वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ll भाग ८ पृ. १८-१९
  • येशूच्या मृत्यूमुळे तुम्हाला काय फायदा होतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशूच्या मृत्यूमुळे तुम्हाला काय फायदा होतो?
  • देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
  • मिळती जुळती माहिती
  • भाग ८
    देवाचं ऐका
  • देवाचं राज्य काय आहे?
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • येशू ख्रिस्त—देवाने पाठवलेला?
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • देवाचे राज्य काय आहे?
    बायबल नेमके काय शिकवते?
अधिक माहिती पाहा
देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
ll भाग ८ पृ. १८-१९

भाग ८

येशूच्या मृत्यूमुळे तुम्हाला काय फायदा होतो?

आपल्याला जीवन मिळावं म्हणून येशू मेला. योहान ३:१६

स्त्रिया येशूच्या रिकाम्या कबरेकडे पाहत आहेत

येशूच्या मृत्यूच्या तीन दिवसांनंतर काही स्त्रिया त्याच्या कबरेजवळ आल्या. त्यांना ती कबर रिकामी दिसली. कारण यहोवाने येशूला पुन्हा जिवंत केलं होतं.

येशू त्याच्या प्रेषितांना भेटतो, नंतर तो स्वर्गात घेतला जातो

नंतर येशू त्याच्या प्रेषितांना दिसला.

यहोवाने येशूला पुन्हा जिवंत केलं, तेव्हा त्याने त्याला माणसांसारखं शरीर दिलं नाही. तर त्याने त्याला स्वर्गदूतांसारखं अदृश्‍य शरीर दिलं. काही दिवसांनी येशू स्वर्गात परत गेला. त्याच्या शिष्यांनी त्याला स्वर्गात जात असताना पाहिलं. आता येशू कधीच मरणार नाही.

  • पापाची “मजुरी” काय आहे?—रोमकर ६:२३.

  • येशूमुळेच मानवांना कायम जगण्याची आशा मिळाली आहे.—रोमकर ५:२१.

देवाने येशूला पुन्हा जिवंत करून त्याला आपल्या राज्याचा राजा बनवलं. दानीएल ७:१३, १४

येशू आपल्या राजासनावरून, पृथ्वीवरच्या नंदनवनात राहणाऱ्‍या लोकांवर राज्य करत आहे

मानवजातीला पापाच्या गुलामीतून सोडवण्यासाठी किंमत किंवा खंडणी म्हणून येशूने त्याचं जीवन अर्पण केलं. (मत्तय २०:२८) या खंडणीमुळेच देव आपल्याला कायमचं जीवन देणार आहे.

संपूर्ण पृथ्वीवर राज्य करण्यासाठी यहोवाने येशूला राजा म्हणून नेमलं. येशूसोबत १,४४,००० विश्‍वासू लोक राजे म्हणून राज्य करतील. जेव्हा त्यांचा पृथ्वीवर मृत्यू होतो, तेव्हा त्यांना स्वर्गात पुन्हा जिवंत केलं जातं. येशू आणि १,४४,००० जणांचं मिळून स्वर्गात एक सरकार असेल. ते न्याय-नीतीने राज्य करेल. हे सरकार म्हणजेच देवाचं राज्य.—प्रकटीकरण १४:१-३.

देवाच्या राज्यात ही पृथ्वी एक सुंदर नंदनवन बनेल. त्या राज्यात युद्ध, गुन्हेगारी आणि गरिबी राहणार नाही. कोणालाही उपाशी राहावं लागणार नाही. सगळे लोक खूप आनंदी असतील.—स्तोत्र १४५:१६.

  • देवाच्या राज्यामुळे मानवांना कोणकोणते आशीर्वाद मिळतील?—स्तोत्र ७२.

  • देवाचं राज्य यावं अशी आपण प्रार्थना केली पाहिजे.—मत्तय ६:१०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा