वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 २/८ पृ. ३१
  • सेफ्टी बेल्ट बांधा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेफ्टी बेल्ट बांधा
  • सावध राहा!—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • मी गाडी चालवणं सोडून द्यावं का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • मोटार अपघात तुम्ही सुरक्षित आहात का?
    सावध राहा!—२००२
  • अपघातांपासून आपल्या मुलांना सांभाळा
    सावध राहा!—१९९९
सावध राहा!—१९९८
g98 २/८ पृ. ३१

सेफ्टी बेल्ट बांधा

◼संयुक्‍त संस्थानांत, ५ ते २४ वयोगटातील युवकांच्या मृत्यूचे एक आद्य कारण म्हणजे मोटारगाड्यांचे अपघात.

◼जपानमध्ये, रस्त्यावरील अपघातामुळे ओढवणारे मृत्यूचे प्रमाण, स्तन कर्करोगामुळे होणाऱ्‍या मृत्यूच्या दुप्पट तर, अष्ठीला कर्करोगामुळे होणाऱ्‍या मृत्यूच्या चौपट आहे.

◼युरोपमध्ये, कार अपघातामुळे ओढवणारे मृत्यू प्रमाण खूनांच्या चौपट आहेत.

हीधक्कादायक आकडेवारी, मोटारगाडीने प्रवास करण्याच्या एका मोठ्या धोक्यावर जोर देते—वेग मारक असू शकतो. किंबहुना, मद्याच्या नशेत वेगाने वाहन चालवणे म्हणजे खून करणेच होय. पण आनंदाची गोष्ट अशी, की अपघातांचे व जखमी होण्याचे धोके कमी करणे शक्य आहे. ते कसे?

सुरक्षित वाहन चालन सवयी विकसित करण्यापासून सुरवात करावी. काही सुरक्षा तज्ज्ञ असे प्रतिपादन करतात, की १० पैकी ९ अपघात टाळता किंवा चुकवता येण्यासारखे असतात. निर्धारित गती मर्यादा ओलांडणे, सतत लेन बदलत राहून इतर वाहनांना ओव्हरटेक करणे, पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवून वाहन न चालवणे, मद्य किंवा मादक पदार्थांच्या नशेत वाहन चालवणे व सुस्थितीत नसलेली कार चालवणे ही, असुरक्षित वाहन चालन सवयींची केवळ काही उदाहरणे आहेत. जीवनाबद्दलच्या आदराने व सहमानवांवरील प्रेमाने, वाहन चालवण्यासंबंधी आपल्याला एक सावध व जबाबदार मनोवृत्ती बाळगण्यास प्रवृत्त केले पाहिजे.—मत्तय ७:१२.

सेफ्टी बेल्ट्‌स देखील आणखीन एक साधे पण अनेकदा दुर्लक्षित केलेले सुरक्षा माध्यम आहे. यु.एस. डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टचे प्रवक्‍ते, टिम हर्ड यांच्या मतानुसार, “सेफ्टी बेल्ट, अपघातातून आपला जीव वाचविण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे जीव वाचण्याची शक्यता द्विगुणित होते.” लहानग्यांनी चाईल्ड सेफ्टी सीटचा उपयोग केल्यास या लहानग्या प्रवाशांचे बचाव प्रमाण जवळजवळ तिप्पट होते.a

सुरक्षा साधनांचे एवढे फायदे असूनही सर्वेक्षणे सूचित करतात, की संयुक्‍त संस्थानांत प्रवासी वाहनांतील जवळजवळ एक तृतीयांश प्रवासी, सेफ्टी बेल्ट्‌सचा उपयोगच करत नाहीत. वाहनातून प्रवास करण्याआधी तुमच्या मुलांचे सेफ्टी बेल्ट्‌स बांधलेले आहेत की नाही याची, पालक या नात्याने तुम्ही खात्री करता का? सेफ्टी बेल्ट बांधण्यास खर्च केलेल्या वेळाचे पुढे सार्थकच होते.

[तळटीप]

a राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा प्रशासन असा सल्ला देते: “वाहनामध्ये रेअर फेसींग चाईल्ड सीटमध्ये बसणाऱ्‍या मुलांना, प्रवासी एअर बॅग्स जोडलेल्या कारमधील पुढील सीटवर बसवू नये. प्रसरण पावणाऱ्‍या एअर बॅगचा, रेअर फेसींग चाईल्ड सीटवर जोर पडून बालकाला हानी पोहंचू शकते.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा