वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • gbr13-2 पृ. १०-११
  • जीवन—प्रेमाने काळजी घेण्याचे एक दान

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवन—प्रेमाने काळजी घेण्याचे एक दान
  • सावध राहा! माहितीपत्रक १३-२ (gbr13-2)
  • मिळती जुळती माहिती
  • मुले—जबाबदारी व एक बहुमान
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • गर्भपाताविषयी बायबल काय म्हणतं?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • तुमची पालकीय भूमिका
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
अधिक माहिती पाहा
सावध राहा! माहितीपत्रक १३-२ (gbr13-2)
gbr13-2 पृ. १०-११

जीवन—प्रेमाने काळजी घेण्याचे एक दान

यहोवा देवाने मुलांना जन्मास घालण्याचा विशेषाधिकार मानवी कुटुंबाला बहाल केला तेव्हा, ते किती मोठे दान होते! एक दुसऱ्‍यावर प्रेम करणाऱ्‍या आनंदी जोडप्याच्या वाट बघणाऱ्‍या कुशीत, एका सुंदर बाळाचे आगमन होऊन हे जोडपे त्यांच्या विवाहाच्या ह्‍या छोट्याशा फळाची काळजी घेण्यास व त्याला सांभाळण्यास तयार होते. जसजसे बाळाचे जीवन उलगडत जात होते तसे कुटुंबाला अधिकाधिक आनंद मिळणार होता.

परंतु आदाम आणि हव्वा ह्‍यांच्या पापामुळे मानवजातीत जन्मलेल्या बाळांवर दुःखद परिणाम ओढवले. पापाच्या परिणामामुळे, मुलांना जन्म देत असताना आपली पहिली माता विपत्ती आणि शारीरिक त्रासाने शापीत झाली. आणि त्यांची संतती ह्‍या पापी वातावरणात जन्मल्यामुळे मुलांचे संगोपन करणे कठीण आव्हान बनले. याच कारणास्तव, आजच्या ह्‍या कठीण जगात एका बाळाची गर्भधारणा ही आनंदाची गोष्ट मानली जात नाही यात काही आश्‍चर्य नाही. तरी, न जन्मलेल्या बाळाबद्दल निर्माणकर्त्याचा काय दृष्टिकोन आहे? नैतिकतेच्या बदलणाऱ्‍या विचारांप्रमाणे त्याचेही विचार बदललेत का? मुळीच नाही. जगात न जन्मलेल्या बाळांबद्दल त्याचा दृष्टिकोन आणि चिन्ता अढळ आहे.

शास्त्रवचने स्पष्टपणे सांगतात की आईमध्ये एका अतुल्य वैयक्‍तिक मानवाची वाढ होते. गर्भधारणा होते तेथपासून जीवनाची सुरवात होते. जगात जन्म झाल्याने, देवाने आधीच पाहिलेले बाळ मानवाला प्रकट होते. “गर्भाशयातून प्रथम निघालेल्यां”च्याबद्दल यहेज्केल बोलतो. (यहेज्केल २०:२६) “माझ्या मातेचे गर्भाशयद्वार” असे ईयोब त्याचे वर्णन करतो आणि “प्रकाश कधी न पाहिलेले अर्भक” असे गर्भपतनाबद्दल म्हणतो.—ईयोब ३:१०, १६. न्यू.व.

गर्भाशयात वाढणाऱ्‍या नाजूक जीवाबद्दल यहोवा देवाचा आपुलकीचा दृष्टिकोन लक्षात घ्या. त्याने यिर्मयास म्हटले: “मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघाल्यापूर्वी मी तुला पवित्र केले.” (यिर्मया १:५) दावीद म्हणाला: “मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी हाडे तुझ्या पासून लपली नव्हती. मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले.” (स्तोत्रसंहिता १३९:१५, १६) ईयोब देवाबद्दल “ज्याने मला गर्भाशयात निर्माण केले,” आणि ज्याने “आम्हास गर्भाशयात घडिले,” असे म्हणतो.—ईयोब ३१:१५ न्यू.व.

परंतु बाळ नको असणाऱ्‍या निराशीत गरोदर आईबद्दल देवाला असणारी काळजी त्याचे काय? सर्व मनुष्यांपेक्षा, पालकत्वाच्या गंभीर जबाबदारींची निर्माणकर्त्याला जाणीव आहे. कठीण परिस्थितींमध्ये एका गरोदर मातेने ईश्‍वरी गरजांसाठी आदर असल्यामुळे तिच्या बाळाला वाढवण्याचा निर्णय घेतला तर, तो तिच्या निर्णयाला आशीर्वादीत करणार नाही का? एका आनंदी बाळाचे संगोपन करण्यासाठी पालकाला योग्यपणे त्याच्या मदतीसाठी प्रार्थना करता येईल आणि ती करावयास हवी. देवाच्या वचनाच्या पानांवर त्याने मुलांना वाढवण्याबद्दलचा सर्वात उत्तम सल्ला दिला आहे. कौटुंबिक जीवनात पवित्र शास्त्रीय सल्ल्यांना लागू केल्याने आशीर्वादीत परिणाम उत्पन्‍न होतील. ईश्‍वरी मुलांना वाढवण्यामध्ये जो आनंद व प्रतिफळ मिळतात ते त्यासाठी कराव्या लागणाऱ्‍या बलिदानांपेक्षा वरचढ ठरतात याची ग्वाही कोणताही अभिमानी पालक देईल.

ते बाळ बलात्कार किंवा अगम्यगमनाच्या संबंधाचे फळ असले तर, यहोवा त्याबाबतीत काही वेगळा विचार राखतो का? त्या मातेच्या विरुद्ध ते कृत्य एक गुन्हा असला तरी, बाळाचा त्यात काही दोष नाही. त्याच्या जीवनाला समाप्त केल्याने केवळ एका हिंसक कृत्याच्या विरोधात दुसरे हिंसक कृत्य केले जाईल. बळी पडलेल्या स्त्रीया अनुभवत असणाऱ्‍या मानसिकरित्या मनाला बसलेल्या प्रचंड आघाताची जाणीव यहोवा नक्कीच करू शकतो आणि त्याच्या परिणामांशी संतुलितपणे यशस्वी लढा देण्यासाठी तो माता व बाळाची मदत करू शकतो.

एका गरोदर स्त्रीला, पूर्ण काळासाठी बाळ राखल्याने तिच्या जीवासाठी धोका असेल असे एका डॉक्टराने कळविले तर काय? डॉ. ॲलन गुटमॉकर यांनी असे म्हटले: “जोपर्यंत एका रूग्णाला कर्करोग किंवा रक्‍तक्षय रोगासारखा प्राणघातक रोग नाही तोपर्यंत कोणत्याही रूग्णाला गरोदरपणातून जिवंत आणणे संभव आहे, पण तसे असेल तर, गर्भपात लांबविणे अशक्य असेल, व जीवन वाचविणेही अशक्य असेल.” द एनसायक्लोपिडिया अमेरिकाना असे म्हणते: “गंभीर वैद्यकीय समस्या असल्या तरी पुष्कळ स्त्रीयांना गरोदरपणातून सुरक्षितपणे आणले जात असल्यामुळे मातेच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी फारच कमी गर्भपात करण्याची आवश्‍यकता आहे. पुष्कळ गर्भपात बाळ नको असल्यामुळेच केले जातात.” म्हणून अशा परिस्थिती फारच कमी आढळतात. तरीसुद्धा, प्रसुतीच्या काळात असे घडले तर पालकांनी मातेचा जीव किंवा बाळाचा जीव यामध्ये निवड करायला हवी. तो त्यांचा निर्णय आहे.

जीवनाच्या निर्माणकर्त्याने जन्म देण्याच्या ताकदीच्या उपयोगाबद्दल स्पष्ट मार्गदर्शन दिले आहे यात काही आश्‍चर्य आहे का? त्याच्या नजरेत, जीव घेणे जसे पाप आहे तसेच काळजी घेण्याची इच्छा नाही अशा बाळाला निर्माण करणेही पाप आहे.

नक्की सांगायचे म्हणजे, गर्भपाताबद्दलचा मतभेद या व्यवस्थिकरणाच्या अंतापर्यंत चालू राहील. परंतु जीवनाच्या निर्माणकर्त्याला, यहोवा देवाला, आणि त्याच्या कायद्यांचे पालन करणाऱ्‍यांना याबद्दल काही प्रश्‍नच नाही. जीवन सुरवातीपासूनच पोषण करण्याचे आणि प्रेमाने काळजी घेण्याचे एक बहुमूल्य दान आहे. (g93 5/22)

[११ पानांवरील चौकट]

देवाच्या दृष्टिने गर्भपाताला पाहणे

विवाहबंधनाच्या बाहेर गर्भधारणा झालेल्या आणि संपूर्णतः मातृत्वासाठी अपरिपक्व असणाऱ्‍या तरुण मुलीचे काय? बाळाला जगात प्रवेश देण्यासाठी तिने अनुमती द्यावी का? केवळ मातेने मुर्खतेने वागल्यामुळे किंवा अनैतिक मार्ग अनुसरल्यामुळे देवाच्या, बाळासाठी असणाऱ्‍या भावना बदललेल्या नाहीत. बाळाच्या जन्मामुळे त्याच्या मातेला तिच्या अनैतिकतेच्या नैसर्गिक परिणामांना ओळखून घेण्यासाठी नक्कीच मदत मिळेल आणि त्यामुळे तिच्यावर देवाच्या कायद्यांचे ज्ञान बिंबवले जाईल. तिच्या बेकायदेशीर लैंगिक कृत्याचा पुरावा नष्ट केल्याने तिला सतत दोषीपणाचे दुःख वाटेल, किंवा ते तिला आणखी अनैतिक कृत्य करण्यास धीट बनवेल.

जबाबदारी उचलण्यासाठी पिता नसेल तर, मुलाचे संगोपन करणे सोपे नसणार. पण आपल्या स्वर्गीय पित्याबरोबर दृढ नातेसंबंध ठेवल्याने ते करण्यासाठी एखाद्या मातेला नैतिक आणि भावनात्मक शक्‍ती, आधार व मार्गदर्शन पुरविले जाईल. एकट्या पालकांचा भार हलका करण्यात मदत देण्यासाठी त्याने ख्रिस्ती मंडळीची तरतूद केली आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा