युद्धाच्या स्मृतींमध्ये शांतीसाठी प्रार्थना
वर्ष १९९४ च्या नोव्हेंबर महिन्यात, पोप जॉन पॉल दुसरे यांनी व्हॅटिकन येथे, एका बहुपंथीय संमेलनाचे यजमानपद भूषविले. जागतिक शांतीसाठी प्रार्थना या समारंभाची मुख्य विशेषतः होती. पोप यांनी त्यांच्या उद्घाटन भाषणात म्हटले, “भूतकाळात व वर्तमानकाळातसुद्धा आपल्यामध्ये कोणतेही विवाद असले तरीही, धर्म व शांती यांमधील संबंधास प्रसिद्धी देणे हे आम्हा सर्वांचे कार्य व कर्तव्य आहे.”
विरोधात्मकपणे, याबाबतीत जगातील धर्म कुविख्यात आहेत. या परिषदेचे प्रधान सचिव विल्यम वेन्डली यांनी मान्य केले की “धर्म, जगातील विभिन्न भागांतील विवादांत अतिशय खोलवर गुंतलेले आहेत.” मुख्यत्वे रोमन कॅथलिक प्रदेश असलेल्या र्वांडातील संहाराचा विचार करा.
मे १९९४ मध्ये, पोप जॉन पॉल दुसरे यांनी कबूल केले, की र्वांडाची शोकांतिका “सत्य व खरी वंशहत्या होती, ज्यासाठी दुःखदपणे कॅथलिक लोक देखील जबाबदार आहेत.” कॅथलिकांच्या सहभागाने लोकांच्या, चर्चवरील विश्वासावर काही प्रभाव पाडला आहे का? बेल्जियन जेसुईट आन्ड्रे ब्यूयो यांनी म्हटले, “संहारांनी अनेकांचा विश्वास डगमगला आहे.” यासाठी समर्थनीय कारण आहे.
मियॅमी हेरल्ड यात प्रकाशित झालेल्या एका रोयटर्स अहवालानुसार, “वंशहत्येच्या कृत्यांसाठी ज्यांची चौकशी होणार आहे अशा ४०,००० हुतू कैद्यांमध्ये पाळक, उपदेशक व नन समाविष्ट आहेत.” द न्यूयॉर्क टाईम्स ने अहवाल दिला: “अनेक र्वांडन लोक म्हणतात की त्यांचे बिशप व आर्चबिशप यांनी संहारांचा लगेच किंवा पुरेशा जोरदारपणे निषेध केला नाही व ठार करणाऱ्या तुकड्यांना प्रशिक्षित करण्यात मदत करणाऱ्या हाब्यारिमान सरकाराशी त्यांची फारच जवळीक होती. संहारांत भाग घेतल्याच्या आरोपांवर नवीन तुत्सी-प्रधान सरकाराद्वारे किमान एका पाळकाला अटक करण्यात आली आहे.” टाईम्स पुढे म्हणते, “नवीन सरकारचे म्हणणे आहे की त्यांना कॅथलिक चर्चने पूर्वीसारखेच प्रबळ असावे हे कबूल नाही व स्पष्टवक्ते व स्वतंत्र आहेत अशा पाळकांना सैनिकांनी छळले आहे, इतकेच नव्हे तर अटक करण्याचीही धमकी दिली” यात नवल नाही.
रक्तदोषी धर्मवाद्यांनी शांतीसाठी केलेल्या प्रार्थनांकडे यहोवा देव कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो? यशया १:१५ उत्तर देते: “तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकितो; तुम्ही कितीहि विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही; तुमचे हात रक्ताने भरले आहेत.”
त्या दरम्यान, यहोवाचे खरे सेवक “जगाचे” आणि त्याच्या विवादांचे भाग “नाहीत.” र्वांडात संहार चालले असताना, प्रत्येक जमातीच्या यहोवाच्या साक्षीदारांनी इतर जमातीच्या धोक्यात असलेल्या साक्षीदारांना आपल्या घरांत आश्रय दिला व याद्वारे स्वतःचे जीवन धोक्यात घालून त्यांचे संरक्षण केले. सर्व जातीय पार्श्वभूमींतून आलेला साक्षीदारांचा “मोठा लोकसमुदाय”, खऱ्या शांती व सुरक्षिततेचा एकमेव मार्ग देवाचे राज्य आहे याचे समर्थन करतात व त्यासाठी प्रार्थना करतात.—योहान १७:१४; प्रकटीकरण ७:९; मत्तय ६:९, १०; २४:१४.