वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 १२/१ पृ. ११-१६
  • जे लीन ते धन्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जे लीन ते धन्य
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • उपशिर्षक
  • यहोवावरील विश्‍वास लीन असण्यासाठी आम्हाला मदत करतो
  • लीनता—सुज्ञतेचा मार्ग
  • लीनता इतरांसोबत चांगले संबंध घडवते
  • प्रीती आम्हाला लीन असण्यासाठी मदत करील
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 १२/१ पृ. ११-१६

जे लीन ते धन्य

“देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”—१ पेत्र ५:५.

१, २. कशाप्रकारे येशूने डोंगरावरील त्याच्या प्रवचनात, लीन असणे धन्यतेचे म्हटले होते?

धन्य आणि लीनता यांचा संबंध आहे का? सर्वकाळचा सर्वश्रेष्ठ मनुष्य, येशू ख्रिस्त याने, त्याच्या सर्वात प्रसिद्ध प्रवचनात नऊ धन्यतेचे किंवा परमानंदाचे वर्णन केले होते. (मत्तय ५:१-१२) येशूने, लीन असणे धन्यतेचे म्हटले होते का? होय, त्याने म्हटले होते, कारण त्याने उद्धृत केलेल्या अनेक धन्यतामध्ये लीन असणे समाविष्ट होते. उदाहरणार्थ, आध्यात्मिक गरजांविषयी जागृत असण्यासाठी एखाद्या व्यक्‍तीने लीन असले पाहिजे. केवळ लीन जन धार्मिकतेचे भुकेले व तान्हेले आहेत. गर्विष्ठ जन, मनाचे सौम्य व दयाळू नाहीत किंवा शांतीदायक देखील नाहीत.

२ लीन जन धन्य आहेत कारण लीन असणे हे उचित व प्रामाणिकपणाचे आहे. शिवाय, लीन असणे सुज्ञतेचे असल्यामुळे, लीन धन्य आहेत; यामुळे यहोवा देव व समविश्‍वासू ख्रिश्‍चनांसोबत चांगला नातेसंबंध जोपासण्यास मदत मिळते. याशिवाय, लीन असणे ही लीन जनांच्या प्रीतीची अभिव्यक्‍ती असल्यामुळे ते धन्य आहेत.

३. प्रामाणिकपणा आम्हाला लीन असण्यास का भाग पाडतो?

३ आम्ही लीन असावे अशी अपेक्षा, प्रामाणिकपणा आम्हाकडून का करतो? एक गोष्ट म्हणजे, आम्ही सर्वांनीच वारशाने अपरिपूर्णत्त्व मिळवले आहे व चूका करत असतो. प्रेषित पौलाने स्वतःविषयी म्हटले: “कारण मला ठाऊक आहे की, माझ्या ठायी म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही; कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही.” (रोमकर ७:१८) होय, आम्ही सर्वांनीच पाप केले आहे व देवाच्या गौरवाला उणे पडतो. (रोमकर ३:२३) निष्कपटपणा आम्हाला गर्विष्ठ बनण्यापासून दूर ठेवील. चूक कबूल करण्यासाठी लीनतेची गरज लागते, व केव्हाही चूक केली तरी, दोष मान्य करण्यासाठी प्रामाणिकपणा आम्हाला मदत करील. आम्ही जे काही करण्याचा प्रयत्न करतो त्यात उणे पडत असल्यामुळे, लीन असण्यासाठी आमच्याकडे योग्य कारण आहे.

४. आम्ही लीन असण्यासाठी १ करिंथकर ४:७ मध्ये, कोणते अगत्याचे कारण दिले आहे?

४ प्रामाणिकपणाने आम्हाला लीन का बनवावे त्याचे दुसरे कारण प्रेषित पौल पुरवतो. तो म्हणतो: “तुला निराळेपण कोणी दिले? आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस?” (१ करिंथकर ४:७) निसंशये, आम्ही स्वतःचा गौरव करण्यासाठी, आमची मालमत्ता, क्षमता, किंवा योग्यता यावर गर्व करणे हे प्रामाणिकपणाचे नसणार. प्रामाणिकपणा आम्हाला, देवासमोर चांगला विवेक बाळगण्यास मदत करतो, जेणेकडून आम्ही “सर्वबाबतीत चांगले वागू.”—इब्रीयांस १३:१८.

५. आम्ही चूक केल्यावर, प्रामाणिकपणा आम्हाला कसा मदत करील?

५ आम्ही चुका करतो तेव्हा, प्रामाणिकपणा लीन असण्यासाठी आम्हाला मदत करतो. स्वतःचे बरोबर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणे किंवा दुसऱ्‍यावर दोष ढकलण्यापेक्षा, प्रामाणिकपणा तत्परतेने दोष मान्य करण्यासाठी आम्हाला मदत करतो. यास्तव, आदामाने हव्वेला दोष दिला असला तरी, दावीदाने, बथशेबाला असे म्हणत दोष दिला नाही की, ‘तिने उघड्यावर अंघोळ करायला नको होती. तो मोह मी टाळू शकत नव्हतो.’ (उत्पत्ती ३:१२; २ शमुवेल ११:२-४) खरेच, एकीकडे पाहता, असे म्हटले जाऊ शकते की, प्रामाणिकपणा लीन असण्यासाठी आम्हाला मदत करतो; तर दुसरीकडे पाहता, लीन असल्यामुळे प्रामाणिक असण्यासाठी मदत होते.

यहोवावरील विश्‍वास लीन असण्यासाठी आम्हाला मदत करतो

६, ७. लीन असण्यासाठी, देवावरील विश्‍वास आम्हाला कसे साहाय्य करतो?

६ यहोवावरील विश्‍वास देखील लीन असण्यासाठी आम्हाला मदत करील. निर्माणकर्ता किती थोर, विश्‍वाचा सार्वभौम आहे, याची गुणग्राहकता बाळगल्याने, स्वतःला अधिक महत्त्वाचे समजण्यापासून आम्हाला परावृत्त करील. यशया संदेष्टा किती उत्तमरितीने याची आठवण आम्हाला करून देतो! यशया ४०:१५, २२ मध्ये आम्ही वाचतो: “पाहा! त्याच्या हिशोबी रा पोहऱ्‍यांतल्या जलबिंदूसमान, तराजूतल्या रजासमान आहेत. . . . हाच तो पृथ्वीच्या वरील नभोमंडळावर आरूढ झाला आहे, तिच्यावरील रहिवासी टोळांसमान आहेत.”

७ यहोवावरील विश्‍वास, अन्यायामुळे त्रास सहन केला असता, आम्हाला मदत करतो. एखाद्या गोष्टीवर चिडण्यापेक्षा, स्तोत्रसंहिता ३७:१-३, ८, ९ मध्ये स्तोत्रकर्त्याने आठवण करून दिल्याप्रमाणे आम्ही लीनतेने यहोवाची वाट पाहू. प्रेषित पौल देखील त्यासारखाच मुद्दा मांडतो: “प्रिय जनहो, सूड उगवू नका तर क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की: ‘सूड घेणे माझ्याकडे आहे; मी फेड करीन,’ असे प्रभू [यहोवा, न्यूव.] म्हणतो.”—रोमकर १२:१९.

लीनता—सुज्ञतेचा मार्ग

८. लीनता, यहोवासोबत चांगला संबंध बनवण्यासाठी का मदत करते?

८ लीनता हा सुज्ञतेचा मार्ग असण्याची अनेक कारणे आहेत. एक गोष्ट म्हणजे, आधीच उद्धृत केल्याप्रमाणे, तो निर्माणकर्त्यासोबत चांगला नातेसंबंध घडवतो. देवाचे वचन नीतीसूत्रे १६:५ मध्ये अगदी स्पष्टपणे सांगते की: “प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्‍वराला [यहोवा, न्यूव.] वीट येतो.” नीतीसूत्रे १६:१८ मध्ये देखील आम्ही वाचतो: “नाशाच्या आधी गर्व आणि पतनाच्या आधी अहंकारी आत्मा असतो.” (पं. रमाबाई भाषांतर) उशीरा का होईना, गर्विष्ठांना मानखंडना मिळतेच. ते त्याप्रकारे झाले पाहिजे कारण १ पेत्र ५:५ मध्ये आपण असे वाचतो: “तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा, कारण देव गर्विष्ठांचा विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.” हाच मुद्दा तुम्हाला, येशूने दिलेल्या परूशी व जकातदाराच्या दृष्टांतात मिळेल, जेथे दोघेही प्रार्थना करत होते. यापैकी लीन जकातदारच खऱ्‍या अर्थाने धार्मिक ठरला.—लूक १८:९-१४.

९. विपत्तीच्या काळात, लीनता कशी मदत देते?

९ प्रामाणिकपणा हा सुज्ञतेचा मार्ग आहे, कारण प्रामाणिकपणा आम्हाला याकोब ४:७ मधील, “देवाच्या अधीन व्हा” हा सल्ला ऐकण्यासाठी अधिक सुलभ बनवतो. आम्ही लीन असल्यास, विपत्तीचा त्रास सहन करण्यासाठी यहोवा अनुमती देतो तेव्हा आम्ही बंड करणार नाही. लीनता आम्हाला आमच्या परिस्थितीत संतुष्ट असण्यास व धीराने टिकून राहण्यासाठी मदत करील. गर्विष्ठ व्यक्‍ती असंतुष्ट, सर्वदा अधिक अपेक्षिते व दुःखदायक परिस्थितीत बंड करत असते. दुसऱ्‍या बाजूला पाहता, लीन व्यक्‍ती ईयोबाप्रमाणे संकटे आणि परीक्षामध्ये टिकून राहते. ईयोबाला सर्व मालमत्ता गमावल्याचा त्रास सहन करावा लागला, आणि तो दुःखदायक गळवांनी पीडित झाला, व नंतर गर्विष्ठपणाचा मार्ग उचलण्यासाठी त्याच्या बायकोने असे म्हणत त्याला सल्ला दिला की, “देवाला शाप दे आणि मरून जा!” त्याने कसा प्रतिसाद दिला? पवित्र शास्त्र अहवाल आम्हाला सांगतो: “त्याने तिला म्हटले: ‘जशी मूर्ख बायकातली कोणी बोलत असते अशी तू बोलतेस. आम्ही देवापासून चांगले ते घ्यावे आणि वाईट घेऊ नये काय?’ या सर्वात ईयोबाने आपल्या ओठांनी पाप केले नाही.” (ईयोब २:९, १०, पं. रमाबाई भाषांतर) ईयोब लीन असल्यामुळे, त्याने बंड केले नाही परंतु, यहोवाने त्याच्यावर जे काही गुदरण्याची अनुमती दिली, ते त्याने सुज्ञपणे पत्करले. आणि शेवटी त्याला समृद्धतेचा मोबदला मिळाला.—ईयोब ४२:१०-१६; याकोब ५:११.

लीनता इतरांसोबत चांगले संबंध घडवते

१०. लीनता, सह ख्रिश्‍चनांसोबत आमचा संबंध कशी सुधारते?

१० लीनता हा सुज्ञतेचा मार्ग आहे, कारण यामुळे सह ख्रिश्‍चनांबरोबर आमचे चांगले संबंध घडवले जातात. प्रेषित पौल आम्हाला चांगला सल्ला देतो: “तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणांपेक्षा श्रेष्ठ माना, तुम्ही कोणीही आपेलच हित पाहू नका, तर दुसऱ्‍याचेही पाहा.” (फिलिप्पैकर २:३, ४) लीनता आम्हाला, इतरांबरोबर स्पर्धा करण्यापासून किंवा इतरांसमोर झळकण्याचा प्रयत्न करण्यापासून दूर ठेवील. अशा मनोवृत्तीमुळे आम्हावर व आमच्या सह ख्रिश्‍चनांवर समस्या आणल्या जातात.

११. चुका करण्यापासून लीनता आम्हाला दूर का राखू शकते?

११ अनेक प्रसंगी, लीनता आम्हाला चूक करण्याचे टाळण्यापासून मदत करील. कशाप्रकारे बरे? कारण लीनता आम्हाला फाजील आत्मविश्‍वासू होण्यापासून दूर ठेवील. त्याऐवजी, आम्ही १ करिंथकर १०:१२ मधील पौलाच्या सल्ल्याची गुणग्राहकता बाळगू: “आपण उभे आहो असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून संभाळावे.” गर्विष्ठ व्यक्‍तीला अधिक आत्मविश्‍वास असल्यामुळे, बाह्‍य प्रभावामुळे किंवा त्याच्या स्वतःच्या कमतरतेमुळे, चुका करण्याचा त्याचा कल असतो.

१२. लीनता, आम्हाला शास्त्रवचनातील कोणती जबाबदारी पूर्ण करण्यास प्रवृत्त करील?

१२ अधीनतेच्या आवश्‍यकतेला पूर्ण करण्यासाठी लीनता आम्हाला मदत करील. इफिसकर ५:२१, मध्ये आम्हाला सल्ला दिला आहे की: “ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा.” खरेच, आम्हा सर्वांनाच अधीन असण्याची गरज नाही का? मुलांनी त्यांच्या पालकांच्या, बायकांनी त्यांच्या पतींच्या व पतींनी ख्रिस्ताच्या अधीन असण्याची गरज आहे. (१ करिंथकर ११:३; इफिसकर ५:२२; ६:१) मग, कोणत्याही ख्रिस्ती मंडळीत, सेवा सेवकासहित सर्वांनीच वडिलांना अधीनता दाखवली पाहिजे. वडील, खासपणे विश्‍वासू दास वर्गाचे प्रतिनिधीत्त्व करत असलेल्या विभागिय पर्यवेक्षकांच्या अधीन आहेत हे देखील खरे नव्हे का? आणखी, विभागिय पर्यवेक्षकांनी, प्रांतीय पर्यवेक्षकांच्या अधीन असण्याची व प्रांतीय पर्यवेक्षकांनी, सेवा करत असलेल्या देशातील शाखा समितीला अधीन असण्याची गरज आहे. शाखा समितीच्या सदस्यांविषयी काय? त्यांनी “एकमेकांच्या अधीन” असले पाहिजे व सिंहासनाधिष्ट राजा येशूला जबाबदार असणाऱ्‍या “विश्‍वासू व बुद्धिमान दास” वर्गाच्या नियमन मंडळाच्या अधीन असले पाहिजे. (मत्तय २४:४५-४७) वडिलाच्या कोणत्याही मंडळात असल्याप्रमाणे, नियमन मंडळाच्या सदस्यांनी इतरांच्या दृष्टिकोनाला मान दिला पाहिजे. उदाहरणार्थ, कदाचित एखादा असा विचार करील की, त्याच्या कल्पना अतिशय उत्तम आहेत. परंतु त्याच्या मताला पुरेशा संख्येने इतर सदस्यांनी मान्यता दिल्याखेरीज, त्याने त्या गोष्टीचा विचार करणे थांबवले पाहिजे. खरेच, आम्हा सर्वांना लीनतेची गरज आहे, कारण आम्ही सर्वच अधीन आहोत.

१३, १४. (अ) खासपणे कोणत्या परिस्थितीत लीनता आम्हाला मदत करील? (ब) शिस्तीचा स्वीकार करण्याच्याबाबतीत पेत्राने कोणते उदाहरण मांडले?

१३ लीनता सुज्ञतेचा मार्ग आहे, ती आम्हाला सल्ला व शिस्तीचा स्वीकार करण्यास अधिक सुलभ बनवते, याद्वारे खासपणे दिसते. वेळोवेळी आम्हा सर्वांनाच शिस्तीची गरज पडते, त्यामुळे आम्ही नीतीसूत्रे १९:२० मधील सल्ला ऐकला पाहिजे: “सुबोध ऐक व शिक्षण [शिस्तीचा] स्वीकार, म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यात तू सुज्ञपणे वागशील.” लीनता, वाग्दंड किंवा शिस्तीचा दंश शमविते असे सार्थपणे म्हटले आहे. शिवाय, इब्रीयांस १२:४-११ मध्ये प्रेषित पौल, लीनतेने शिस्तीचा स्वीकार करण्यातील सुज्ञतेचा सल्ला आम्हाला देतो. केवळ याच मार्गाने आम्ही आमच्या भविष्यातील गोष्टींना सुज्ञतेने सरळ मार्गाने करण्याची आशा करू शकतो व याच्या बदल्यात सार्वकालिक जीवनाचे बक्षीस मिळवू शकतो. तो किती आनंदी परिणाम असेल!

१४ आम्ही या बाबतीत प्रेषित पेत्राचे उदाहरण दाखवू शकतो. गलतीकर २:१४ मधील अहवालावरून आपण शिकतो त्यानुसार, प्रेषित पौलाकडून त्याला कडक सल्ला मिळाला होता: “सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, असे मी पाहिले तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला [पेत्र] म्हटले: ‘तू यहूदी असतानाही, परराष्ट्रीयांसारखा वागतोस यहुद्यांसारखा वागत नाहीस, तर परराष्ट्रीयांनी यहुद्यांसारखे वागावे म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करतोस हे कसे?’” प्रेषित पेत्राचे मन दुखले का? फार काळ नाही, कारण २ पेत्र ३:१५, १६ मधील “प्रिय बंधु पौल,” या त्याच्या नंतरच्या संदर्भावरून हे दिसू शकते.

१५. आम्ही लीन व आनंदी असण्यामधील संबंध काय आहे?

१५ स्वावलंबी, संतुष्ट असणे या देखील काही बाबी आहेत. आम्ही आमच्या जवळ असलेल्या गोष्टीत, आमच्या विशेषाधिकारासाठी, आशीर्वादात संतुष्ट नसलो तर, कधीही आनंदी होऊ शकणार नाही. लीन ख्रिश्‍चन ही मनोवृत्ती बाळगतो: “देव अनुमती देत असल्यास, मी ते स्वीकारू शकतो,” तेच प्रेषित पौल १ करिंथकर १०:१३ मध्ये म्हणतो, तेथे आपण वाचतो: “मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हांवर गुदरली नाही. आणि देव विश्‍वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्‍तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील ह्‍यासाठी की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.” यास्तव लीनता कशाप्रकारे सुज्ञतेचा मार्ग आहे हे आम्ही आणखी एकदा पाहतो, कारण आमची परिस्थिती कोणतीही असली तरी, आनंदी असण्यास लीनता आम्हाला मदत करते.

प्रीती आम्हाला लीन असण्यासाठी मदत करील

१६, १७. (अ) आम्हाला लीन राहण्यास मदत करण्यासाठी, कोणते शास्त्रवचनीय उदाहरण या महान गुणावर जोर देते? (ब) या मुद्याला, कोणते प्रापंचिक उदाहरण देखील स्पष्ट करते?

१६ इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा, निःस्वार्थी प्रीती अ·गाʹपे, लीन असण्यासाठी आम्हाला मदत करील. येशू वधस्तंभावरील अनुभव इतका लीनतेने सहन का करू शकला की ज्याबद्दल पौलाने फिलिप्पैकरांना त्याचे वर्णन केले? (फिलिप्पैकर २:५-८) त्याने देवाच्या बरोबरीचा असण्याचा विचार का केला नाही? कारण त्याने स्वतः म्हटले: “पित्यावर मी प्रीती करतो.” (योहान १४:३१) याच कारणामुळे त्याने सर्व प्रसंगी, त्याच्या स्वर्गीय पित्याला, यहोवाला गौरव व आदर दिला. अशारितीने, एके प्रसंगी त्याने, केवळ स्वर्गीय पिताच उत्तम आहे असे स्पष्टपणे सांगितले.—लूक १८:१८, १९.

१७ या मुद्याचे स्पष्टीकरण करण्यासाठी, अमेरिकेतील आधी कवी असलेल्या जॉन ग्रीनलिफ व्हिटायर, या व्यक्‍तीच्या जीवनातील एक घटना आपण पाहू या. या मनुष्याची बालपणाची एक प्रिया होती, आणि एकदा शुद्धलेखन स्पर्धेत तिने एक शब्द बरोबर लिहिला, पण त्याने तो शब्द चुकीने लिहिला. तिला याबद्दल फार वाईट वाटले. का बरे? कवीला, तिने म्हटलेले आठवते: “मी तो शब्द बरोबर लिहिला याबद्दल मला क्षमा कर. तुझ्यापेक्षा श्रेष्ठ बनण्याचा मी द्वेष करते . . . कारण हे बघ, मी तुझ्यावर प्रेम करते.” होय, आम्ही एखाद्यावर प्रीती करतो तेव्हा, तो आमच्यापेक्षा कमी नव्हे तर श्रेष्ठ असण्याची आमची इच्छा असते, कारण प्रीती लीन आहे.

१८. लीनता आम्हाला कोणता शास्त्रवचनीय सल्ला ऐकण्यास मदत करील?

१८ हा धडा सर्व ख्रिश्‍चनांसाठी, खासपणे बांधवांसाठी उत्तम आहे. सेवेच्या विशेषाधिकाराच्या बाबतीत आमच्या ऐवजी इतर बांधवांना तो मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो का किंवा त्याबद्दल ईर्ष्या व हेव्याची चुणूक वाटते? आम्ही आमच्या बांधवांवर खरेच प्रीती करत असू तर त्याला खास नेमणूक किंवा मान्यता किंवा सेवेचा विशेषाधिकार मिळाल्याबद्दल आम्ही आनंद करू. होय, लीनता, हा सल्ला ऐकण्यासाठी सुलभ करील की: “एकमेकांना आदर दाखविण्यासाठी पुढाकार घ्या.” (रोमकर १२:१०, न्यूव.) दुसरे भाषांतर असे वाचले जाते: “तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्‍याला आदराने आपणापेक्षा थोर माना.” आणखी एकदा आम्हाला प्रेषित पौलाकरवी असा सल्ला दिला जातो: “प्रीतीने एकमेकांचे दास व्हा.” (गलतीकर ५:१३) होय, आम्हामध्ये प्रीती असल्यास, आमच्या बांधवांची सेवा करण्यासाठी, त्यांचे दास होण्यासाठी, त्यांची आस्था आणि कल्याणाला आमच्या स्वतःच्या पुढे ठेवण्यासाठी आम्हाला आनंद वाटेल, यासाठी लीनतेची आवश्‍यकता आहे. लीनता आम्हाला बढाई मारण्यापासून दूर ठेवील आणि अशाप्रकारे इतरात ईर्ष्येचा किंवा हेव्याचा आत्मा जागृत करण्याचे टाळील. पौलाने लिहिले की, प्रीती “बढाई मारीत नाही, फुगत नाही.” का नाही बरे? कारण बढाई मारण्यामागे व फुगण्यामागील मनोवृत्ती स्वार्थी, आपलपोट्यापणाची असते, परंतु प्रीती निःस्वार्थीपणाचा सार आहे.—१ करिंथकर १३:४.

१९. गर्व व स्वार्थीपणाप्रमाणे, लीनता व प्रीती, सोबत कार्य करतात या गोष्टीला पवित्र शास्त्रातील कोणती उदाहरणे स्पष्ट करतात?

१९ दाविदाचा, शौल राजा व त्याचा पुत्र योनाथान बरोबरील संबंध, प्रीती आणि लीनता कशाप्रकारे बरोबर कार्य करतात, तसेच गर्व आणि स्वार्थीपणाचा कसा निकट संबंध आहे त्याविषयी उल्लेखनीय उदाहरण आहे. दाविदाला लढाईत यश मिळाल्यामुळे, इस्राएली स्त्रियांनी गाईले: “शौलाने हजारो वधिले, आणि दाविदाने लाखो वधिले.” (१ शमुवेल १८:७) शौलाठायी लीनता तर नव्हतीच, परंतु त्याऐवजी, तेव्हापासून गर्वामुळे दाविदाला ठार मारण्याच्या द्वेषाची भावना त्याने जोपासली. त्याचा पुत्र योनाथानने दाखवलेल्या गुणापेक्षा हे किती वेगळे होते! त्याबद्दल आपण असे वाचतो की, योनाथानला दावीद प्राणाप्रमाणे प्रिय होता. (१ शमुवेल १८:१) यहोवा योनाथानाला नव्हे तर, दाविदाला आशीर्वादित करत होता व शौलानंतर इस्राएलाचा राजा होण्यासाठी तो वारस होईल हे या घटनेच्या दरम्यान उघड झाल्यामुळे, योनाथानाने कशी प्रतिक्रिया दाखवली? योनाथानाला ईर्ष्या किंवा हेवा वाटला का? कदापि नाही! कारण दाविदासाठी असलेल्या त्याच्या गाढ प्रीतीमुळे तो असे म्हणू शकला, जे आम्ही १ शमुवेल २३:१७ मध्ये वाचतो: “भिऊ नको; माझा बाप शौल याच्या हाती तू लागावयाचा नाहीस, तू इस्राएलाचा राजा होणार, व मी तुझा दुय्यम होणार; माझा बाप शौल यालाही हे ठाऊक आहे.” दाविदासाठी योनाथानाची असलेली गाढ प्रीती यामुळे, त्याच्या पित्यानंतर दावीद इस्राएलावर राज्य करील, या देवाच्या इच्छेचे आकलन झाल्यामुळे लीनतेने त्याने स्वीकार केला.

२०. येशूने, कशाप्रकारे प्रीती आणि लीनतेचा जवळचा संबंध दाखवला?

२० प्रीती आणि लीनता यांच्यातील संबंधाविषयीची आणखी एक जोरदार घटना, येशू ख्रिस्त आपल्या मरणाच्या आधी, शेवटल्या रात्री प्रेषितांसोबत असताना काय घडले त्याविषयीची आहे. योहान १३:१, मध्ये आपण असे वाचतो की, येशू, “जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते, ते त्याने शेवटपर्यंत केले.” त्यानंतर आम्ही वाचतो, येशूने घरच्या चाकराप्रमाणे वागून, त्याच्या प्रेषितांचे पाय धुतले. लीनतेचा तो किती जोरदार धडा!—योहान १३:१-११.

२१. सारांशामध्ये, आम्ही लीन का असले पाहिजे?

२१ खरेच, लीन असण्यासाठी पुष्कळशी कारणे आहेत. लीन असणे ही योग्य व प्रामाणिक गोष्ट आहे. हा विश्‍वासाचा मार्ग आहे. यामुळे यहोवा देव व आमच्या सह विश्‍वासूंसोबत चांगले संबंध बनवले जातात. तो सुज्ञतेचा मार्ग आहे. यापेक्षाही अधिक म्हणजे, हा प्रीतीचा मार्ग आहे व तो खरी धन्यता देतो.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

▫ लीन असण्यासाठी प्रामाणिकपणा कशाप्रकारे एक मदत आहे?

▫ लीन असण्यासाठी यहोवावरील विश्‍वास आम्हाला मदत का करतो?

▫ काय दाखवते की, लीन असणे हा सुज्ञतेचा मार्ग आहे?

▫ आम्ही लीन असण्यासाठी खासपणे प्रीती का मदतदायक आहे?

[१३ पानांवरील चित्रं]

ईयोबाने स्वतःला लीनतेने यहोवाच्या स्वाधीन केले. तो ‘देवाला शाप देऊन मरण पावला नाही’

[१५ पानांवरील चित्रं]

पौलाने सर्वांसमक्ष पेत्राला सल्ला दिल्यावर त्याने तो लीनतेने स्वीकारला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा