पाणघोडा मदतीला धावून आला!
पाण्यात किंवा पाण्याजवळ राहणाऱ्या सुमारे चार टन वजनाच्या सर्व सस्तन प्राण्यांमध्ये पाणघोड्याचा दुसरा क्रमांक येतो. त्याचा जबडा इतका शक्तिशाली असतो की एकदाच दाताने चावल्यावर मचव्याचे तुकडे तुकडे होऊ शकतात. हाँगी नॅशनल पार्क झिंबाब्वे येथे काही पुरुषांच्या गटाला पाणघोड्याची नेहमीच्या मर्यादेपेक्षा वेगळे वर्तन पाहून खूपच आश्चर्य वाटले.
ते पुरुष धरणाजवळ असताना दोन आफ्रिकन काळवीटांचा नऊ रानटी कुत्री जोराने पाठलाग करत असताना त्यांनी पाहिले. बचावाचा मार्ग न सापडल्यामुळे ही काळवीटे पाण्यात लपून राहिली. पाण्याच्या किनाऱ्याला कुत्री उड्या मारत आली व ती पाण्यातून वर येण्याची वाट पाहत राहिली.
सरतेशेवटी, कुत्री तेथे थांबलेली आहेत याची जाणीव न राखता एक दमलेले काळवीट किनाऱ्याकडे पोहू लागले. काळवीट जसे किनाऱ्याजवळ येऊ लागले, तसे एक जवळचाच पाणघोडा काळवीटाच्या जवळ पोहत असल्याचे त्या पुरूषांना दिसले. आफ्रिकन वाईल्डलाईफ या मासिकाने अहवाल दिला, “त्याच्या जवळ पोहंचल्यावर पाणघोड्याने त्याला मागे फिरविले व हळुवारपणे कोपराने ढोसणे देऊन विरूद्ध दिशेने पोहोण्यास भाग पाडले.” काळवीटाने त्याच्या आज्ञेचे पालन केले. पाणघोड्याने काळवीटाचा पाठलाग केला व त्याने असुरक्षित असल्याचे चिन्ह दाखवले तेव्हा तो कोपराने मधून मधून त्याला ढोसळणे देत राहिला.
जसे ते काळवीट पाण्याच्या कडेला पोहंचले तसे पाणघोड्याने हळुवार पण खंबीरपणे काळवीटाला किनाऱ्यावर ढकलले हे त्या पुरूषांनी पाहिले. त्या काळवीटाने लटपटत काही पाऊले उचलली व थरथर कापत थोडा वेळ उभे राहिले. लवकरच काळवीट पाण्यापासून दूर चालू लागले. दोघेही एकदुसऱ्यांच्या दृष्टीआड होईपर्यंत पाणघोडा त्याचा मागोवा घेत गेला.
त्या दुसऱ्या काळवीटाचे काय झाले? त्या पुरूषांनी अहवाल दिला की, “ही रानटी कुत्री पहिल्या काळवीटाची सुटका कशी होत आहे हे पाहण्यात इतके व्यग्र झाले, की त्या दुसऱ्या काळवीटाकडे त्यांचे लक्षच नव्हते त्यामुळे ते निसटून गेले.” (g94 10/8)