वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g95 १/८ पृ. २६-२७
  • स्वर्गात कोण जातात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्वर्गात कोण जातात
  • सावध राहा!—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • स्वर्गात नाहीत असे
  • येशूने मार्ग उघडला
  • स्वर्गीय राज्य
  • अधिपतींच्या वर्गाची निवड
  • स्वर्गास कोण जातात व का?
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • देवाचे राज्य काय आहे?
    बायबल नेमके काय शिकवते?
  • देवाचं राज्य काय आहे?
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • देवाचे राज्य म्हणजे काय?
    देव आपल्याकडून काय अपेक्षितो
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९५
g95 १/८ पृ. २६-२७

बायबलचा दृष्टिकोन

स्वर्गात कोण जातात

दहशतवादी बाँम्बने प्रवासी विमानाच्या ठिकऱ्‍या उडविल्या आणि त्यातील सर्वजण मरण पावले. मृतांच्या नातेवाईकांना आणि मित्रांना असे सांगण्यात आले, की त्यांचे प्रियजन अकालिक आणि हिंसंक मृत्यूचा मोबदला म्हणून आता स्वर्गात आहेत.

लोकप्रिय संगीतकार मरतो तेव्हा स्वर्गामध्ये देवदूतांसह संगीत वाजवीत असल्याचे त्याच्या बाबतीत सांगितले जाते.

लहान मुलांचे संपूर्ण आयुष्य रोग, उपासमार किंवा अपघात यामुळे हिरावून घेतले जाते आणि पाळक म्हणतात, की आता ते कदाचित स्वर्गदूतांप्रमाणे स्वर्गीय आनंदाचा उपभोग घेत असतील!

अशाप्रकारच्या सर्व लहानग्यांना आणि मोठ्यांना स्वर्गात घेऊन शांती देण्याद्वारे देव अन्याय दूर करीत आहे काय? स्वर्गामध्ये प्रवेश देणे, हा मानवामध्ये प्रशंसनीय आणि उत्तम असणाऱ्‍या सर्वांचे संरक्षण करण्यासाठी देवाचा केवळ एक मार्ग आहे काय? बायबलचा दृष्टिकोन काय आहे?

स्वर्गात नाहीत असे

बायबलचे वक्‍तव्य स्पष्ट आहे: “अनीतिमान्‌ माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हाला ठाऊक नाही काय?” (१ करिंथकर ६:९) तथापि, बायबल स्वर्गातील वतन मिळणार नाही अशा अनेक धार्मिक आणि अन्यायाने बळी पडलेल्यांबद्दल देखील सांगते.

योहान ज्याला लवकरच मरावे लागणार होते त्याविषयी येशूने स्वतः, म्हटले: “मी तुम्हास खचित सांगतो की, स्रियांपासून जन्मलेल्यात बाप्तिस्मा करणारा योहान ह्‍याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही; तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे.” (मत्तय ११:११) हेरोद या दुष्ट राजाने बाळ येशूला मारण्याच्या उद्देशास्तव बेथलेहेम आणि त्याच्या जिल्ह्यांमधील दोन वर्षे आणि त्यापेक्षा कमी वय असलेल्या मुलांची निर्दयपणे कत्तल केली. (मत्तय २:१६) तरीही येशू म्हणाला, “स्वर्गातून उतरलेला (व स्वर्गात असलेला) जो मनुष्याचा पुत्र [येशू] त्याच्यावाचून कोणीहि [स्री किंवा मूल] स्वर्गात चढून गेला नाही.” (योहान ३:१३) अन्यायाने बळी पडलेल्यांच्या स्वर्गीय अस्तित्वाबद्दल येशू का बोलला नाही?

येशूने मार्ग उघडला

येशूने स्वतःला “मार्ग, सत्य व जीवन” असे म्हटले आणि प्रेषित पौलाद्वारे त्याचे “महानिद्रा घेणाऱ्‍यातले प्रथम फळ,” असे वर्णन करण्यात आले. (योहान १४:६; १ करिंथकर १५:२०) परिणामी, कोणीही त्या अगोदर स्वर्गात जाऊ शकत नव्हता. परंतु येशू त्याच्या पुनरुत्थानानंतर ४० दिवसांनी स्वर्गात गेल्यावर मेलेले विश्‍वासू लोक त्याच्या पाठोपाठ स्वर्गात गेले का? सुमारे दहा दिवसानंतर प्रेषित पेत्र राजा दाविदाच्या संदर्भात म्हणाला की, “तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. . . . कारण दावीद स्वर्गात चढून गेला नाही.”—प्रेषितांची कृत्ये २:२९, ३४.

अशाप्रकारे, स्वर्गीय प्रवेशामध्ये अन्यायी त्रासाचा मोबदला किंवा व्यक्‍तिगत विश्‍वासूपणाचे प्रतिफळ यापेक्षाही अधिक सामावलेले आहे. त्याऐवजी ते स्वर्गीय अधिपती वर्गाची रचना पुरवते आणि ती येशूच्या मार्गदर्शनाच्या अधीन तसेच पवित्र आत्म्याने अभिषेक केलेल्या प्रातिनिधीक संख्येच्या लोकांद्वारे संघटित केली आहे.—रोमकर ८:१५-१७; प्रकटीकरण १४:१-३.

स्वर्गीय राज्य

येशूने या अधिपत्याचा किंवा शासनाचा “स्वर्गाचे राज्य” किंवा ‘देवाचे राज्य’ असा उल्लेख केला. (मत्तय ५:३, २०; लूक ७:२८) मानवांच्या मोठ्या समुहाने या कारभारविषयक वर्गामध्ये समाविष्ट व्हावे हा या राज्याच्या मागील हेतू नव्हता. येशूने याचे ‘लहान कळप’ असे वर्णन केले. (लूक १२:३२) बायबलच्या या भागातील मूळ भाषेतील “लहान” (मायʹ·क्रॉसʹ) हा शब्द “मोठा” (मीʹगॅस) या शब्दाच्या विरुद्ध आहे आणि लूक १२:३२ याचे वर्णन संख्या किंवा अंकाची अल्पकता असे करते. म्हणूनच ‘स्वर्गांच्या राज्यासाठी’ अमर्याद संख्येला अनुमती नाही. उदाहरणार्थ, तुम्हाला प्याल्यामध्ये पाणी ओतण्यास सांगितल्यास ते खाली सांडणार नाही याची तुम्ही खबरदारी घ्याल. तसेच ‘लहान कळप’ देखील अमर्याद संख्या असलेल्या लोकांनी तयार होणे शक्य नाही. देवाच्या राज्याने येशू ख्रिस्ताबरोबर (“लहान”) संख्या असणाऱ्‍या सहअधिपतींची नियुक्‍ती केली आहे.

योहानाला प्रकट करण्यात आलेली या अधिपतींची अचूक संख्या १,४४,००० आहे. (प्रकटीकरण १४:१, ४) प्रकटीकरणामध्ये याअगोदर यांच्याविषयी सांगण्यात आले की, ‘सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रों यामधून त्यांना देवासाठी याजक आणि राज्य होण्यासाठी घेतले जाईल,’ तसेच ते स्वर्गातून राजे या नात्याने पृथ्वीवर अधिपत्य गाजवितील. (प्रकटीकरण ५:९, १०) येशू ख्रिस्ताबरोबर असणारा हा कारभारविषयक वर्ग हे राज्य आहे आणि या राज्यासाठी येशूने त्याच्या शिष्यांना प्रार्थना करण्यास शिकविले. या पृथ्वीवरील गैर अधिपत्याचा अंत करण्यासाठी हे एक साधनीभूत आहे यामुळे मानवाचे घर असणाऱ्‍या या पृथ्वीवर न्याय आणि शांतीची पुर्नस्थापना करण्यात येईल त्याचप्रमाणे तिच्यामध्ये वास्तव्य करणाऱ्‍यांना अनंतकाळचे जीवन मिळेल—स्तोत्र ३७:२९; मत्तय ६:९, १०.

अधिपतींच्या वर्गाची निवड

मानवी अधिपत्याने राज्याचे भ्रष्टाचाराने विभिन्‍न तुकडे केले आहेत त्यामुळे त्या राज्यामध्ये सहभागी होणाऱ्‍यांची काळजीपूर्वक निवड आणि परीक्षा देवाने केलीच पाहिजे याची आपण अपेक्षा करू शकत नाही का? मानवांची वर्तमान परिस्थिती, खराब वातावरणात बिघाड झालेल्या प्रवासी विमानामध्ये प्रवास करणाऱ्‍या शेकडो प्रवाशांप्रमाणे आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये तरुण आणि अननुभवी असणाऱ्‍या वैमानिकांबरोबर प्रवास करावयास तुम्हाला आवडेल काय? नक्कीच नाही! वैमानिकाने अशा परिस्थितीमध्ये त्याच्या सखोल प्रशिक्षणाचा योग्य वापर करण्याची गरज आहे.

स्वर्गामध्ये येशूसह सेवा करणाऱ्‍यांविषयी आपल्याला असे प्रकट करण्यात आले आहे “तर मग देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे.” (१ करिंथकर १२:१८) राज्यातील स्थानासाठी व्यक्‍तिगत इच्छा आणि महत्वकांक्षा निर्णायक मुद्दा नाही. (मत्तय २०:२०-२३) अपात्र लोकांना प्रवेशासाठी प्रतिबंध म्हणून देवाद्वारे विश्‍वास आणि वर्तणूक यांचे खास स्तर प्रस्थापित केले आहेत. (योहान ६:४४; इफिसकर ५:५) येशूचे डोंगरावरील प्रवचनाचे सुरवातीचे शब्द अशा ख्रिस्ताच्या सह याजकांबद्दल दर्शवितात, की त्यांनी आध्यात्मिक मनोवृत्तीचे, सौम्य, धार्मिकतेवर प्रेम करणारे, दयाशील, शुद्ध अंतःकरणाचे आणि शांतीमय असे स्वतःला शाबीत केले पाहिजे.—मत्तय ५:३-९; तसेच प्रकटीकरण २:१० पहा.

मानवजातीच्या अधिकांश लोकांची या स्वर्गीय प्रतिनिधिक अधिपत्यांच्या वर्गामध्ये यहोवाद्वारे निवड करण्यात आली नसली; तरीही त्यांना आशाहीन असे सोडण्यात आले नाही हे आनंदाचे आहे. ते या सुंदर पृथ्वीवर वास्तव्य करतील आणि त्याच्या ईश्‍वरी अधिपत्याच्या लाभांचा आनंद घेतील. प्राचीन काळी अन्यायाने बळी पडलेल्यांना, देवाचे राज्य पूर्णतेच्या स्थितीत ‘येण्याचे’ पाहण्यासाठी, बचावलेल्यांबरोबर जगण्यासाठी जीवन प्रदान करण्यात यईल. अभिवचनाची अंमलबजावणी केली जाईल: “कारण सरळ जनच देशात वस्ती करतील; सात्विक जन त्यात राहतील.”—मत्तय ६:९, १०; नीतीसूत्रे २:२१; प्रेषितांची कृत्ये २४:१५. (g95 1/8)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा