वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ११/८ पृ. ८-११
  • त्रासमुक्‍त परादीस लवकरच वास्तविकता बनेल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • त्रासमुक्‍त परादीस लवकरच वास्तविकता बनेल
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • परादीस स्थापणारी शक्‍ती
  • सद्य वस्तुस्थिती
  • “नंदनवनात भेटू या!”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • हर्मगिदोनानंतर नंदनवन झालेली पृथ्वी
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • परादीसकडे परतीचा प्रवास
    सावध राहा!—१९९७
  • आध्यात्मिक परादीस काय आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 ११/८ पृ. ८-११

त्रासमुक्‍त परादीस लवकरच वास्तविकता बनेल

“आज, मी तुला खचित सांगतो, तू माझ्यासोबत परादीसमध्ये असशील.” गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या त्या व्यक्‍तीला या शब्दांमुळे किती सांत्वन मिळाले असेल! आपण मेल्यावर अग्नीमय नरकात जाणार नाही तर आपल्याला स्वर्गात जायला मिळणार असे त्याला वाटले नाही. उलट, या पृथ्वीवर परादीस स्थापले जाईल तेव्हा त्याचे पुनरुत्थान होईल या आशेमुळे येशूच्या बाजूला असलेल्या चोराला सांत्वन मिळाले. जरा लक्ष द्या की परादीसविषयीचे हे उल्लेखनीय बोल कोणाचे होते—खुद्द देवाचा पुत्र, येशू ख्रिस्ताचे.—लूक २३:४३, NW.

ख्रिस्ताने परादीसचे वचन का दिले? त्या चोराने तर अशी विनंती केली होती: “हे येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर.” (लूक २३:४२, पं.र.भा.) हे राज्य काय आहे आणि त्याचा आणि पार्थिव परादीसचा काय संबंध? आणि यामुळे परादीस त्रासरहित असेल याची शाश्‍वती कशी मिळते?

परादीस स्थापणारी शक्‍ती

सद्य काळातल्या अडीअडचणी नाहीशा होतील तेव्हाच पृथ्वीवर खरे परादीस स्थापन होऊ शकेल हे तुम्हाला मान्य करावेच लागेल. या अडीअडचणी काढून टाकण्यात मानवांचे प्रयत्न फोल ठरलेत हे इतिहासाने सिद्ध केले आहे. इब्री संदेष्टा, यिर्मया याने कबूल केले: “हे परमेश्‍वरा, मला ठाऊक आहे की . . . पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) तर मग, सद्याच्या अडीअडचणी कोण दूर करू शकेल?

खराब हवामान आणि प्रदूषण. गालील समुद्रावरील जोरदार तुफानामुळे जेव्हा लाटा खवळल्या आणि जहाज पालटण्याची भीती होती तेव्हा नाविकांनी आपल्यासोबत प्रवास करणाऱ्‍या व्यक्‍तीला झोपेतून जागे केले. त्या व्यक्‍तीने समुद्राला फक्‍त “उगा राहा! शांत हो!” असे म्हटले. मार्कचे शुभवर्तमान पुढे काय घडले त्याचा अहवाल देते: “मग वारा पडला व अगदी निवांत झाले.” (मार्क ४:३९) तो सोबतचा प्रवासी म्हणजे येशूच होता. हवामानावर नियंत्रण करण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे होते.

याच येशूने, देव, “पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा नाश” करील असे भाकीत प्रेषित योहानाकरवी केले. (प्रकटीकरण १:१; ११:१८) नोहाच्या दिवसातील जलप्रलयात अधार्मिक लोकांचे जगच्या जग नाश केलेल्या व्यक्‍तीसाठी हा काही अशक्य कोटीतला पराक्रम नाही.—२ पेत्र ३:५, ६.

गुन्हेगारी आणि हिंसा. बायबल अभिवचन देते: “दुष्कर्म करणाऱ्‍यांचा उच्छेद होईल; पण परमेश्‍वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील. पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” (स्तोत्र ३७:९, ११) पुन्हा एकवार यहोवा देवच गुन्हेगारी आणि हिंसा काढून केवळ लीन लोकांकरता परादीस स्थापण्याचे अभिवचन देतो.

गरिबी आणि भूक. सध्याच्या अन्यायामुळे जगातल्या एका कोपऱ्‍यातली सरकारे अन्‍नाचा “भरमसाट” साठा ठेवतात तर गरीब राष्ट्रे गरिबीतच दिवस कंठतात. जगभरातल्या काळजीवाहू लोकांचे पाठबळ असलेल्या निवारण एजेन्सीस मूलभूत गरजा पुरवतात खऱ्‍या पण न्याय आणि व्यवस्था नसल्यामुळे जेव्हा हे वाटप कार्यक्रम कोलमडतात तेव्हा त्यांचे प्रयत्न विफल होतात. याच्या विषमतेत संदेष्ट्या यशयाने काय लिहून ठेवले ते पाहा: “सेनाधीश परमेश्‍वर ह्‍या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्‍नाची, मेजवानी राखून ठेवलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करीत आहे; उत्कृष्ट मिष्टान्‍नाची व राखून ठेविल्यावर गाळलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करीत आहे.” (यशया २५:६) दुष्काळ आणि उपासमार होणार नाही असे वाटत नाही का? अगदीच.

युद्ध. या पृथ्वीवर अधिराष्ट्रीय अधिकाराचे नियंत्रण असण्याचे प्रयत्नही विफल ठरले आहेत. सन १९२० मध्ये स्थापलेला राष्ट्र संघ दुसऱ्‍या महायुद्धाचा उद्रेक थांबवू शकला नाही आणि तो कोलमडला. शांतीची सर्वोत्तम आशा मानल्या जाणाऱ्‍या संयुक्‍त राष्ट्रसंघाला, झगडे होतात तेव्हा विरोधी पार्ट्यांना दूर ठेवता ठेवता नाकात दम येतो. त्याच्या जाहीर केलेल्या शांतीच्या प्रयत्नांव्यतिरिक्‍त मुलकी, जातीय किंवा सामाजिक युद्धांचा धडाका सुरूच आहे. देवाचे राज्य सरकार, सद्य काळातल्या युद्ध करणाऱ्‍या घटकांचा नायनाट करून आपल्या प्रजेला शांतीचे शिक्षण देण्याचे वचन देते.—यशया २:२-४; दानीएल २:४४.

कुटुंब आणि नैतिक ऱ्‍हास. कुटुंबांचे मोडकळीस येणे सर्रास होत चालले आहे. बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अनैतिकता मानवी समाजाच्या सर्व स्तरांमध्ये बोकाळली आहे. तरीही, अगदी सुरवातीपासून देवाच्या दर्जांमध्ये काहीच फरक झालेला नाही. येशूने यास पुष्टी दिली की, “पुरुष आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील . . . म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.” (मत्तय १९:५, ६) यहोवा देवाने पुढे आज्ञा दिली: “आपला बाप व आपली आई ह्‍यांचा मान राख, ह्‍यासाठी की, तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायु असावे.” (इफिसकर ६:२, ३) पृथ्वीवर देवाच्या राज्यात असे दर्जे असतील.

आजारपण आणि मृत्यू. “परमेश्‍वर . . . आम्हास तारील,” असे संदेष्ट्या यशयाने वचन दिले आणि “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” (यशया ३३:२२, २४) “पापाचे वेतन मरण आहे,” हे ख्रिस्ती प्रेषित पौलाने मान्य केले “पण देवाचे कृपादान आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.”—रोम ६:२३.

आपला पुत्र, ख्रिस्त येशू याच्या अधिकाराधीन असलेल्या स्वर्गीय सरकाराद्वारे यहोवा देव सर्व अडीअडचणींना दूर करील. पण, तुम्ही म्हणाल, ‘हे तर युटोपियन स्वप्नासारखंच वाटतंय. हे पूर्ण झालं तर आनंदच आनंद पण ते पूर्ण होईल का?’

सद्य वस्तुस्थिती

अनेकांना, या पृथ्वीवर त्रासमुक्‍त परादीसमध्ये जगण्याची शक्यता अवास्तविक अपेक्षा वाटते. तुम्हाला तसे वाटत असल्यास, हे खरेच घडेल याचा पुरावा तपासून पाहा.

यहोवाच्या साक्षीदारांचा वर्तमान दिवसातील एक आंतरराष्ट्रीय समाज आहे; हा समाज ५० लाखांहून अधिक लोकांचा असून २३३ देशांमध्ये विखुरलेल्या त्यांच्या ८२,००० मंडळ्यांमध्ये तुलनात्मकरित्या त्रासरहित वातावरण आहे. त्यांच्या लहान असो की मोठ्या, कोणत्याही एकत्रीकरणात तुम्ही गेलात तर तुम्हाला काय आढळेल?

(१) सुखद, स्वच्छ वातावरण. इंग्लंडच्या नॉर्वीच येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या एका अधिवेशनाबद्दल सांगताना फुटबॉल स्टेडियमचे व्यवस्थापक म्हणाले: “चार दिवसांचे ते शांतीमय वातावरण पाहून आपल्या मनालाही . . . शांती वाटू लागते. धकाधकीच्या व्यापार जगातल्या आणि आपल्या दररोजच्या जीवनातल्या चार दिवसांमध्ये वाटणार नाही असा निवांतपणा तिथं जाणवतो. हे साक्षीदार खरंच जगावेगळे आहेत आणि त्याचं कारण आपल्याला सांगता येत नाही.”

यहोवाच्या साक्षीदारांच्या लंडनमधील दफ्तरांना भेट दिलेल्या एका बांधकाम उद्योगाच्या प्रशिक्षण सल्लागाराने म्हटले: “मी जे पाहिलं आणि ऐकलं त्याने मी खूप प्रभावित झालो आणि तुमच्या निवासस्थानांमध्येच नाही तर [पुरुष आणि स्त्रियांमध्येही] संपूर्ण शांतीचं आणि समाधानाचं वातावरण पाहून तर मी चाटच पडलो. मला वाटतं की तुमच्या राहणीमानावरून आणि आनंदावरून हे त्रस्त जग पुष्कळ काही शिकू शकतं.”

(२) सुरक्षितता आणि शांती. कॅनडातल्या झुरनाल दी मोनरेआलच्या एका महिला पत्रकाराने लिहिले: “मी एक साक्षीदार नाही. पण साक्षीदार, कार्यक्षमता आणि सद्वर्तन दाखवतात या गोष्टीची मी साक्ष देते. . . . जगामध्ये फक्‍त त्यांचीच वसती असती तर आपल्याला रात्री दरवाजांना कडी लावावी लागली नसती किंवा चोरांसाठी आलाराम लावून घ्यायची गरजच भासली नसती.”

(३) देवाच्या राज्य सरकाराप्रती निष्ठा हे साक्षीदारांचे गुणलक्षण आहे. त्यांच्या तटस्थ भूमिकेचा काहींना राग येतो पण तसा राग येण्याची आवश्‍यकता नाही. ते सध्याच्या जोडगिरीच्या राजकीय योजनांमध्ये भाग घेत नाहीत म्हणजे समाज सुधारण्यात त्यांना काही आस्था नाही असे नाही. उलट, स्वर्गीय सरकाराद्वारे राज्य करणाऱ्‍या व्यक्‍तीला अर्थात पृथ्वीच्या निर्माणकर्त्या यहोवा देवाला संतुष्ट करणाऱ्‍या पद्धतीने ते वागण्याचा प्रयत्न करतात.

साक्षीदारांचे विश्‍वास, देवाच्या वचनावर अर्थात बायबलवर पूर्णतः आधारित असल्यामुळे संप्रदाय किंवा पंथ होण्याच्या पाशात ते अडकत नाहीत. इतर लोक कोणत्याही धर्मातले असले तरी ते त्यांच्यामध्ये आस्था घेतात. नाही, ते या लोकांवर त्यांचा दृष्टिकोन बदलण्यास कधीही जबरदस्ती करत नाही. लवकरच पृथ्वीवर स्थापल्या जाणाऱ्‍या त्रासमुक्‍त परादीसचा शास्त्रवचनीय पुरावा देऊन ते आपला नेता, ख्रिस्त येशूचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.—मत्तय २८:१९, २०; १ पेत्र २:२१.

(४) आध्यात्मिक आरोग्य आणि आनंद. वास्तववादी दृष्टीने यहोवाचे साक्षीदार या काळात त्रासमुक्‍त असल्याचा दावा करत नाहीत. आदामाकडून वारशाने मिळालेल्या पापाची खूण असलेल्या लोकांच्या बाबतीत हे अशक्यच आहे. पण देवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीने ते “प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन” यांसारखे वैयक्‍तिक गुण विकसित करण्याचा प्रयास करतात. (गलतीकर ५:२२, २३) ख्रिस्त येशूद्वारे यहोवाची उपासना करण्यामुळे त्यांच्यात ऐक्य राहते आणि त्यांची आशा जिवंत राहते.

साक्षीदारांच्या स्थानिक सभा भरवण्याच्या ठिकाणी भेट दिल्यावर, देव या पृथ्वीचे एका प्रत्यक्ष परादीसमध्ये रूपांतर करील अशी तुमची खात्री पटेल याचा आम्हाला विश्‍वास आहे.

सद्य दिवसाच्या अडीअडचणी नाहीशा होतील. ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाचे फायदे आज्ञाधारक मानवजातीला लागू केले जातील तेव्हा उरलेली थोडीफार अपरिपूर्णताही हळूहळू नाहीशी होईल. होय, तुम्ही उत्तम आरोग्य आणि आनंद मिळवू शकता.

फक्‍त थोडीफार तयारी करून तुम्ही हे भवितव्य उपभोगू शकता. साक्षीदारांकडून स्वतःसाठी सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकाची एक प्रत मागा.a याच्याद्वारे अगदी अल्पावधीत, तुम्हाला त्रासमुक्‍त परादीसमध्ये अनंतकाळ जगायचे असल्यास देव तुमच्याकडून काय अपेक्षितो हे शिकायला मिळेल.

[तळटीप]

a वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित

[१० पानांवरील संक्षिप्त आशय]

साक्षीदारांचे विश्‍वास संपूर्णतः बायबलवर आधारित असल्यामुळे त्यांचा संप्रदाय किंवा पंथ निर्माण होत नाही

[८, ९ पानांवरील चित्रं]

त्रासमुक्‍त परादीसचा पाया आता घातला जात आहे

लवकरच सबंध पृथ्वीवर एक प्रत्यक्ष परादीस स्थापले जाईल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा