वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • yc पाठ ९ पृ. २०-२१
  • यिर्मयानं लोकांना यहोवाबद्दल सांगायचं सोडलं नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यिर्मयानं लोकांना यहोवाबद्दल सांगायचं सोडलं नाही
  • आपल्या चिमुकल्यांना शिकवा
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा यिर्मयाला प्रचार करायला पाठवतो
    बायबलमधून शिकू या!
  • यिर्मयाने हाती घेतलेले काम अर्धवट सोडून दिले नाही
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • यिर्मया देवाचा न्यायदंड वदविणारा अप्रिय संदेष्टा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • यिर्मयासारखे निर्भय असा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
आपल्या चिमुकल्यांना शिकवा
yc पाठ ९ पृ. २०-२१

धडा ९

यिर्मयानं लोकांना यहोवाबद्दल सांगायचं सोडलं नाही

यिर्मयाच्या भोवती असलेले लोक त्याच्यावर चिडले आहेत

लोक यिर्मयावर का चिडलेत?

एका खोल विहिरीतून यिर्मयाला बाहेर काढले जात आहे

यहोवानं चांगल्या लोकांना पाठवून यिर्मयाला वाचवलं

आपण लोकांना यहोवाबद्दल सांगतो तेव्हा कधीकधी ते आपली टिंगल करतात किंवा आपल्यावर चिडतात. मग देवाबद्दल बोलायलाच नको असं वाटतं. तुला वाटलं का असं कधी?— बायबलमध्ये एका माणसाबद्दल सांगितलंय ज्याला यहोवाबद्दल बोलायलाच नको असं वाटलं होतं. त्याचं नाव आहे यिर्मया. चल वाचून बघू या त्याच्याविषयी आपण.

यहोवानं यिर्मयाला एक काम दिलं. तुम्ही वाईट वागायचं सोडून द्या, असं त्याला लोकांना सांगायचं होतं. हे काम सोपं नव्हतं. त्याला भीती वाटत होती. तो यहोवाला म्हणाला: ‘मी कसं करू हे काम, मी तर किती लहान आहे.’ मग यहोवा त्याला म्हणाला: ‘घाबरू नकोस, मी तुला मदत करेन.’

तेव्हापासून यिर्मयानं लोकांना सांगायला सुरुवात केली की जर ते बदलले नाहीत तर यहोवा त्यांना शिक्षा देईल. लोकांनी त्याचं ऐकलं का?— नाही. उलट त्यांनी त्याची टिंगल केली. काही लोक तर त्याच्यावर चिडलेसुद्धा. त्यांना त्याला मारून टाकायचं होतं. तेव्हा यिर्मयाला कसं वाटलं असेल?— तो घाबरला आणि म्हणाला: ‘मी नाही सांगणार आता यहोवाबद्दल कुणाला.’ मग त्यानं सांगितलंच नाही का लोकांना?— खरंतर त्याचं यहोवावर इतकं प्रेम होतं, की तो जास्त दिवस शांत बसूच शकला नाही. तो सांगू लागला, आणि यहोवानं त्याला दुष्ट लोकांपासून वाचवलं.

काही वाईट लोकांनी तर एकदा त्याला एका विहिरीत टाकलं. त्याला जेवण किंवा पाणी दिलं नाही. त्या लोकांना वाटलं हा असाच मरून जाईल. पण यहोवानं चांगल्या लोकांना पाठवून त्याला वाचवलं.

यिर्मयाकडून आपण काय शिकतो बरं?— कधीकधी त्याला भीती वाटली होती तरी त्यानं यहोवाबद्दल लोकांना सांगायचं थांबवलं नाही. आपण जेव्हा लोकांना यहोवाबद्दल सांगू तेव्हा लोक आपली टिंगल करतील किंवा आपल्यावर चिडतील. अशा वेळेला आपल्याला लाज किंवा भीती वाटेल. पण तरीसुद्धा आपण यहोवाबद्दल लोकांना सांगायचं सोडायचं नाही. यहोवानं यिर्मयाला जशी मदत केली तशी तो आपल्यालासुद्धा नेहमी करेल.

आपण वाचू या

  • यिर्मया १:४-८; २०:७-९; २६:८-१९, २४; ३८:६-१३

प्रश्‍न:

  • यहोवानं यिर्मयाला काय काम दिलं होतं?

  • यिर्मयानं यहोवाबद्दल सांगायचं का सोडून दिलं?

  • यहोवानं यिर्मयाला मदत कशी केली?

  • यिर्मयाकडून आपण काय शिकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा