागीपणापासून कसे सुरक्षित ठेवता येईल? धर्मत्यागी विचारांस आमची अंतःकरणे मोहित होण्यापासून कसे राखू शकतो? या प्रश्नांचा विचार पुढील लेखात करण्यात येईल.
तुम्हाला आठवते का?
◻ यहोवाच्या आध्यात्मिक नंदनवनाचे फायदे आम्ही कसे गमावू शकतो?
◻ धर्मत्यागी लिखाणांचे वाचन करणे ही गोष्ट अश्लील साहित्याचे वाचन करण्यासमान कशी आहे?
◻ धर्मत्याग्यांच्या विशिष्ट दाव्याबद्दल आम्हाला विचारणा झाल्यास आम्ही काय करावे?
◻ धर्मत्याग्यांचे शिक्षण शरीराच्या सडलेल्या भागासमान कसे आहे?
[१२ पानांवरील चित्र]
तुम्ही धर्मत्यागी लिखाण सूज्ञपणे नष्ट करता का?