वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g20 क्र. ३ पृ. १०-११
  • वेगवेळ्या लोकांशी मैत्री करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वेगवेळ्या लोकांशी मैत्री करा
  • सावध राहा!—२०२०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • समस्येचं मूळ कारण
  • बायबल कशी मदत करतं?
  • वेगवेगळ्या लोकांशी मैत्री केल्यामुळे कशी मदत होते?
  • तुम्ही काय करू शकता?
  • भेदभावाच्या भिंती त्यांनी मोडून टाकल्या
    सावध राहा!—२०२०
  • सगळ्यांवर प्रेम करा
    सावध राहा!—२०२०
  • विचार करून मित्र निवडा!
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • तुम्हाला मित्र बनवायचेत का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०२०
g20 क्र. ३ पृ. १०-११
वेगवेगळ्या संस्कृतीच्या चार स्त्रिया एकमेकींशी बोलत आहेत आणि हसत आहेत. मागे त्यांची मुलं एकत्र मिळून खेळत आहेत.

वेगवेळ्या लोकांशी मैत्री करा

समस्येचं मूळ कारण

ज्या लोकांबद्दल आपल्या मनात नकारात्मक भावना आहेत त्यांच्यापासून जर आपण दूर राहिलो, तर भेदभावाच्या भावनेला आपण आणखीनच खतपाणी घालत असू. आणि जर आपण आपल्यासारख्याच लोकांसोबत मैत्री केली, तर आपल्याला कदाचित असं वाटेल, की आपण ज्या पद्धतीने विचार करतो, काम करतो तीच बरोबर आहे.

बायबल कशी मदत करतं?

“आपली मने मोठी करा.”—२ करिंथकर ६:१३.

या शास्त्रवचनातून आपण काय शिकतो? ‘मन’ हे आपल्या भावनांना सूचित करू शकतं. त्यात प्रेमाची भावनाही आली. आपण जर फक्‍त आपल्यासारख्याच लोकांवर प्रेम केलं, तर आपली मनं मोठी आहेत असं म्हणता येणार नाही. आपल्या बाबतीत असं होऊ नये म्हणून आपण अशा लोकांशीही मैत्री करायला तयार असलं पाहिजे जे आपल्यापेक्षा वेगळे आहेत, हेच आपण शिकतो.

वेगवेगळ्या लोकांशी मैत्री केल्यामुळे कशी मदत होते?

आपण जेव्हा इतरांना जवळून ओळखू लागतो तेव्हा काही गोष्टी ते वेगळ्या पद्धतीने का करतात, हे आपल्याला समजायला लागतं. जसजसं त्यांच्यावरचं आपलं प्रेम वाढत जातं, तसतसं आपण हे विसरून जातो की ते एका वेगळ्या गटातले आहेत. आणि त्यांच्यासोबतची आपली मैत्री आणखी घट्ट होते. त्यामुळे जेव्हा त्यांना आनंद होतो, तेव्हा आपल्यालाही आनंद होतो; आणि त्यांना दुःख होतं, तेव्हा आपल्यालाही दुःख होतं.

नाझरी नावाच्या मुलीचा विचार करा. इतर देशांतून आलेल्या लोकांबद्दल तिला बरेच गैरसमज होते. पण तिचे हे गैरसमज कसे दूर झाले, त्याबद्दल ती असं सांगते: “मी त्यांच्यासोबत वेळ घालवला आणि काम केलं. तेव्हा मला जाणवलं, की त्यांच्याबद्दल बाकीचे लोक जे काही म्हणायचे ते चुकीचं आहे. त्यामुळे आपण जेव्हा एका वेगळ्या संस्कृतीच्या लोकांशी मैत्री करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं, की त्यातले सगळेच लोक एकसारखे नसतात. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल आपल्या मनात प्रेम आणि आदर वाढू लागतो.”

मित्र सांभाळून निवडा

काही लोकांना अशा सवयी असतात ज्या त्यांच्यासाठी आणि इतरांसाठीही हानिकारक असतात. त्यामुळे, आपण मित्रांची निवड सांभाळून केली पाहिजे. आपण जेव्हा बेईमानी करणाऱ्‍या किंवा अनैतिक जीवन जगणाऱ्‍या लोकांशी मैत्री करायचं टाळतो, तेव्हा याचा अर्थ असा होत नाही की आपण भेदभाव करतो. जे आपल्या नैतिक स्तरांचा आदर करत नाहीत, त्यांना आपण वाईटसाईट बोलू नये किंवा ते जे काही करतात त्यात आपण लुडबूड करू नये. अशा लोकांपासून दूर राहण्यातच शहाणपण आहे.—नीतिसूत्रे १३:२०.

तुम्ही काय करू शकता?

अशा लोकांशी बोलायचा प्रयत्न करा जे एका वेगळ्या देशाचे, भाषेचे किंवा जातीचे आहेत. त्यासाठी तुम्ही पुढे सांगितलेल्या गोष्टी करू शकता:

  • त्यांना स्वतःबद्दल काहीतरी बोलायला सांगा.

  • त्यांना जेवणाचं आमंत्रण द्या.

  • ते स्वतःबद्दल काही सांगतात, तेव्हा लक्ष देऊन ऐका. आणि त्यांना कोणत्या गोष्टी आवडतात त्या जाणून घ्या.

त्यांनी आयुष्यात काय-काय अनुभवलं आहे हे जर आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला, तर ते आपल्यापेक्षा वेगळे का आहेत हे आपल्याला समजेल. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल आणि त्या गटातल्या लोकांबद्दल आपल्याला आपुलकी वाटेल.

एक अनुभव: कंदस्वामी आणि सुकम्मा (कॅनडा)

“आम्ही दक्षिण आफ्रिकेत लहानाचे मोठे झालो होतो. त्या काळात, तिथे खूप मोठ्या प्रमाणावर रंगभेद केला जायचा. वेगवेगळ्या वंशाच्या लोकांना एकमेकांपासून वेगळं केलं जायचं, आणि ते कुठे राहतील हे त्यांच्या रंगावरून ठरवलं जायचं. त्यामुळे वेगवेगळ्या वंशाच्या गटांमधली द्वेषाची भावना आणखीनच वाढली. आम्ही गोऱ्‍या रंगाच्या लोकांचा खूप द्वेष करायचो. कारण त्यांच्यापैकी काही जण आमच्याशी फार वाईट वागले होते. त्या वेळी आपण भेदभाव करतोय हे आमच्या ध्यानीमनीही नव्हतं. उलट, तेच आमच्याशी भेदभाव करताएत असं आम्हाला वाटत होतं.”

“आमचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आम्ही आमची मनं “मोठी” केली. म्हणजेच, आम्ही वेगवेगळ्या वंशाच्या आणि रंगाच्या लोकांसोबत मैत्री केली. जसजसा आम्ही गोऱ्‍या रंगाच्या लोकांसोबत वेळ घालवू लागलो, तसतसं आम्हाला जाणवू लागलं, की त्यांच्यात आणि आमच्यात फारसा फरक नाही. आम्ही आयुष्यात जे काही अनुभवलं होतं, ज्या समस्यांचा सामना केला होता त्या जवळपास सारख्याच होत्या, हे आमच्या लक्षात आलं.”

“पुढे आम्हाला एका गोऱ्‍या रंगाच्या जोडप्याचा पाहुणचार करायची संधी मिळाली. ते बरेच दिवस आमच्याकडे राहिले. त्यामुळे आम्ही त्यांना जवळून ओळखू शकलो. काही काळातच आम्ही एकमेकांचे चांगले मित्र बनलो. आणि त्यामुळे, गोऱ्‍या लोकांबद्दल एकेकाळी मनात असलेली द्वेषाची भावना कायमची नाहीशी झाली!”

जिवाभावाचे मित्र

जॉनी आणि गिडीयन यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहाच्या बाहेर उभे राहून मुलांचं स्वागत करत आहेत.

जॉनी आणि गिडीयन हे दोघं वेगवेळ्या वंशाचे होते आणि त्यांची राजकीय मतंही वेगवेगळी होती. पण तरी ते जिवाभावाचे मित्र बनले.

जॉनी आणि गिडीयन: एकेकाळचे शत्रू, आता मित्र झाले,  हा व्हिडिओ jw.org/mr या वेबसाईटवर पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा