वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ll भाग ७ पृ. १६-१७
  • येशू कोण होता?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशू कोण होता?
  • देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
  • मिळती जुळती माहिती
  • भाग ७
    देवाचं ऐका
  • येशू ख्रिस्ताबद्दलचं सत्य
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • येशू ख्रिस्त—देवाने पाठवलेला?
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • येशू ख्रिस्त कोण आहे?
    बायबल नेमके काय शिकवते?
अधिक माहिती पाहा
देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
ll भाग ७ पृ. १६-१७

भाग ७

येशू कोण होता?

यहोवाने येशूला पृथ्वीवर पाठवलं. १ योहान ४:९

स्वर्गात देवाच्या उजवीकडे असलेला येशू

आपल्याला जर यहोवाचं मन आनंदित करायचं असेल तर आपण आणखी एका महत्त्वाच्या व्यक्‍तीचं ऐकलं पाहिजे. आदामला निर्माण करायच्या बऱ्‍याच काळाआधी यहोवाने स्वर्गात एका शक्‍तिशाली स्वर्गदूताला निर्माण केलं होतं.

मरीया गरोदर असताना आणि येशूच्या जन्मानंतर

पुढे बऱ्‍याच वर्षांनंतर यहोवाने त्या स्वर्गदूताला बेथलेहेममध्ये मरीया नावाच्या एका कुमारीच्या पोटी जन्माला घातलं. तिने आपल्या मुलाचं नाव येशू ठेवलं.—योहान ६:३८.

येशू लोकांना यहोवाबद्दल शिकवत आहे

पृथ्वीवर असताना येशूच्या वागण्यातून लोकांना देवाचे गुण स्पष्टपणे दिसून आले. तो दयाळू आणि प्रेमळ होता. लोक त्याच्याजवळ जायला, त्याच्याशी बोलायला घाबरत नव्हते. त्याने न घाबरता लोकांना यहोवाबद्दल खरी माहिती दिली.

येशूने पुष्कळ चांगली कामं केली, तरी लोकांनी त्याचा द्वेष केला. १ पेत्र २:२१-२४

येशू एका मेलेल्या मुलीला पुन्हा जिवंत करत आहे आणि एका आजारी माणसाला बरं करत आहे

त्या काळातले धर्मपुढारी येशूचा द्वेष करायचे. कारण तो त्यांच्या खोट्या शिकवणींबद्दल आणि दुष्ट कामांबद्दल लोकांना उघडपणे सांगायचा.

येशूने लोकांचे आजार बरे केले आणि काही मेलेल्या लोकांनाही जिवंत केलं.

येशूचा छळ करून त्याला ठार मारण्यात आलं

धर्मपुढाऱ्‍यांनी रोमी अधिकाऱ्‍यांना येशूचा छळ करायला आणि त्याला ठार मारायला भडकावलं.

  • आपण येशूबद्दल जाणून घेणं का महत्त्वाचं आहे?—योहान १७:३.

  • पृथ्वीवर येण्याआधी येशू स्वर्गात काय करत होता?—कलस्सैकर १:१५-१७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा