येशूचे जीवन व उपाध्यपण
येशूचे आरंभीचे कौटुंबिक जीवन
येशू ज्या नासारेथमध्ये वाढत आहे ते एक लहान शहर आहे. त्याची प्रसिद्धी वगैरे काही नाही. हे शहर गालील या प्रदेशातील डोंगराळ भागात वसलेले आहे. ते सुंदर इजेल खोऱ्यापासून फार दूरवर नाही.
येशू दोन वर्षांचा असताना मरीया व योसेफ यांनी त्याला मिसरातून येथे आणले होते. तेव्हा मरीयेचा हा एकच मुलगा होता. पण काही काळातच याकोब, योसे, शिमोन आणि यहुदा यांचा जन्म झाला. याशिवाय मरीया व योसेफ मुलींचे देखील पालक बनले. अशा प्रकारे येशूला निदान सहा लहान भाऊ व बहिणी मिळाल्या.
येशूला आणखी नातेवाईक देखील आहेत. आपल्याला त्याचा मोठा चुलत भाऊ योहान माहीत आहे. तो पुष्कळ मैल दूर, यहुदियात राहतो. पण गालीलात जवळच मरीयेची बहीण सलोमी राहते. सलोमीचे लग्न जब्दीबरोबर झाले त्यामुळे त्यांची दोन मुले याकोब व योहान हे येशूचे मावस भाऊ आहेत. मोठे होत असता येशूचा बहुतेक वेळ या मुलांच्याबरोबर राहण्यात गेला की काय हे आम्हास ठाऊक नाही, पण पुढे ते मात्र एकमेकांचे जवळचे सोबती बनले, जे आपण नंतर पाहणारच आहोत.
योसेफाला त्याच्या वाढत्या कुटुंबाच्या निर्वाहासाठी खूप काम करावे लागते. तो एक सुतार आहे. योसेफ येशूला स्वतःचा पुत्र या नात्याने वाढवितो त्यामुळेच त्याला ‘सुताराचा पुत्र’ म्हणून ओळखण्यात येते. योसेफ येशूला सुतारकी शिकवी व येशूही ते चांगल्यारितीने शिके त्यामुळे पुढे लोक त्याला ‘हा सुतार आहे’ असे म्हणतात.
योसेफाच्या कुटुंबाचे संपूर्ण जीवन यहोवा देवाच्या उपासनेत उभारलेले आहे. देवाच्या नियमांना अनुसरून योसेफ व मरीया ‘घरी बसले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता’ त्यांच्या मुलांना आध्यात्मिक शिक्षण देतात. नासरेथमध्ये सभास्थान आहे तेव्हा योसेफसुद्धा आपल्या कुटुंबासहित नियमितरित्या तेथे उपासनेला हजर राही याची आम्हाला खात्री बाळगता येईल. तरी पण यरूशलेमात यहोवाच्या मंदिरात नियमित गेल्याने त्यांना कितीतरी आनंद मिळत होता यात काही शंका नाही. याबाबतीत पुढच्या लेखात आपण आणखीन विचार करू. मत्तय १३:५५, ५६; २७:५६; मार्क १५:४०; ६:३; अनुवाद ६:६–९.
◆ येशूला किती भाऊ व बहिणी होत्या व त्यांच्या पैकी काहींची नावे काय आहेत?
◆ येशूचे परिचित असे तीन चुलत भाऊ कोण होते?
◆ येशूचा ऐहिक व्यवसाय कोणता होता?