वाचकांचे प्रश्न
▪ दानीएल २:३१–४५ मध्ये चित्रित केलेल्या “भव्य पुतळयाचे पाय व बोटे” काय सूचित करतात?
हा भविष्यवाद “रहस्य उलगडणाऱ्या” सर्वसमर्थ प्रभू देव यहोवा याने स्वतः प्रेरित केला होता, व तो त्याच्या कळसास, जगस्वामित्वाचा वाद एकदाच व सर्वकाळासाठी मिटविला जाईल त्या “शेवटल्या दिवसापर्यत” पोहंचतो. (दानीएल २:२८) “विदेशांचे काळ” जे इ.स.पू. ६०७ मध्ये सूरू झाले तेव्हांपासून अनुक्रमे जागतिक सत्ता आल्या ज्यांची सुरुवात बाबेलोनी साम्राज्य त्यानंतर मेद–पारस, ग्रीस, रोम, व अँग्लो–अमेरिकन अशी झाली. यांचे प्रतिनिधीत्व पुतळ्यातील धातूचे भाग करतात.—लूक २१:२४, किंग जेम्स व्हर्शन.
तथापि, १९१४ मधील विदेशांच्या काळांच्या समाप्ती सोबत वेगवेगळ्या मानवी राज्यांची रास या पृथ्वीवर उदयास आली. (मत्तय २४:३–१२) सर्वसामान्य मानवाने (भूतलावरील मातीचे बनविलेले “मानवजातीचे संतान”) राज्यसत्तांच्या गोष्टीवर महान प्रभाव टाकला. समाजवादी व लोकशाही सत्ता त्यांच्या इतर लोखंडासारख्या अन्यायदायी सरकारांच्या स्वरुपात सामोऱ्या आल्या. त्या “लोखंड व माती मिश्रित” प्रमाणे आहेत ज्या पुतळ्याचे पाय व बोटे याने सूचित होतात.
दहा “बोटा” बाबत विविध दृष्टिकोन व्यक्त केले जात आहेत. परंतु पवित्रशास्त्रात “दहा” हे बहुतेक वेळा पृथ्वीवरील गोष्टींची पूर्णता म्हणून उपयोगात आणला आहे हे पहाता दहा “बोटे” आजच्या दिवसात कळसास पोहंचलेल्या संपूर्ण पृथ्वीवरील सरकारांच्या व्यवस्थेचे प्रतिनिधीत्व करतात हे तर्कशुद्ध वाटते. या पुतळ्याच्या पाय व बोटा विरुद्ध “देवाचे राज्य” चूर्ण करण्यासाठी येते हीच मानवी सत्तेची गती आहे. त्यानंतर ख्रिस्ताची राज्यसत्ता शांती, समृद्धीने संबंध पृथ्वी व्यापून टाकील याबद्दल आम्ही केवढे उतराई असू शकतो बरे!a—मत्तय ६:९, १०; यशया ११:१, ९ पडताळा.
नबुखदनेस्सराचे स्वप्न पुढे दानीएल अध्याय ४ मध्ये वर्णिले आहे तेही विदेशांच्या काळांची समाप्ती नंतरच्या घटनाकडे निर्देश करते. सरतेशेवटी लोकांस कळून येईल की “मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो” व तो राजा येशू ख्रिस्त आहे.—दानिएल ४:२५; ७:१३, १४.
[तळटीपा]
a वॉचटॉवर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्युयॉर्क ने १९५८ मध्ये प्रसिद्ध केलेले “युवर विल बी डन ऑन अर्थ्” या प्रकाशनाची पृष्ठे १०८–२७, या “भव्य पुतळ्याच्या” अधीक तपशिलवार माहितीसाठी पाहा.