वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • gbr13-1 पृ. १९-२२
  • बलात्काराचा यशस्वी लढा कसा देता येऊ शकतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बलात्काराचा यशस्वी लढा कसा देता येऊ शकतो?
  • सावध राहा! माहितीपत्रक १३-१ (gbr13-1)
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मदतीचा स्वीकार करा
  • तिला पाठिंबा द्या
  • औदासिन्य आणि भय यांना यशस्वीरित्या लढा देणे
  • रागाची दिशा बदलणे
  • बलात्काराला काय थांबवू शकते?
  • ह्‍या समस्येचा लवकरच अंत होईल
  • बलात्काराची वास्तविकता
    सावध राहा! माहितीपत्रक १३-१ (gbr13-1)
  • बलात्कार कसा टाळता येईल
    सावध राहा! माहितीपत्रक १३-१ (gbr13-1)
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
सावध राहा! माहितीपत्रक १३-१ (gbr13-1)
gbr13-1 पृ. १९-२२

बलात्काराचा यशस्वी लढा कसा देता येऊ शकतो?

तेहतीस वर्षांआधी मेरीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला होता. आज, मेरी त्या घटनेचे वर्णन देत असताना तिचे हृदय धडधडते व तिचे तळहात घामाघुम होतात. ती म्हणते, “बलात्कार हा स्त्रियांचा सर्वात मानहानिकारक अनुभव आहे.” आणि अक्षरश: तिच्या डोळ्यात पाणी आले. पुढे ती म्हणाली, “ती एक विद्रुप, भयानक गोष्ट आहे.”

एखाद्या व्यक्‍तीच्या जीवनातील नाशकारक मानसिक घटना आहे बलात्कार व त्याचे परिणाम संपूर्ण आयुष्यभर राहू शकतात. एका अभ्यासात एक तृतीयांश बलात्कार पासून वाचलेल्यांची मुलाखत घेण्यात आली तेव्हा त्यांनी आत्महत्येचा विचार केला होता आणि पुष्कळ म्हणाले की त्या घटनेने त्यांना सदासाठीच बदलून टाकले.

स्त्री जर तिच्यावर हल्ला करणाऱ्‍याला ओळखत असेल तर त्याचे परिणाम आघातजन्य असतील. ओळखीच्या व्यक्‍तीकडून बलात्कार झाला असेल तर बळी पडलेल्याला दुसऱ्‍यांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी आहे कारण एकतर तिच्या बरोबर जे घडले ते ती कोणासही सांगणार नाही किंवा जरी सांगितले तरी तो बलात्कार होता असा विश्‍वास तिच्यावर कोणीही ठेवणार नाही. तिने पूर्ण विश्‍वास ठेवलेल्या व्यक्‍तीनेच तिला इजा पोंचवल्यामुळे ती स्वत:लाच दोषी ठरवू शकते आणि दुसऱ्‍यांचा न्याय करण्याच्या तिच्या योग्यतेविषयी शंका करु लागते.

मदतीचा स्वीकार करा

बलात्काराला बळी पडलेल्या पुष्कळ स्त्रिया सुरवातीला तिरस्कार आणि धक्कादायक प्रवृत्तीने वागतात. एका स्त्रीवर तिच्या महाविद्यालयाच्या महत्त्वाच्या परिक्षेआधी बलात्कार झाला. तिची परिक्षा होऊ पर्यंत ह्‍या घटनेचा तिने विचारच केला नाही. आणखी एका बलात्कारापासून वाचलेली स्त्री म्हणतेः “मी ती घटना आठवायचा प्रयत्न मुळीच करत नव्हते कारण ज्या माणसावर मी विश्‍वास ठेवला तोच माझ्या डोळ्यादेखत माझ्यावर हल्ला करणारा झाला. मला कधीच असे वाटले नाही की तुमच्या ओळखीचाच व्यक्‍ती तुमच्यावर बलात्कार करु शकतो. हे मुर्खपणाचे जरुर वाटेल, परंतु एक विश्‍वासू माणूस तुमच्यावर बलात्कार करु शकतो ह्‍या समजुतीमुळे माझ्यासमोर काही आशाच राहिली नाही. मला किती एकट्यासारखे वाटले.”

काही स्त्रिया त्यांच्यावर झालेल्या बलात्काराबद्दल कोणासही न सांगता जे झाले त्याला नाकारत असतात. पुष्कळ वर्षांसाठी त्या झालेल्या हल्ल्याला दडपून ठेवतात, ज्यामुळे त्यांच्या जखमा बऱ्‍या होण्यास उशीर लागतो व आणखी दुसऱ्‍या अशा मानसिक समस्या उद्‌भवतात ज्या बलात्कारापासून उद्‌भवल्या हे बळी पडलेल्या व्यक्‍तीला माहीत पडणार नाही.

तुम्ही जोपर्यंत इतरांबरोबर ह्‍या गोष्टी बोलत नाही तोपर्यंत बरे होणे अशक्य आहे. एखादी विश्‍वासू मैत्रिण तुम्हाला मदत करु शकेल की जी तुम्हाला हे समजवण्यात मदत करेल की जे काही झाले यात तुमची काहीही चूक नाही व तो वस्तुत: एक बलात्कार होता. एक जुने नीतिसूत्र असे म्हणतेः “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो, आणि विपत्कालासाठी तो बंधु म्हणून निर्माण झालेला असतो.” (नीतिसूत्रे १७:१७) आध्यात्मिक मेंढपाळसुद्धा “वाऱ्‍यापासून आसरा व वादळापासून निवारा” देणारे असे होऊ शकतात. (यशया ३२:२; १ थेस्सलनी ५:१४) काही बळी पडलेल्यांनी बलात्काराच्या अडचणीचे केंद्र किंवा व्यवसायीक सल्लागाराशी संपर्क साधल्यास त्यांच्या भावनांचे विश्‍लेशन करुन पाहण्यात आवश्‍यक ती मदत मिळू शकते.

बलात्काराला बळी पडलेले बहुदा त्यांच्या अपराधी भावनांमुळे बोलायला घाबरतात, विशेषकरुन हल्ल्याच्यावेळी जर त्यांच्या लैंगिक भावना चेथविल्या गेल्या असतील. जरी बलात्कारी पुरुष दोषास पात्र असला तरी—बलात्काराबद्दल ते स्वत: दोषी, कलंकित, आणि निकामी आहेत असे त्यांना वाटते.

“बोलण्यासाठी एक चांगली मैत्रिण मोठा बदल घडविते” असे मेरीने म्हटले जिने एका ख्रिस्ती भगिनीवर विश्‍वास ठेवला. ती पुढे म्हणते, “मी तिच्याशी बोलू शकत होते, तिच्यासोबत बोलताना मला मुळीच घाणेरडापणा व बलात्कार झाल्यामुळे मी कलंकित आहे असे वाटत नव्हते.”

तिला पाठिंबा द्या

दुसऱ्‍या बाजूला पाहता, बळी पडलेल्या व्यक्‍तीच्या मित्रमैत्रिणींनी पश्‍चादबुद्धीने तिची टीका करणे किंवा तिचा “खरोखरी बलात्कार झाला” हे स्वत: ठरवायचा प्रयत्न करणे अयोग्य व प्रेम नसलेल्याप्रमाणे असेल. कधीही असे म्हणू नका की तिने त्याचा आनंद घेतला किंवा ती अनैतिक होती. जेव्हा एखादी स्त्री मदतीसाठी तिच्या मैत्रिणीकडे येते तेव्हा तिच्यावर विश्‍वास करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तिचे सांत्वन करा. ती बोलायला इच्छिते तेव्हा तिचे एका, पण खोलवर माहितीसाठी तिच्यावर दबाव आणू नका.

बलात्काराची घटना अलिकडेच घडली असेल तर, बळी पडलेल्या व्यक्‍तीला तिच्या मित्र-मैत्रिणींनी वैद्यकीय इलाज मिळण्यासाठी मदत करावी व राहण्यासाठी एक सुरक्षित स्थान द्यावे. बलात्कार झाल्याची पोलिसांकडे तक्रार करण्यास तिला उत्तेजन द्या, परंतु निर्णय तिला घेऊ द्या. आत्ताच तिला अशा परिस्थितीचा अनुभव करावा लागला जेथे तिच्यावरचे नियंत्रण दूर झाले होते. तिने पुढे काय करावे हे तिला निवडू देण्याने, पुन्हा एकदा नियंत्रण मिळवण्यास तिला संधी द्या.

बलात्काराला बळी पडलेल्या व्यक्‍तीच्या कुटुंबाच्या सदस्यांनी अशा परिस्थितीत मानसिकरित्या प्रतिक्रार करण्याचे टाळले पाहिजे. बलात्काराचा दोष कोणावर तरी लावायचा प्रयत्न ते करतील किंवा बलात्कार करणाऱ्‍याचा बदला घेण्यास पाहतील ज्याचा फायदा बळी पडलेल्या व्यक्‍तीसाठी काहीही होणार नाही. (रोमकर १२:१९) बलात्कारी पुरुषांवर दोष ठेवणे व त्याचा सूड घेणे धोकादायक ठरेल. ह्‍यामुळे बळी पडलेली व्यक्‍ती तिच्या तब्येतीकडे लक्ष देण्याएवजी तिच्या प्रिय जनांच्या सुरक्षिततेची काळजी करत राहील.

बलात्कारापासून बचावलेले पुष्कळ व्यक्‍ती बलात्कारानंतर लैंगिक संबंधाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात ह्‍याची जाणीव सर्व कुटुंबांना असण्यास हवी. त्यांच्या मनात, लैंगिकता एक शस्त्र बनले आहे आणि ज्या व्यर्क्‍तिवर ते प्रेम व भरवसा करतात त्यांच्या बरोबरसुद्धा लैंगिक संबंध ठेवण्यास त्यांना कठीण जाईल. या कारणास्तव, नवऱ्‍यांनी त्यांच्या पर्त्निवर ती स्वत:हून तयार होत नाही तो पर्यंत तिच्याबरोबर संबंध जोडण्यास जबरी करु नये. (१ पेत्र ३:७) एखाद्या तरुण स्त्रिची स्वत:विषयीची प्रतिष्ठा उभारण्यास कुटुंबाने तिची मदत केली पाहिजे आणि तिला दाखवले पाहिजे की कुटुंबातील सर्व सदस्य तिच्यावर अजूनही प्रेम करतात व तिच्या बरोबर जे काही झाले याची पर्वा न करता ते तिचा आदर करतात. तिला निरंतर पाठिंब्याची गरज आहे कारण मानसिकरित्या बरे होण्यास बराच वेळ लागतो.

औदासिन्य आणि भय यांना यशस्वीरित्या लढा देणे

ज्या स्त्रियांवर बलात्कार झाला होता त्या म्हणाल्या की त्यांची सर्वात मोठी प्रतिक्रिया होती भय. पुष्कळ बळी पडलेल्या स्त्रियांनी ह्‍या हल्ल्यातून वाचण्याची आशाच केली नाही. नंतर त्यांच्यावर पुन्हा बलात्कार होण्याची किंवा अचानकपणे त्यांच्या हल्लेखोराला पाहण्याची भीति त्यांना वाटते.

बलात्काराच्या वेळेसारखे आवाज, वास, आणि जागा यागोष्टी तिने पुन्हा पाहिल्या तर तिच्या मनातील भय पुन्हा एकदा जागे होऊ शकते. जर एखाद्या स्त्रीचा गल्लीत बलात्कार झाला असेल तर ती कोणत्याही गल्लीत जाण्यास घाबरेल. जर तिच्यावर घरात बलात्कार झाला असेल तर तिला घरात कधीच सुरक्षित वाटणार नाही आणि ते घर सोडून जाण्यास भाग पडेल. बलात्कारी पुरुषाच्या कपड्यांसारखाच सुगंधित वास तिने पुन्हा एकदा हुंगला तर तिला त्या सर्व दु:खीत आठवणी आठवतील.

जरी फारच कमी बलात्कारांचा परिणाम गरोदरपणात होतो, अनेक बळी पडलेल्यांना त्या शक्यतेची भीति वाटते. पुष्कळ अशीसुद्धा वाजवी काळजी करु लागतात की त्यांना लैंगिक संक्रमणाद्वारे आजार झाला असेल. बलात्काराला बळी पडलेल्या ५० टक्के स्त्रिया उदासीनता, आशाहीनता आणि निरुपयोगीपणा अशा भावनांचा अनुभव घेतात व ह्‍या भावना बहुत आठवड्यांसाठी किंवा महिन्यांसाठीही राहतात. त्यांना कदाचित अस्वस्थता, तिरस्कार आणि तीव्र भीतिच्या झटक्यांशी झटावे लागते.

जरी, स्त्रियांना, बलात्कार टाळता आला नसला तरी, त्यांचे विचार, भावना आणि हल्ला होताना त्यांची प्रतिक्रिया या सर्वांवर त्या नियंत्रण मिळवू शकतात. स्वत:विषयीच्या नकारात्मक विचारांना काढून त्यांच्याबदलात सकारात्मक विचार करण्यास त्या शिकू शकतात.

“तुम्ही किती अशक्‍त, निरुपयोगी किंवा काही कामाचे नाहीत असे स्वत:ला सांगण्याऐवजी, तुम्ही आजपर्यंत कशी प्रगती केलीत आणि हल्ल्यानंतर दगदगीपासून तुम्ही किती दूर आलात ते स्वत:ला सांगण्यास शिका,” असे लिंडा लेडरे यांनी रिकव्हरींग फ्रॉम रेप यात म्हटले. “प्रत्येक दिवशी तुमचे नकारात्मक विचार व भावना हळूहळू जेरीस आणले जात आहेत असे तुम्हाला वाटते तेव्हा स्वत:ला सांगायचा प्रयत्न करा, ‘मी पुन्हा एकदा स्वत:वर ताबा ठेऊ शकते.’”

भय निर्माण होण्याचे खरोखरचे कारण कोणते हे ओळखण्याचे शिकून भीतिवर मात मिळवू शकतो. आणि मग जेव्हा तिला त्याच्या भयाचे कारण समजते ती स्वत:ला विचारु शकते, हे भय किती यथार्थ आहे? उदाहरणार्थ, जर तिने तिच्यावर हल्ला करणाऱ्‍या बलात्कारी माणसाप्रमाणे दिसणाऱ्‍या कोणाला पाहिले, तर ती स्वत:ला याची आठवण करुन देऊ शकते की हा तो बलात्कारी नव्हे आणि तो तिला इजा करणार नाही.

भयाला हाताळण्यासाठी आणखी एक सुचविलेला मार्ग आहे संवेदनशीलतेला हळूवारपणे घालवून देणे. मोठ्यापासून लहानापर्यंत तिला भीति वाटणाऱ्‍या सर्व कार्यांचे किंवा परिस्थितींची ती यादी करते. यानंतर तिला भीति वाटत नाही तो पर्यंत ती कमीत कमी दबावाच्या परिस्थितीत आहे असा विचार करु लागते. आणि जो पर्यंत तिला सुखावह वाटत नाही तोपर्यंत ती त्या यादीत लिहिलेल्या सर्व परिस्थितींचा विचार करत राहते.

एखाद्या मैत्रिणीच्या सहाय्याने, तिच्या वास्तविक जीवनातल्या गोष्टींना आता अंमलात आणण्यात ती प्रगती करु शकते, जसे की, रात्रीचे घराबाहेर जाणे किंवा एकटे राहणे. आणि हळूहळू ती तिच्या भयावर ताबा ठेऊ शकते की ज्यामुळे तिच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होणार नाही. तरीसुद्धा, काही गोष्टींचे भय—जसे की रात्रीच्या वेळी गल्लीत जाणे—साहजिकच आहे, आणि अशा परिस्थितीत अस्वस्थेवर मात करण्यात काही अर्थ नाही.

रागाची दिशा बदलणे

बलात्कारापासून वाचलेल्या स्त्रिया रागाच्या भावनेचाही अनुभव घेतात, जो प्रथम सर्व पुरुषांवर असतो पण कालांतराने फक्‍त बलात्कारी पुरुषापर्यंत मर्यादित राहतो. रागीट लोक नेहमी भेद न जाणता अविचारीपणाने कोणावरही राग करतात. दुसरे जण त्यांच्या भावना दाबून ठेवतात. परंतु, रागाला विधायकरित्या मार्गी लावू शकतो, आणि एक व्यक्‍ती तिच्या रागीट स्वभावाबरोबर जशी वागते त्यानेच तिला बरे होण्यास मदत होऊ शकते. शास्त्र वचन असे म्हणतेः “तुम्ही रागावा, परंतु पाप करु नका.”—इफिसकर ४:२६.

पहिल्यांदा, बलात्कारापासून वाचलेल्यांनी राग प्रकट करण्यासाठी घाबरु नये. याबद्दल ते इतरांसोबत बोलू शकतात. कायदेशीर हालचालीत गोवल्याने किंवा त्याचा अहवाल ठेवल्याने भावना व्यक्‍त केल्या जाऊ शकतात. शारीरिक व्यायाम करुनही ते त्यांचा राग विसरु शकतात, जसे की टेनिस, टेनिस चेंडूचा खेळ, हॅन्डबॉल खेळणे, चालणे, पळणे, एखादे वाहन चालवणे, किंवा पोहणे यासर्व गोष्टी केल्यामुळे निराशेविरुध्द लढण्यात अधिक फायदे मिळतील.

तुम्ही तुमच्या जीवनाचा ताबा पुन्हा एकदा मिळवू शकता.

बलात्काराला काय थांबवू शकते?

बलात्कारी पुरुषांपासून स्त्रियांनी लपणे किंवा त्यांच्या विरुध्द लढणे यामुळे बलात्कार थांबतील असे नाही. तीमथी बेनेक ह्‍या लेखकाने त्यांच्या मेन ऑन रेप ह्‍या पुस्तकात असे म्हटले कीः “पुरुषच बलात्कार करतात व पुरुषांकडेच बलात्काराचा अंत करण्यासाठी सामुदायिक शक्‍ति आहे.”

जोपर्यंत पुरुष स्त्रियांसोबत गैरवर्तणूक करणे थांबवणार नाहीत तसेच हिंसामय वर्चस्वावर यशस्वी नातेसंबंध अवलंबून नसते ही जोपर्यंत शिकत नाहीत तोपर्यंत बलात्काराचा अंत होणार नाही. व्यक्‍तीगत पातळीवर, प्रौढ पुरुष दुसऱ्‍या पुरुषांशी बोलून त्यांच्यावर प्रभाव टाकू शकतात. अनैतिक विनोद, लैंगिक अनैतिकता दाखवणारे चित्रपट, किंवा मालाची विक्री करण्यासाठी लैंगिकतेचा उपयोग जाहिरातींसाठी करणाऱ्‍यांचा निषेध दोघे स्त्री व पुरुष करु शकतात. पवित्र शास्त्र सल्ला देते: “जारकर्म, सर्व प्रकारच्या अशुद्धता व लोभ, यांचा तुम्हांमध्ये उच्चारही न होवो, हे पवित्र जनास शोभते, तसेच अमंगळपणा, बाष्कळ गोष्टी व टवाळी. ह्‍यांचाही न होवो ती उचित नाहीत. तर याएवजी ईशोपकार स्मरण होवो.”—इफिसकर ५:३, ४.

पालकांनी आपल्या मुलांना उदाहरणाद्वारे स्त्रियांना आदर देण्याचे शिकवण्यास हवे. यहोवा देवा ज्या दृष्टीने स्त्रियांकडे पाहतो त्याच दृष्टीने पाहण्यास त्यांच्या मुलांना शिकवावे. देव पक्षपाती नाही. (प्रे. कृत्ये १०:३४) येशूप्रमाणेच स्त्रियांचे मित्र होण्यास व त्यांच्यासोबत वावरताना निश्‍चिंत असण्यास शिकवावे. ते त्यांच्या पुत्रांना याची शिकवण देऊ शकतात की लैंगिक संबंध प्रेमाचे नाजुक कृत्ये आहे जे फक्‍त एखाद्याच्या विवाहीत सोबत्यापुरते राखीव आहे. पालक हेही स्पष्टपणे दर्शवू शकतात की हिंसा सहन केली जाणार नाही, वा इतरांवर केलेली बळजबरी खपवली जाणार नाही. (स्तोत्रसंहिता ११:५) लैंगिक गोष्टींची उघडपणे चर्चा त्यांच्याबरोबर करण्याचे व लैंगिक दबावाचा प्रतिकार करण्यास उत्तेजन ते त्यांच्या मुलांना देऊ शकतात.

ह्‍या समस्येचा लवकरच अंत होईल

तथापि, जागतिक समाजात क्रांतीकारी बदल होत नाहीत तोपर्यंत बलात्काराचा अंत होणार नाही. संशोधक लिंडा लेडरे म्हणाल्या: “बलात्कार नुसती वैयक्‍तिक समस्या नसून कौटुंबिक, सामाजिक, आणि राष्ट्रीय समस्या आहे.”

पवित्र शास्त्र, संपूर्ण भूतलावर हिंसा मुक्‍त अशा समाजाचे अभिवचन देते जेथे कोणीही मनुष्य “दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान” करणार नाही. (उपदेशक ८:९; यशया ६०:१८) अशी वेळ फार लवकर येत आहे जेव्हा यहोवा देव कोणत्याही प्रकारच्या शक्‍तिचा गैरवापर होत असलेले सहन करणार नाही यामध्ये बलात्काराचाही समावेश आहे.—स्तोत्रसंहिता ३७:९, २०.

त्या नविन जागतिक समाजात, सर्व लोकांना लिंग, वंश आणि राष्ट्र याची पर्वा न करता शांतीने राहण्यासाठी व एकमेकांबरोबर प्रेमाने राहण्यास शिक्षण दिले जाईल. (यशया ५४:१३) आणि त्यासमयी, नम्रजन मित्र असो की अनोळखी व्यक्‍ती असो, भयरहीत जीवन जगतील व “ते उदंड सुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्रसंहिता ३७:११. (g93 3/8)

[२० पानांवरील चौकट/चित्र]

जर तुमच्यावर बलात्कार झाला असेल तर

▫ वैद्यकीय उपचार घ्या.

▫ बलात्काराला बळी पडलेल्यांना सल्ला देणारी एखाद्या व्यक्‍तीने वैद्यकीय उपचार व कायदेशीर कारवाई होताना तुमच्या बरोबर राहावे अशी विनंती तुमची इच्छा असल्यास करु शकता.

▫ होताहोईल तितक्या लवकर पोलिसांना बोलवा. सल्ला देणाऱ्‍यांनी असे म्हटले आहे की पोलिसांना कळविले तर त्यामुळे तुमचे स्वत:चे व दुसऱ्‍या स्रियांचे देखील संरक्षण होऊ शकते. तक्रार करणे हे फिर्याद करण्यासारखे नाही, परंतु उशीरा तक्रार केल्यामुळे तुमच्या फिर्यादीचा काहीच अर्थ राहणार नाही.

▫ पुरावे जपून ठेवा. बलात्कार झाल्यानंतर (पोलिस कारवाई होईपर्यंत) लगेचच आंघोळ, वस्त्र बदलणे, केस धुऊन विंचरणे, किंवा बोटांचे व पावलांच्या ठश्‍यांचा नाश करण्याचा प्रयत्न करु नका.

▫ वैद्यकीय मंडळ सर्व पुराव्यांना गोळा करतील व लैंगिक संक्रमणाद्वारे कोणता रोग जडला आहे का किंवा गर्भ राहिला का हे पाहतील. जर त्यांनी गर्भ-नाशक किंवा समागम झाल्यानंतर घेतल्या जाणाऱ्‍या गोळ्या तुम्हाला दिल्या, तर अशा गोळ्या अंडाणू गर्भाचा नाश करतील याकडे ख्रिश्‍चनांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.

▫ तुम्ही फाजिल प्रतिक्रिया दाखवत आहात असे जरी वाटत असले तरी तुम्हाला सुरक्षित वाटणाऱ्‍या गोष्टी करा—जसे की दाराचे कुलूप बदला, कोणा मैत्रिणीसोबत रहा, दारात अडथळे निर्माण होतील अशा गोष्टी ठेवा.

▫ याहूनही अधिक, सांत्वन मिळावे म्हणून पवित्र शास्त्रवचने वाचा, हल्ला होण्याआधी व झाल्यानंतरही यहोवाचे नाम मोठ्याने उच्चारुन प्रार्थना करा. वडीलांवर व मंडळीतील जवळच्या सहकर्मी यांजवर आधारासाठी अवलंबून रहा. शक्य असल्यास सर्व सभांना उपस्थित रहा, व सेवाकार्यात सहख्रिश्‍चनांबरोबर सोबत करण्याचा प्रयत्न करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा