वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • yc पाठ ८ पृ. १८-१९
  • योशीयाचे मित्र चांगले होते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • योशीयाचे मित्र चांगले होते
  • आपल्या चिमुकल्यांना शिकवा
  • मिळती जुळती माहिती
  • योशीयाने योग्य ते करण्याचे ठरवले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • त्याने लोकांना यहोवाकडे परत आणलं
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • योशीयाचं देवाच्या नियमांवर प्रेम होतं
    बायबलमधून शिकू या!
  • नम्र योशीयावर यहोवाची कृपा होते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
आपल्या चिमुकल्यांना शिकवा
yc पाठ ८ पृ. १८-१९
राजा योशिया त्याचा मित्र यिर्मया याचे ऐकतो

धडा ८

योशीयाचे मित्र चांगले होते

जे बरोबर आहे ते करणं लोकांना सोपं वाटतं का?— बरोबर, सोपं नाही वाटत. बायबलमध्येपण एका मुलाबद्दल सांगितलंय ज्याला जे बरोबर आहे ते करणं सोपं वाटलं नव्हतं. त्याचं नाव होतं योशीया. पण त्याचे मित्र चांगले असल्यामुळं त्यांनी त्याला मदत केली. चल वाचून बघू या आपण योशीया आणि त्याच्या मित्रांबद्दल.

योशीयाच्या बापाचं नाव आमोन होतं. तो यहुदाचा राजा होता. तो खूप वाईट होता आणि मूर्तींची पूजा करायचा. तो मरून गेल्यानंतर योशीया त्याच्या जागी राजा झाला. पण तेव्हा तो फक्‍त आठ वर्षांचा होता. मग तोही त्याच्या बापासारखा वाईट होता का?— नाही. उलट तो खूप चांगला होता.

संदेष्टा सफन्या यहूदाच्या लोकांना यहोवाचा संदेश सांगतो

मूर्तींची पूजा करायची नाही, अशी ताकीद सफन्यानं लोकांना दिली

योशीया इतका लहान होता तरीपण तो यहोवाचं ऐकायचा. आणि त्यानं यहोवावर प्रेम करणाऱ्‍या लोकांनाच आपले फ्रेंड्‌स बनवले. या लोकांनी योशीयाला जे बरोबर आहे ते करायला मदत केली. कोणकोण होते योशीयाचे फ्रेंड्‌स?

एकाचं नाव होतं सफन्या. सफन्या लोकांना देवाचा संदेश सांगायचा. तुम्ही जर मूर्तींची पूजा करत राहिलात तर तुमच्यावर संकट येईल, असं त्यानं यहुदाच्या लोकांना बजावून सांगितलं. योशीयानं सफन्याचं ऐकलं आणि मूर्तींची नव्हे तर यहोवाची भक्‍ती केली.

योशीयाच्या आणखी एका फ्रेंडचं नाव होतं यिर्मया. तो योशीयाच्याच वयाचा होता. आणि ते जवळपास राहायचे, एकत्र खेळायचे. ते एकमेकांचे इतके चांगले दोस्त होते, की योशीया मेल्यानंतर यिर्मयाला त्याची खूप आठवण येत होती. त्यानं त्याच्यासाठी एक खास गाणंसुद्धा लिहिलं. यिर्मया आणि योशीया जे बरोबर आहे ते करायला आणि यहोवाचं ऐकायला एकमेकांना मदत करायचे.

योशीया आणि यिर्मया या दोघांनी जे बरोबर आहे ते करण्यास एकमेकांना मदत केली

योशीयाकडून आपण काय शिकतो?— योशीया आठच वर्षांचा होता तरीसुद्धा जे बरोबर आहे तेच करायचं त्यानं ठरवलं. यहोवावर प्रेम करणाऱ्‍या लोकांनाच आपण आपले दोस्त बनवले पाहिजेत हे त्याला माहीत होतं. तूपण यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांना व जे बरोबर आहे ते करायला तुला मदत करणाऱ्‍यांनाच आपले फ्रेंड्‌स बनव.

आपण वाचू या

  • २ इतिहास ३३:२१-२५; ३४:१, २; ३५:२५

प्रश्‍न:

  • योशीयाच्या बापाचं नाव काय होतं? त्यानं जे बरोबर आहे ते केलं का?

  • योशीया आठच वर्षांचा होता तरीसुद्धा त्यानं काय करायचं ठरवलं?

  • योशीयाच्या दोन फ्रेंड्‌सची नावं काय होती?

  • आपण योशीयाकडून काय शिकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा