वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g20 क्र. ३ पृ. १२-१३
  • सगळ्यांवर प्रेम करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सगळ्यांवर प्रेम करा
  • सावध राहा!—२०२०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • समस्येचं मूळ कारण
  • बायबल कशी मदत करतं?
  • तुम्ही काय करू शकता?
  • भेदभावाच्या भिंती त्यांनी मोडून टाकल्या
    सावध राहा!—२०२०
  • भेदभाव​—⁠हा आजार तुम्हाला झाला आहे का?
    सावध राहा!—२०२०
  • मला अन्यायाविरुद्ध लढायचं होतं
    बायबलमुळे जीवन बदलतं
  • भेदभावाची पाळेमुळे
    सावध राहा!—२००४
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०२०
g20 क्र. ३ पृ. १२-१३
एक भारतीय स्त्री, एका वयस्कर युरोपियन स्त्रीला जिना चढायला आणि तिचं सामान उचलायला मदत करत आहे.

सगळ्यांवर प्रेम करा

समस्येचं मूळ कारण

भेदभावाची भावना लगेच नाहीशी होत नसते. जसा एखादा आजार बरा होण्यासाठी वेळ लागतो आणि त्यासाठी बरीच खटपट करावी लागते, तसंच भेदभावाची भावना नाहीशी होण्यासाठीही वेळ लागतो आणि त्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. तर मग मनातून ही भावना काढून टाकण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

बायबल कशी मदत करतं?

चित्रं: १. हातात कॉफीचे कप्स घेऊन जाणाऱ्‍या एका काळ्या वर्णाच्या माणसासाठी आशियातला एक माणूस दार उघडतो. २. काळ्या वर्णाचा तो माणूस आपल्या कामावरच्या सोबत्यांना कॉफी देत आहे. त्यांच्यात आधी दाखवलेली भारतीय स्त्रीसुद्धा आहे.

“प्रेमाचे वस्त्र घाला, कारण हे ऐक्याचे परिपूर्ण बंधन आहे.”—कलस्सैकर ३:१४.

या शास्त्रवचनातून आपण काय शिकतो? हेच, की आपण जेव्हा इतरांसाठी चांगल्या गोष्टी करतो तेव्हा त्यांच्यातलं आणि आपल्यातलं प्रेम वाढतं. जसजसं हे प्रेम वाढतं तसतशी भेदभावाची आणि द्वेषाची भावना मनातून नाहीशी होते.

तुम्ही काय करू शकता?

चित्रं: १. एक भारतीय स्त्री, एका वयस्कर युरोपियन स्त्रीला जिना चढायला आणि तिचं सामान उचलायला मदत करत आहे. २. ती वयस्कर युरोपियन स्त्री तिच्या शेजाऱ्‍याला, म्हणजे आधी दाखवलेल्या आशियातल्या माणसाला बिस्किट्‌स देत आहे.

समाजातल्या ज्या गटाबद्दल तुमच्या मनात नकारात्मक भावना आहे त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी तुम्ही काय करू शकता याचा विचार करा. त्यासाठी खूप मोठमोठ्या गोष्टी करायची गरज नाही. पुढे सांगितलेल्या छोट्याछोट्या गोष्टीही तुम्ही करू शकता. जसं की:

तुम्ही इतरांसाठी जितक्या चांगल्या गोष्टी कराल तितकीच भेदभावाची भावना तुमच्या मनातून नाहीशी होईल

  • प्रवास करत असताना तुम्ही त्यांना आपली सीट देऊ शकता किंवा त्यांचं सामान उचलायला त्यांना मदत करू शकता. असं करून तुम्ही दाखवता की तुम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे.

  • त्यांना तुमची भाषा नीट बोलता येत नसली, तरी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करा.

  • ते वेगळं का वागतात हे समजत नसलं तरी त्यांच्याशी धीराने वागा.

  • ते आपल्या समस्या सांगतात तेव्हा त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा.

एक अनुभव: नाझरी (गिनी बिसाऊ)

“दुसऱ्‍या देशांतून आलेल्या लोकांबद्दल एकेकाळी माझ्या मनात द्वेषाची भावना होती. कारण माझ्या असं ऐकण्यात आलं होतं, की हे लोक खोटं बोलून सरकारकडून मदत मिळवतात. आणि यांच्यापैकी बरेच जण चुकीची कामं करतात. म्हणून मला ते लोक आवडत नव्हते. पण मी भेदभाव करतेय असं मला मुळीच वाटत नव्हतं. कारण या लोकांबद्दल बाकीचे बहुतेक लोक असाच नकारात्मक विचार करायचे.”

“नंतर मला जाणवलं, की त्यांच्याबद्दल माझ्या मनात भेदभावाची भावनाय. पण बायबलमध्ये दिलेल्या व्यावहारिक सल्ल्यामुळे त्यांच्यावर प्रेम करायला मला मदत झाली. आता मी त्यांना टाळत नाही, उलट त्यांच्याशी बोलायचा आणि त्यांना जवळून ओळखायचा प्रयत्न करते. त्यांच्यासोबत वेळ घालवायला मला आवडतं.”

“मला अन्यायाविरुद्ध लढायचं होतं”

रफीका मौरिस.

जातीवरून, वंशावरून होणाऱ्‍या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी रफीका एका क्रांतिकारी गटात सामील झाली. पण तिला लोकांमध्ये जी एकता पाहायची होती, ती यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनात पाहायला मिळाली.

रफीका मौरिस: मैं अन्याय के खिलाफ लड़ना चाहती थी,  हा व्हिडिओ jw.org/hi या वेबसाईटवर पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा