धावपळ—पण काय उपयोग?
एक मोटारचालक अशा वेगाने मोटार चालवीत होता की, जो वेग त्याला अगदी समाधानकारक वाटत होता. पण तो वेग तरी किती होताः ताशी ८० मैल (१३० कि.मी.)! त्याचे प्रवासी जरी निर्बंधित वेगाला सरावलेले होते तरी पश्चिम जर्मनीतील मोटार वाहतूकीच्या मार्गावरील वेगवान वाहतुकीशी अतिशय घाबरलेले होते. कारण तेथे, ठराविक भाग सोडून इतर ठिकाणी वेगाच्या मर्यादेचे बंधन नाही. मागेपुढे चालणाऱ्या मोटारी व मोटरसायकली आरडाओरड करीत होत्या. बऱ्याच वेळाने, स्वतःवर ताबा न ठेऊ शकणारी एक महिला प्रवाशी मोठ्याने म्हणालीः “सर्व एवढ्या घाईगडबडीत का आहेत? हे सर्व कोठे चाललेत?
“कदाचित, कोठेच नाही.” असे हसतहसत यजमानाने म्हटले. पण तो विनोद होता हे खरे! कारण हे उघड होते की, प्रत्येक जण कोठे ना कोठे तरी जात होता—तेही अतिशय घाईत!
पण सगळेच एवढ्या घाईत का आहेत? त्यांना याचा विसर पडलेला आहे का की, प्रवासातील आनंद, थोडासा वेळ देऊन सभोवतालची रम्य दृश्ये पाहून होत असतो? जीवन म्हणजे श्वास रोखून शंभर यार्डाची धडक शर्यत धावणे हेच आहे का?
भरधाव धावणाऱ्या मोटारी, चटकन जेवण आटोपता येणारी उपहारगृहे आणि सुपर सॉनिक गतीची विमाने ही या युगाच्या वेगांची मुख्य अंगे असून यात अधिकाधिक वाढ होत आहे. वेगाने! गतीने! अधिक कौशल्याने! असे असले तरी काहीजण असेही आहेत जे, घोडागाडीच्या युगाकडे मागे परत पाहतात. शिवाय ते हे कबूल करतात की, थोडीफार घाई ठीक आहे. कारण, कोणा डॉक्टरला किंवा पोलिसाला बोलावून बघा, ते काही रमतगमत येणार नाहीत.
तरी सभोवतालची ही सर्व धावपळ जरुरीची किंवा फायदेकारक आहे का? काहींना वाटते की, नाही. लॉस एंजल्स टाईम्सचा एक लेखक म्हणतोः “चिडखोर, त्वरा करणारे व झपाटलेले [अनेक लोक] या धावपळीच्या युगात घडाळ्याच्या काट्यानिशी आपल्या जीवनात गरगर फिरत आहेत.”
वेगाशी गती टिकविण्याचा जो सध्याचा मार्ग बनला आहे तो देखील, द टोरन्टो स्टार ज्याला “आवाक्याबाहेर गेलेला संसर्गजन्य रोग” म्हणते तसा बनला आहे; तो आहे दबाव! होय या दबावाने लोकांवर विषाच्या घोटासारखा दुर्देवी परिणाम केला आहे. डोक्यात कोंडा होण्यापासून ते नखे मोडणे, रक्तदाब आणि हृदयाचे झटके असे परिणाम यात समाविष्ट आहेत. घड्याळाच्या काट्यानुरुप राहणे हे मानवी नातेसंबंध बिघडविते.
पण मग, आमच्या युगास “त्वरेचे, घाईगडबडीचे युग” असे का संबोधण्यात येते? तुम्हाला आत्ताच जर चिडखोरपणा व दबाव वाटत आहे तर मग काही वर्षानंतर तुमचे जीवन कसे असणार? सध्याच्या धावपळीच्या काळाशी सामना करण्याचा तसेच आपल्या जीवनावर अधिक संयम राखण्याचा एखादा मार्ग आहे का? (g87 2/22)