तुमचा धर्म देवास खरोखरी संतुष्ट करतो का?
‘देव अव्यवस्थेचा नाही तर शांतीचा आहे’. (१ करिंथकर १४:३३) याकारणास्तव पुष्कळ धर्मांना, त्यांच्या विरोधक तत्वामुळे निश्चीतपणे देवाची संमती असू शकणार नाही. केवळ एकच धर्म त्याच्या खऱ्या धर्माच्या गरजांची पुर्ति करणारा असणार. देवास खरोखरी संतोषविणारा तो ऐकमेव खरा धर्म आम्हास कसा सापडू शकेल?
निसंशयपणे, हे संशोधन पुष्कळांना गवताच्या गंजीत सुई शोधण्याप्रमाणे वाटेल, त्यातून चाळणे हे मोठे दिव्यच असेल! तथापि, एक साधी पद्धत वापरता येईल—शक्तीमान लोहचुंबकाचा उपयोग. तो त्या लोखंडी सुईस ओढील व तिला त्या गवतातून वेगळे करील. त्याप्रमाणेच, पवित्रशास्त्राचा उपयोग चुकापासून सत्य वेगळे करण्यासाठी केला जाऊ शकतो, परंतु पवित्रशास्त्र ते कसे करते? देवाच्या दृष्टीकोनातून स्विकाहार्य भक्तीची ओळख देवून.
प्रेषित पौलाने लिहिले: “सर्व शास्त्रवचने ईश्वर प्रेरित आहेत व ती सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतीशिक्षण यासाठी फायदेकारक आहेत, ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.” (२ तिमथ्यी ३:१६, १७) आम्ही धार्मिक भक्ती आमच्या सोईनुसार किंवा आपणास संतुष्ट करील एवढी अल्प करण्याचा धोका टाळू इच्छीतो तर आम्हास पवित्रशास्त्राचे अचूक ज्ञान अत्यंत आवश्यक आहे.
देवाचा पुत्र येशु ख्रिस्त यात अधीक असे म्हणाला की: “देव आत्मा आहे व त्याची भक्ती करणाऱ्यांनी ती आत्म्याने व खरेपणाने केलीच पाहिजे.” (योहान ४:२४) आम्ही “आत्म्याने व खरेपणाने भक्ती” कशी करू शकतो? देवाने त्याचा शब्द पवित्रशास्त्र यात प्रेरणेद्वारा पुरविलेल्या विश्वसनीय मार्गदर्शिकाचे अनुकरण करण्याने करू शकतो.
खरे उपासक प्रीति व्यक्त करतात
देवाचे वचन खऱ्या उपासकांकडून कशाची अपेक्षा करावी असे सांगते? आम्हापाशी “देव प्रीति आहे” या तीन शब्दात स्पष्ट असे ओळख चिन्ह आहे. (१ योहान ४:१६) यास्तव, देवास संतोषविणारी भक्ती अस्सल प्रीतिवर विसावलेली असण्यास हवी.
व्यवहारीक शब्दात, याचा अर्थ काय होतो? देवास संतोषविणारा धर्म सोबतीच्या मानवाविषयी द्वेष बिंबवणारा किंवा त्यास मुभा देणार नाही. पवित्रशास्त्राची साधी सोपी आज्ञा “तू आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर” आहे. (मत्तय २२:३७) याचा अर्थ या जगाचा द्वेष, कलुषितपणा, व झगडे यापासून दूर होणे होय. याचा अर्थ युद्धकला न शिकणे व शांतीचा पाठलाग करणे आहे.—यशया २:२–४.
उदाहरणार्थ: त्यांच्या राष्ट्रांनी आपसात युद्ध पुकारले म्हणून “फ्रेंच” प्रेषित पौल हा “जर्मन” प्रेषित पेत्राला ठार करण्यास जात आहे अशी कल्पना तरी आम्ही करू शकू का? तथापि, दुसऱ्या महायुद्धादरम्यान प्रमुख धर्म त्यांच्या राष्ट्राच्या युद्धाच्या प्रयत्नात इतके गाढपणे समाविष्ठ होते की त्यांनी सैन्यदलासाठी धर्मोपदेशकांचा पुरवठाही केला! त्याचवेळी दोन्ही बाजूंचे पाद्रींनी विजयश्री साठी एकाच देवाकडे प्रार्थना केली. परंतु देव पक्षपाती झाला का? प्रोफेसर अल्बर्ट आईन्स्टाईन ने राष्ट्रीयवादास “पोरकट आजार,” “मानवजातीचा गोवर” म्हणून वर्णिले त्यात आम्ही देवाला गोवून घेऊ शकतो का? अर्थातच नाही! म्हणूनच देवास संतोषवू इच्छीणाऱ्या उपासकांनी तटस्थ राहीलेच पाहीजे व खऱ्या प्रीतीची जोपासना करण्यास हवी. (योहान १३:३४, ३५; १७:१६) ते ‘देहस्वभावाने युद्ध करीत नाहीत’.—२ करिंथकर १०:३, ४ तुलना करा.
खरी भक्ती देवाचे नाव उंचावते
प्रेषित पौलाने देवास संतोषविणाऱ्या धर्माचे आणखीन एका ओळख चिन्हाकडे निर्देश केला. तो म्हणतो, पुष्कळांना देव व प्रभू म्हटले जात असले तरी खऱ्या उपासकांमध्ये केवळ “एकच देव तो पिता” आहे. (१ करिंथकर ८:५, ६) निश्चीतपणे, देवास संतोषविणाऱ्यांना त्याचे नाव माहीत असावे व ते उपायोगात आणावे.
पवित्रशास्त्र त्याच्या मूळ भाषेत खासरितीने देवाचे नाव ७००० पेक्षा अधीक वेळा उल्लेखिते. उदाहरणार्थ, स्तोत्रसंहीता ८३:१८ असे वाचले जाते: “म्हणजे तू, केवळ तूच, यहोवा या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळून येईल.” मग धर्मास बिलगून राहणारे पुष्कळ, नामविरहीत देवाची भक्ती का करतात? व त्यांनी त्यांच्या पवित्रशास्त्र भाषांतरातून त्याचे नाव का वगळले आहे? खात्रीने हा कांही देवास संतोषविणारा मार्ग नाही; कारण येशूने याबाबत प्रार्थिले होते की: “तुझे नाव पवित्र मानले जावे.”—मत्तय ६:९.
देवास संतोषविणारा धर्म
आम्ही आताच चर्चिलेल्या, खऱ्या धर्माच्या दोन्ही मुलभूत गरजा पूर्ण करणारा एखादा तरी विश्वव्यापी धार्मिक गट आहे का? ख्रिस्ताने शिकविलेली प्रीति खरोखरी आचरणारा कोणता धर्म आहे का? आणि या २०व्या शतकात तेच उपासक देवाचे नाव खरेपणाने गौरवितात व सन्मानित करतात का?
ही चांगली–सिद्ध झालेली गोष्ट आहे की यहोवाचे साक्षीदार राष्ट्रांच्या युद्धात तटस्थता राखतात. या करणास्तव त्यांनी राजकीय गुन्हेगारांचा कोंडवाडा व कैद पत्करली. त्यांच्या पवित्रशास्त्र आधारित तत्वांची हात मिळवणी करण्या ऐवजी त्यांनी सुरवातीच्या ख्रिश्चनांचा हुतात्मीक मार्ग अनुसरण्याचे पसंत केले. या भूमिकेस देव व सोबतीच्या मानवावरील प्रेमाने चालना दिली आहे. देवास संतोषविणाऱ्या खऱ्या धर्माचे हे एक ओळख चिन्ह आहे.
यासंबधी पुष्कळांनी यहोवाच्या साक्षीदारंच्या उत्कृष्ट अहवालाची नोंद घेतली. उदाहरणार्थ, कांही वर्षापूर्वी दक्षिण अमेरिकेच्या वृतपत्र संपादकाने नोंद घेतली की साक्षीदार “विवेकबुद्धी सांगते त्या कारणास्तव सशस्त्र दलात सेवा करण्याचे नाकारतात.” ते पुढे म्हणतात: ‘यहोवाच्या साक्षीदारांच्या मुलांनाही ठाऊक आहे की अठरा वर्ष वयात पोहंचल्यानंतर त्यांच्या तटस्थतेमुळे कैदेत वाढीव काळ कंठावा लागणार. त्यांच्या धार्मिक विश्वासाचा भाग म्हणून ते शिक्षा स्विकारतात. ते सौम्य व शांतीकारक आहेत.’
देवास संतोषविणाऱ्या धर्माच्या दुसऱ्या एका चिन्हाबाबत काय? वास्तविक इश्वरी नाम यहोवा, यास कोण सन्मान देतात? हा स्वतःच पुरावा आहे की केवळ यहोवाचे साक्षीदारच विश्वव्यापी रित्या त्यांच्या प्रचारकार्य व वागणूकीने ते करतात.—रोमकर १०:१३–१५.
यहोवाच्या साक्षीदारासोबत चांगले परिचीत का होऊ नये? सोबत असणारा तक्ता त्याच्या काही विश्वासाची यादी शास्त्रवचनीय कारणमिमांसेसह देतो. साक्षीदारांच्या भक्ति प्रकाराची ही साधी परिक्षा घेऊन पाहा: पवित्रशास्त्रात घालून दिलेल्या देवाच्या सत्याच्या दर्जाची पूर्ती हाप्रकार करतो का? खऱ्या भक्तिचा भाग असणाऱ्या प्रीतीच्या शांतीदायक फळांची तो निर्मिती करतो का? तो देवाच्या नावाचा सन्मान करतो का? तो या सर्वांची पूर्ती करतो असे आढळल्यास तुम्हास देवास खरोखर संतुष्ट करणारा धर्म सापडल्यासारखेच असेल.
[६ पानावरील चौकट]
यहोवाच्या साक्षीदारांचे विश्वास
विश्वास पवित्रशास्त्र वचनीय आधार
देवाचे नांव यहोवा आहे निर्गम ६:३; स्तोत्रसंहीता ८३:१८
पवित्रशास्त्र देवाचे वचन आहे योहान १७:१७; २ तिमथ्यी ३:१६, १७
येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे मत्तय ३:१६, १७; योहान १४:२८
मनुष्य उत्क्रांतीपासून नव्हे तर उत्पन्न केला गेला उत्पत्ती १:२७; २:७
मानवाचे मरण आदामाच्या पापामुळे आहे रोमकर ५:१२
जीव मृत्युवेळी नष्ट होतो उपदेशक ९:५, १०; यहेज्केल १८:४
नरक मानवाची सर्वसाधारण कबर आहे इयोब १४:१३; प्रकटीकरण २०:१३; किंग जेम्स व्हर्शन
मृतांची आशा पुनरूत्थान आहे योहान ५:२८, २९; ११:२५; प्रेषितांची कृत्ये २४:१५
ख्रिस्ताचे पृथ्वीवरील जीवन आज्ञाधारक मानवजातीची खंडणी आहे मत्तय २०:२८; १ पेत्र २:२४; १ योहान २:१, २
प्रार्थना केवळ यहोवाकडेच ख्रितामार्फत केल्या जाव्यात मत्तय ६:९; योहान १४:६, १३, १४
पवित्रशास्त्राचे नैतिक कायदे पाळलेच पाहिजे १ करिंथकर ६:९, १०
भक्तीमध्ये मुर्तीचा उपायोग केला जावू नये निर्गम २०:४–६; १ करिंथकर १०:१४
भूतविद्या टाळलीच पाहिजे अनुवाद १८:१०–१२; गलतीकर ५:१९–२१
एखाद्याने आपल्या शरिरात रक्त घेऊ नये उत्पत्ती ९:३,४; प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९
ख्रिश्चनांने जगापासून वेगळे राखले पाहिजे योहान १५:१९; १७:१६; याकोब १:२७; ४:४
ख्रिश्चनांने “सुवार्ता” घोषित करून साक्ष दिलीच पाहीजे यशया ४३:१०–१२; मत्तय २४:१४; २८:१९, २०
देवास केलेल्या समर्पणाचे द्योतक म्हणून पूर्ण बुडून बाप्तीस्मा मार्क १:९, १०; योहान ३:२३; प्रेषितांची कृत्ये १९:४, ५
धार्मिक किताब चुकीचे आहेत इयोब ३२:२१, २२; मत्तय २३:८–१२
आम्ही “शेवटच्या काळात” आहोत दानिएल १२:४; मत्तय २४:३–१४; २ तिमथ्यी ३:१–५
ख्रिस्ताची उपस्थीती आत्मीक आहे मत्तय २४:३; योहान १४:१९; १ पेत्र ३:१८
सैतान या जगाचा अदृश्य अधिपती आहे योहान १२:३१; १ योहान ५:१९
देव सद्य दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करील दानिएल २:४४; प्रकटीकरण १६:१४, १६; १८:१–८
ख्रिस्ताच्या अधिपत्याखालील राज्य संपूर्ण पृथ्वीवर नीतीमत्वतेने राज्य करील यशया ९:६, ७; दानिएल ७:१३, १४; मत्तय ६:१०
“लहान कळप” ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करील लूक १२:३२; प्रकटीकरण १४:१–४; २०:४
ज्यांना देव संमती देतो ते इतर लोक पृथ्वीवरील नंदनवनात चिरकालीक जीवन प्राप्त करतील लूक २३:४३; योहान ३:१६
[५ पानांवरील चित्रं]
तुम्ही गवताच्या गंजीत सुई कशी शोधाल?
तुम्ही खरा धर्म कसा शोधाल?