वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g20 क्र. ३ पृ. ४-५
  • संपूर्ण माहिती मिळवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • संपूर्ण माहिती मिळवा
  • सावध राहा!—२०२०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • समस्येचं मूळ कारण
  • बायबल कशी मदत करतं?
  • संपूर्ण माहिती मिळवल्यामुळे कशी मदत होते?
  • तुम्ही काय करू शकता?
  • भेदभाव​—⁠हा आजार तुम्हाला झाला आहे का?
    सावध राहा!—२०२०
  • पूर्वग्रहास तुम्ही बळी पडलेले आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • भेदभावांचा अंत
    सावध राहा!—२००४
  • भेदभावाची नाना रूपे
    सावध राहा!—२००४
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०२०
g20 क्र. ३ पृ. ४-५
गाड्यांच्या कंपनीतली दोन माणसं एका स्त्रीचा इंटरव्ह्यू घेत आहेत. ती घाबरलेली दिसते.

संपूर्ण माहिती मिळवा

समस्येचं मूळ कारण

भेदभाव हा सहसा चुकीच्या माहितीमुळे केला जातो. काही उदाहरणांचा विचार करा:

  • काहींचं असं चुकीचं मतं आहे, की स्त्रिया अशी कामं करू शकत नाहीत ज्यांमध्ये कौशल्याची, ताकदीची किंवा बुद्धीची गरज असते.

  • बरेच जण असा चुकीचा विचार करतात, की जर आपण खालच्या जातीत लग्न केलं, तर आपण अशुद्ध होऊ.

  • काही लोकांचा असा गैरसमज आहे, की ज्यांना एखादी शारीरिक दुर्बलता असते ते सहसा दुःखी किंवा निराश असतात.

अशा गोष्टींवर विश्‍वास ठेवणारे अनेक जण, आपलं मत पटवून देण्यासाठी बऱ्‍याच गोष्टी सांगतात. आणि ज्यांना त्यांचे विचार पटत नाहीत त्यांना काहीच कळत नाही, असं त्यांचं म्हणण असतं.

बायबल कशी मदत करतं?

“मनुष्य ज्ञानाविना असणेही बरे नाही.”—नीतिसूत्रे १९:२, पं.र.भा.

या शास्त्रवचनातून आपण काय शिकतो? हेच, की लोकांबद्दल आपल्याजवळ संपूर्ण माहिती नसेल किंवा ऐकलेल्या गोष्टींवर आपण विश्‍वास ठेवला, तर त्या लोकांबद्दल आपण चुकीची मतं बनवू शकतो.

बायबल भेदभाव करायला शिकवतं का?

काहींचं असं म्हणणं आहे, की बायबल भेदभाव करायला शिकवतं. पण बायबल नेमकं काय शिकवतं?

  • सगळ्यांचा उगम एकच आहे: देवाने “एका माणसाद्वारे सर्व राष्ट्रे बनवली.”—प्रेषितांची कार्ये १७:२६.

  • देव भेदभाव करत नाही: “देव भेदभाव करत नाही, तर प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भीती बाळगून योग्य ते करतो, त्याचा तो स्वीकार करतो.”—प्रेषितांची कार्ये १०:३४, ३५.

  • देव बाहेरचं रूप पाहत नाही, तर मन पाहतो: “मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्‍वर हृदय पाहतो.”—१ शमुवेल १६:७.

संपूर्ण माहिती मिळवल्यामुळे कशी मदत होते?

आपण जर समाजातल्या विशिष्ट लोकांबद्दल संपूर्ण माहिती मिळवली, तर त्यांच्याबद्दल इतर जण सांगत असलेल्या खोट्या माहितीवर आपण विश्‍वास ठेवणार नाही. तसंच, समाजातल्या एखाद्या गटाबद्दल आपण स्वतःही काही चुकीची मतं बनवली असतील, तर खरं काय आहे हे जाणून घेतल्यानंतर आपण ती मतं बदलण्याचा प्रयत्न करू.

एक अनुभव: योवीट्‌स (दक्षिण-पूर्व युरोप)

आधीच्या लेखात ज्या योवीट्‌सबद्दल आपण पाहिलं होतं, त्याने लहानपणापासूनच समाजातल्या एका विशिष्ट गटाबद्दल वाईट ऐकलं होतं. कारण बातम्यांमध्ये आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये त्या गटाबद्दल नेहमी नकारात्मक गोष्टीच सांगितल्या जायच्या. तो म्हणतो: “त्यामुळे त्या गटाबद्दल माझ्या मनात भेदभावाची आणि द्वेषाची भावना ठासून भरली होती. आणि मला असं वाटायचं, की त्यांच्याबद्दल मी जे काही मत बनवलंय ते योग्यच आहे.”

“पण मी सैन्यात होतो तेव्हा या गटातल्या सैनिकांसोबत राहण्याशिवाय आणि त्यांच्यासोबत काम करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. हळूहळू त्यांच्याबद्दल बऱ्‍याच गोष्टी मला समजू लागल्या. मी त्यांची भाषा शिकू लागलो आणि त्यांची गाणीही ऐकू लागलो. मला त्यांच्यासोबत राहायला आवडू लागलं आणि त्यांच्याबद्दल असलेलं माझं मत मी बदललं. पण मला माहीतय, की भेदभावाची भावना पुन्हा मनात येऊ शकते. त्यामुळे त्या गटाबद्दल नकारात्मक गोष्टी सांगणाऱ्‍या बातम्या ऐकायचं मी टाळतो. तसंच, त्यांची थट्टा करणारे चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमही मी पाहत नाही. कारण भेदभावाच्या भावनेला आवर घातला नाही, तर पुढे तिचं रूपांतर रागात आणि द्वेषात होऊ शकतं, हे मला माहीतय.”

तुम्ही काय करू शकता?

  • समाजातल्या एखाद्या गटाबद्दल काही जण असं म्हणतील, की त्यातले लोक खूप वाईट आहेत. पण त्या गटातले सगळेच लोक वाईट असू शकत नाहीत, हे लक्षात ठेवा.

  • त्या गटाबद्दल आपल्याकडे सगळीच माहिती नाही हे मान्य करा.

  • त्यांच्याबद्दल खरं काय ते जाणून घ्या.

त्यांनी द्वेषावर विजय मिळवला

चित्रं: १. दोन माणसं चालता चालता एकमेकांशी बोलत आहेत. २. एक माणूस मित्रांच्या सहवासात खूश दिसत आहे.

अरब समाजातल्या एका माणसाला आणि ज्यू समाजातल्या एका माणसाला आपल्या मनातून भेदभाव काढून टाकायला कशी मदत झाली?

एकनिष्ठ प्रेमाचा द्वेषावर पूर्णपणे विजय केव्हा होईल?  हा व्हिडिओ jw.org/mr या वेबसाईटवर पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा