वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 २/८ पृ. ३२
  • “तुम्ही एक महान जनसेवा करत आहात”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “तुम्ही एक महान जनसेवा करत आहात”
  • सावध राहा!—१९९८
सावध राहा!—१९९८
g98 २/८ पृ. ३२

“तुम्ही एक महान जनसेवा करत आहात”

भारतातील, गोव्यात राहणाऱ्‍या एका मनुष्याने, आपल्या घरी आलेल्या दोन यहोवाच्या साक्षीदारांकडून सावध राहा! नियतकालिकांच्या दोन प्रती घेतल्या. त्या वाचल्यानंतर त्याने नियतकालिकाच्या प्रकाशकांना जे पत्र लिहिले, ते असे आहे:

“काही दिवसांपूर्वीच, माझ्या घरी येऊन सावध राहा! नियतकालिकाच्या प्रती देणाऱ्‍या त्या दोन स्त्रियांचे मी आभार मानले पाहिजेत. निव्वळ मत प्रसाराच्या उद्देशाने काढलेली नियतकालिकं समजून काही दिवसांपर्यंत मी त्यांना हातही लावला नाही. पण एकदा, “ॲमेझॉन पर्जन्यारण्ये” (मार्च २२, १९९७, इंग्रजी) यावरील एका नियतकालिकांवर माझी सहज नजर गेली. मी वाचू लागलो आणि पाहता पाहता संपूर्ण नियतकालिक काळजीपूर्वक वाचून काढलं.

“सावध राहा! नियतकालिकातील माहिती मला अतिशय चित्तवेधक व बोधप्रद वाटली. त्यातील वैविध्यपूर्ण विषय देखील आकर्षक वाटले. एक गोष्ट मला विशेष भावली आणि ती म्हणजे अगदी समंजस व संतुलितपणे त्यातील विविध लेख लिहिले गेले आहेत.”

आयुष्यात पहिल्यांदाच सावध राहा! वाचणाऱ्‍या या व्यक्‍तीने असेही म्हटले: “ही मौल्यवान माहिती घरोघर पोहंचवण्याद्वारे तुम्ही एक महान जनसेवा करत आहात.”

सावध राहा! नियतकालिकाचे वाचन केल्याने तुम्हालाही लाभ होऊ शकतो. तुम्हाला ते हवे असल्यास अथवा बायबलची चर्चा करण्यासाठी कोणी तुमच्या घरी यावे अशी तुमची इच्छा असल्यास, कृपया Praharidurg Prakashan Society, Plot A/35, Nr Industrial Estate, Nangargaon, Lonavla 410 401, Mah., India, किंवा पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर लिहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा