पृष्ठ दोन
या शतकाने सामाजिक जीवनात गंभीर बदल अनुभवले आहेत. या आधीच्या पिढ्या प्रामुख्याने छोट्या छोट्या खेड्यापाड्यांपुरत्या मर्यादित होत्या. कामाचे मुख्य केंद्र घर होते, त्यामुळे प्रवास हा आरामदायी वाटत होता. पण यात औद्योगिकीकरणामुळे मोठा बदल घडवून आणला.
यामुळे जीवनाची गती वाढत गेली. लोक घाईघाईने कामावर धावू लागले. गडबडीत खरेदी उरकू लागले. लगबगीने मुलांना शाळेत पोहंचवू लागले. इतकेच काय पण आराम घ्यावा म्हणून सुटीच्या दिवशी परगावी भरकन् जाऊन परत येण्याचा विचार करू लागले. जीवनावर घड्याळांचा, रेल्वे वेळापत्रकांचा व दुकानांच्या वेळांचा ताबा आहे असे दिसायला लागले आहे.
पण तुम्हाला आपल्या जीवनावर अधिक ताबा मिळवता यावा यासाठी आजच्या धावपळीसोबत तुम्ही कसा सामना करू शकाल?