तिचे जीवन बदलवणारा तो दिवस
अमेरिकेतील ॲरिझोना येथील एक युवती म्हणते की, चर्चला जाणाऱ्यांपैकी ती एक होती; परंतु तिचा नंतर धर्माच्या बाबतीत भ्रमनिरास झाला. अखेरीस प्रार्थनेद्वारा तिने देवाला म्हटले: “मी येथून पुढे कोणत्याही चर्चला जाणार नाही. मला आता कळाल्याप्रमाणे माझे जीवन मी उत्तमप्रकारे जगणार आहे आणि एक उत्तम व्यक्ती होण्याचा मी प्रयत्न करणार आहे.”
त्या नंतर जे काही घडले त्याचे या स्त्रीने वर्णन केले: “माझ्या मावशीने मला फोन केला आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या एका दिवसाच्या खास संमेलनासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहत असल्याचे मला दूरध्वनीवरून कळवले. तिला आणि माझ्या मावसभावंडांना माझ्या घरात त्या रात्री मुक्काम करता यावे म्हणून तिने माझ्याकडे विचारणा केली. ‘तुला आमच्याबरोबर येण्यास आवडेल का?’ तिने विचारले. मी दिलेले उत्तर मला आठवते: ‘होय, मला काही विशेष काम नाही.’ धर्मातील माझी आस्था जवळ जवळ मृतवत झाली होती.
“यहोवाच्या साक्षीदारांपासून सावध राहण्यास मला नेहमी सांगण्यात आले होते. त्यामुळे संमेलनामध्ये फारच सूक्ष्म परीक्षण केल्याचे मला आठवते. तरी या पृथ्वीला परादीस बनविण्याचा देवाचा मूळ उद्देश आणि देवाच्या या उद्देशामध्ये बदल झालेला नाही, असे जे सांगण्यात येत होते त्यात कोणत्याही प्रकारचे गूढ नव्हते. अनेक कुटुंबे एकत्र बसून एकात्मतेचा आत्मा प्रदर्शित करत असल्याचे पाहत असताना माझ्यामध्ये उबदार भावना निर्माण होऊन मी स्थानापन्न झाले. मी नतमस्तक झाले आणि हळुच देवाला विचारले: ‘हेच सत्य आहे काय? मी ज्याचा शोध घेत आहे ते नेमके हेच आहे काय?’
“उजळत्या चेहऱ्याच्या स्मितहास्याने लोक एकमेकांना आलिंगन व निरोपाचे चुंबन देत असल्याचे त्या दिवशी घरी परतताना मी पाहिले. त्यांच्या विश्वासाबद्दल, तसेच यहोवा कोण आहे व त्याने त्यांच्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये आणि अंतःकरणामध्ये कोणतीही शंका नव्हती आणि मी हे त्यांच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट पाहू शकत होते. त्या दिवसापासून यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहामध्ये उपस्थित राहण्यास मी सुरवात केली आणि तेव्हापासून ते थांबवलेले नाही. त्यानंतरच्याच म्हणजे १९८८ मधील खास संमेलन दिवशी यहोवाला माझ्या समर्पणाचे जाहीर प्रतीक म्हणून मी पाण्याचा बाप्तिस्मा घेतला आणि या सुंदर कुटुंबाची एक सदस्या झाले.”
यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्वासाबद्दल आणि त्यांच्या कार्यांबद्दल अधिक शिकण्याची तुमची इच्छा असल्यास त्यांच्या स्थानिक राज्य सभागृहामध्ये त्यांचा संपर्क साधा किंवा पृष्ठ ५ वर दिलेल्या तुमच्या नजीकच्या पत्त्यावर लिहा.
[३२ पानांवरील चित्र]
या ठिकाणी रशियामध्ये दिसते त्याप्रमाणे एक उबदार कौटुंबिक भावना यहोवाच्या साक्षीदारांच्या मोठ्या मेळाव्यांमध्ये व्यापलेली असते