वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g22 क्र. १ पृ. ३
  • संकटांच्या विळख्यात जग—कसा कराल सामना?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • संकटांच्या विळख्यात जग—कसा कराल सामना?
  • सावध राहा!—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • सावध राहा! च्या या अंकात
    सावध राहा!—२०२२
  • संभाषणासाठी विषय
    आमची राज्य सेवा—१९९१
  • अनुक्रमणिका
    सावध राहा!—२०२२
  • जास्त माहितीसाठी
    सावध राहा!—२०२५
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०२२
g22 क्र. १ पृ. ३
चिंतेत पडलेली एक स्त्री आपल्या मोबाईलवर बघत आहे. ती दंगलींची, नैसर्गिक विपत्तींची, आपल्या बाळाला घेतलेल्या असाहाय्य आईची, कोरोना विषाणूची आणि हॉस्पिटलची दृश्‍यं पाहत आहे.

संकटांच्या विळख्यात जग​—कसा कराल सामना?

आज जगात समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. तुम्हालाही अलीकडे या वाढत्या समस्यांची झळ बसली आहे का? तुम्ही राहता त्या भागात खाली दिलेल्या समस्या पाहायला मिळतात का?

  • युद्ध किंवा दंगली

  • साथीचे रोग

  • नैसर्गिक विपत्ती

  • गरिबी

  • द्वेष आणि भेदभाव

  • हिंसक अपराध

वाईट घटना घडतात तेव्हा बरेच लोक हादरून जातात. आता काहीच आशा उरली नाही असं त्यांना वाटतं. त्यांच्या भावना बधिर होऊन जातात. पण बऱ्‍याच काळापर्यंत अशा सुन्‍न मनःस्थितीत राहिल्यामुळे आपलं जास्तच नुकसान होऊ शकतं.

म्हणूनच, एखादी वाईट घटना घडते, तेव्हा सुन्‍न मनःस्थितीत राहण्याऐवजी आपण काही पावलं उचलली पाहिजे. असं केल्यामुळे आपल्या जवळच्या लोकांचं, आरोग्याचं, पोटापाण्याच्या साधनाचं आणि आपल्या मनाच्या शांतीचं आपल्याला संरक्षण करता येईल.

जगातल्या समस्यांचे तुमच्यावर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी तुम्हाला कोणती पावलं उचलता येतील?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा