वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g95 ४/८ पृ. ३१
  • “मुंगीकडे जा”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “मुंगीकडे जा”
  • सावध राहा!—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • धाड घालण्यास निघालेले लष्कर!
    सावध राहा!—२००३
  • मुंग्यांचा प्रवास इतका सुव्यवस्थित कसा होतो?
    उत्क्रांती की निर्मिती?
  • राज्य सभागृह बांधकाम —पवित्र सेवेचा महत्त्वपूर्ण पैलू
    आमची राज्य सेवा—२००६
सावध राहा!—१९९५
g95 ४/८ पृ. ३१

“मुंगीकडे जा”

“असामान्य मुंग्या”—काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रामध्ये याप्रकारचा विलक्षण मथळा असलेला लेख, अगदी कमी वेळात बांधलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहाच्या बाबतीत आला होता. असा मथळा लिहिण्याची प्रेरणा कशी मिळाली? अशाप्रकारच्या बांधकामाच्या जागेचे उंचावरुन घेतलेले छायाचित्र पाहिल्यानंतर हे समजण्यास तुम्हाला फारसे अवघड जाणार नाही. याच वृत्तपत्रातील लेखाच्या उप-शीर्षकाने वर्णन केले: “मानवी मुंग्यांचे वारुळ—बांधकामाच्या जागेभोवती पाचशे यहोवाचे साक्षीदार होते.”

पत्रकाराने केलेल्या तुलनेपेक्षा ही तुलना अधिक उचित आहे. हे खरे आहे की, बांधकाम चालू असणाऱ्‍या इमारतीभोवती असलेली शेकडोजणांची वर्दळ मुंग्या वारुळावर असतात त्याप्रमाणे वरून पाहिल्यावर दिसत होती. वरकरणीपणापेक्षा एकसारखेपणा या ठिकाणी अधिक महत्त्वाचा आहे. याचे कारण काय आहे? “मुंगीकडे जा; तिचे वर्तन पाहून शहाणा हो,” हा बायबलचा नीतीसूत्रे ६:६ मधील सल्ला यहोवाचे साक्षीदार गंभीरपणे घेतात. मुंग्यांचे परीक्षण केल्याने एखादी व्यक्‍ती शहाणी कशी होऊ शकते?

मुंग्या मोठी कामगिरी पार पाडतात, हे त्याचे एक कारण आहे. बायबलच्या विश्‍वकोश शास्त्रवचनांवर सूक्ष्म दृष्टी, (इंग्रजी) लिहितो: “भवितव्याबद्दल तयारी करण्याची उपजतबुद्धी हाच केवळ मुंग्यांचा उल्लेखनीय गुण नाही तर चिकाटी आणि करारीपणा, त्यांच्या वजनाच्या दुप्पट असणारा एखादा पदार्थ वाहून नेणे किंवा अथकपणे ओढत नेणे, एखादी कामगिरी पार पाडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणे आणि त्या उंच कड्यावरुन खाली पडल्या, घसरल्या किंवा खाली गरंगळत आल्या तरीदेखील माघार घेण्यास नकार दर्शविणे हे सर्व गुण देखील महत्त्वाचे आहेत.”a

त्याचप्रमाणे, यहोवाचे साक्षीदार त्यांच्या शारीरिक वजनाच्या दुप्पट वजन असलेले कोणतेही बांधकाम साहित्य ओढून नेत नसले तरीदेखील तुलनात्मकरित्या कमी कालावधित बांधकाम प्रकल्प पूर्ण करण्याद्वारे त्यांच्या आसपासच्या लोकांना ते आश्‍चर्यचकित करत आहेत. पाया घातल्यापासून फक्‍त दोन ते तीन दिवसामध्ये त्यांचे राज्य सभागृह उभे झालेले पाहणे सर्वसामान्य नाही!

त्यांना हे सर्व करणे कसे शक्य होते? याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे मुंगीचे अनुकरण करणे होय. शास्त्रवचनावर सूक्ष्म दृष्टी मुंग्यांबद्दल म्हणतो: “मुंग्या उल्लेखनीयरित्या एकमेकांना सहकार्य करतात; मुंग्या त्यांची घरे फारच स्वच्छ ठेवतात आणि बहुतेकवेळा जखमी किंवा क्षीण झालेल्या मुंग्यांना मदत करण्याद्वारे त्यांच्या सहकर्मचाऱ्‍यांची त्या काळजी घेतात.” अशाचप्रकारचा साक्षीदारांमधील सहकार्याच्या आत्म्याने वर उल्लेख केलेल्या पत्रकारावर प्रभाव पाडल्याचे दिसते त्यामुळेच त्याने असे वर्णन केले की, “खेळीमेळीच्या वातावरणात निर्मिती उद्योगाच्या प्रत्येक शाखेचे प्रातिनिधित्व करणाऱ्‍या सुमारे ८० पेशेवाईक आणि त्यांना मदत करणाऱ्‍या ४०० स्वयंसेवक यांच्याद्वारे साध्य केलले प्रतिफळ.”

तथापि, यहोवाचे साक्षीदार त्यांचे राज्य सभागृह उभारण्यासाठी कठीण काम आणि सहकार्य करतात ते केवळ पुढील काळामध्ये या सभागृहामध्ये जे घडणार आहे त्याची एक आगाऊ कल्पना आहे. शिकविण्याच्या व प्रचार कार्याची योजना करण्याद्वारे आणि उभारणीकारक शैक्षणिक सभांना प्रस्तुत करण्याद्वारे ते कठीण श्रम घेतात आणि एकमेकांना सहकार्य करतात. त्याहून महत्त्वाचा म्हणजे येशू पृथ्वीवर असताना त्याने त्याच्या शिष्यांच्या बाबतीत प्रेमळ काळजी प्रदर्शित केली आणि याचप्रकारची एकमेकांची प्रेमळ काळजी घेण्यासाठी ते प्रयत्न करतात.—योहान १३:३४, ३५.

तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांचे सभागृह कधी पाहिले असल्यास किंवा त्याठिकाणी काय चालते या गोष्टीची तुम्हाला उत्सुकता असल्यास तुम्ही स्वतः याचे परीक्षण करावे म्हणून आम्ही तुमचे या राज्यसभागृहामध्ये उबदार स्वागत करतो. उबदार स्वागत आणि शैक्षणिक भेटीची आम्ही तुम्हाला हमी देतो.

[तळटीपा]

a वॉचटावर बायबल अँड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.

[३१ पानांवरील चित्र]

अल्पावधीत उभारलेले फ्रान्समधील ऑरिलॅक येथील राज्य सभागृह

[३१ पानांवरील चित्राचे श्रेय]

Line drawings: Pharaoh’s ant. Lydekker

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा