“धर्मत्यागी पुरुषा”ची ओळख पटविणे
“मग तो धर्मत्यागी प्रकट होईल, त्याला प्रभु येशू . . . मारुन टाकील.”—२ थेस्सलनीकाकर २:८.
१, २. धर्मत्यागी पुरुषाची ओळख पटवून घ्यावी हे आम्हासाठी का जरुरीचे आहे?
आम्ही अधर्मी युगात राहात आहोत. ती जगव्याप्त पीडा बनली आहे. सर्वत्र अधर्मी लुटारुंचे भय पसरले आहे, तसेच आमचे जीवन व मिळकत यावरही धोका संभवत आहे. तरीही आणखी एक कावेबाज अधर्मी घटक आहे व तो कित्येक शतकांपासून आपले काम करीत आहे. पवित्र शास्त्रात याला “धर्मत्यागी पुरुष” असे संबोधण्यात आले आहे.
२ या धर्मत्यागी माणसाची आपण ओळख पटवून घेणे जरुरीचे आहे. ते का? कारण तो देवासोबतचे आमचे चांगले स्थान तसेच सार्वकालिक जीवनाची आमची आशा या दोहोंची पायमल्ली करण्याचा चंग बांधून आहे. ते कसे? आम्हाला सत्य झुगारावयास लावून त्या ऐवजी तो खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लावतो व यामुळे आम्हाला पित्याची भक्ती “आत्म्याने व खरेपणाने” करण्यापासून दूर नेतो. (योहान ४:२३) त्याच्या कृतीवरूनच हे उघड होते की, हा विशिष्ट अधर्मी घटक देव, त्याचे उद्देश तसेच त्याच्या समर्पित लोकांस विरोध करतो.
३. पवित्र शास्त्र धर्मत्यागी माणसाकडे आपले लक्ष कशाप्रकारे वेधविते?
३ पवित्र शास्त्र या धर्मत्यागी पुरुषाविषयी २ थेस्सलनीकाकर २:३ मध्ये माहिती देते. देवाच्या पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन प्रेषित पौलाने लिहिलेः “कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण [या सद्य व्यवस्थेचा यहोवाकडील नाशाचा दिवस याच्या] आधी धर्मत्याग होऊन धर्मत्यागी पुरुष प्रकट होईल.” येथे पौलाने भाकित केले की या व्यवस्थेच्या अंताआधी प्रथम धर्मत्याग घडेल व मग धर्मत्यागी पुरुष सामोरा येईल. वस्तुतः पौल ७व्या वचनात म्हणतोः “धर्मत्यागाचे गूज आत्ताच आपले कार्य चालवीत आहे.” अशाप्रकारे पहिल्या शतकात, या धर्मत्याग्याने दिसण्यास सुरुवात झाली होती.
धर्मत्यागी पुरुषाचा उगम
४. या धर्मत्यागी पुरुषाचा जनक व पाठीराखा कोण आहे?
४ या धर्मत्यागी पुरुषाचा मुळारंभ कोणी केला व त्याला कोण पाठबळ देत आहे? पौल उत्तर देतो. तो म्हणतोः “ज्यांचा नाश होणार त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरली नाही. त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्त्कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनीतीजनक कपट यांनी युक्त असे त्या धर्मत्याग्याचे येणे होईल.” (२ थेस्सलनीकाकर २:९, १०) अशाप्रकारे, सैतान हा त्या धर्मत्यागी पुरुषाचा जनक व राखणदार आहे. सैतानही प्रत्यक्षात यहोवा, त्याचे उद्देश व लोक यांचा विरोधक आहे त्याचप्रमाणे हा धर्मत्यागी पुरुष सुद्धा त्याला जाणीव असो वा नसो, तसाच वागतो.
५. धर्मत्यागी पुरुष व त्याला अनुसरणाऱ्यांना कोणती कर्मगति मिळणार?
५ जे या धर्मत्यागी माणसाच्या मागे जातील त्यांनाही त्याच्याप्रमाणेच कर्मगति मिळणार, म्हणजेच, विनाश. “मग, तो धर्मत्यागी प्रकट होईल. त्याला प्रभु येशू . . . मारुन टाकील आणि आपण येताच स्वदर्शनानेच त्याला नाहीसे करील.” (२ थेस्सलनीकाकर २:८) धर्मत्यागी पुरुष व त्याला पाठबळ देणारे (“ज्यांचा नाश होणार”) यांच्या नाशाची वेळ लवकरच येत आहे. ते “प्रभु येशू आपल्या सामर्थ्याच्या दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालाविष्ठित असा प्रकट होण्याच्या समयी होईल. तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील. . . . तेव्हा ते . . . दूर होऊन युगानुयुगाचा नाश हा दंड त्यांना मिळेल.”—२ थेस्सलनीकाकर १:६-९.
६. धर्मत्यागी माणसाविषयी पौल आणखी कोणती माहिती कळवितो?
६ पौल या धर्मत्यागी माणसाचे अधिक वर्णन देतो. तो म्हणतोः “तो . . . विरोधी व ज्याला ‘देव’ किंवा भजनीय वस्तु म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे.” (२ थेस्सलनीकाकर २:४) अशाप्रकारे पौल हा इशारा देतो की, सैतान अशा एका धर्मत्याग्याला, एका भजनीय वस्तुला सामोरे आणणार, जो स्वतःला देवाच्या नियमांपेक्षाही उंच बसवणार होता.
त्या धर्मत्यागी माणसाची ओळख पटविणे
७. पौल कोणा विशिष्ठ माणसाविषयी बोलत नव्हता हे आपल्याला कसे समजू शकते, आणि हा धर्मत्यागी पुरुष कशाला अनुलक्षून असावा?
७ पौल कोणा वैयक्तिकाविषयी भाष्य करीत होता का? नाही, कारण पौलाने म्हटले की, हा “पुरुष” पौलाच्या काळी दृश्यमान होता व तो आपले अस्तित्व यहोवा त्याला या व्यवस्थेच्या शेवटी नष्ट करीपर्यंत टिकवणार होता. अशाप्रकारे तो कित्येक शतके अस्तित्वात राहिला आहे. इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत कोणा खऱ्या माणसाला जिवंत राहता येणे शक्य नाही हे उघड आहे. या कारणास्तव “धर्मत्यागी पुरुष” या संज्ञेचा अर्थ लोकांचा गट, किंवा वर्ग याला अनुलक्षून आहे.
८. हा धर्मत्यागी पुरुष कोण, आणि याची काही ओळखचिन्हे कोणती?
८ मग ते कोण आहेत? पुरावा हे स्पष्ट करतो की, तो ख्रिस्ती धर्मजगताच्या गर्विष्ठ व महत्त्वाकांक्षी धर्मगुरुंचा वर्ग आहे व याने स्वतःला एक कायदा म्हणून स्वतःच वागविले आहे. हे, ख्रिस्तीधर्मराज्यात हजारो वेगवेगळे धर्म व पंथ आहेत, त्यांचे प्रत्येकाचे धर्मपुढारी आहेत तरीपण प्रत्येक पंथ हा तत्त्वप्रणाली किंव प्रथा यांच्याबाबतीत थोड्या फार फरकाने एकमेकांच्या विरुद्ध आहे यावरुन दिसून येते. अशी ही विभाजित स्थिती, ते देवाच्या नियमांचे पालन करीत नाही हे स्पष्ट दाखविते. ते देवाकडून असू शकत नाहीत. (पडताळा मीखा २:१२; मार्क ३:२४; रोमकर १६:१७; १ करिंथकर १:१०.) या सर्व धर्मपंथात एक सर्वसाधारण गोष्ट जी आढळून येते ती ही आहे की, ते पवित्र शास्त्राच्या शिकवणींना अनुसरीत नाहीत, ते या तत्त्वाचे उल्लंघन करतात की, “शास्त्रलेखापलिकडे कोणी जाऊ नये.”—१ करिंथकर ४:६; तसेच मत्तय १५:३, ९, १४ देखील पहा.
९. त्या धर्मत्यागी पुरुषाने कोणत्या अशास्त्रीय विश्वासाची बदली पवित्र शास्त्रीय सत्याऐवजी केली?
९ अशाप्रकारे हा धर्मत्यागी संयुक्त मनुष्य आहेः तो ख्रिस्ती धर्मजगतातील धार्मिक पुढारीवर्ग आहे. त्या सर्वांवर, मग कोणी पोप, पाळक, कुलपिते, किंवा प्रॉटेस्टंट पंथीय प्रचारक असो, ख्रिस्ती धर्मजगताच्या धार्मिक पापांचा दोष आहे. त्यांनी देवाच्या सत्याचा मूर्तिपूजक लबाड्यांशी मोबदला केला, आणि मानवी जिवाचे अमरत्व, अग्नीनरकाच्या यातना, परगेटरी व त्रैक्य अशा अशास्त्रीय शिकवणींचे शिक्षण दिले. ते त्याच धर्मपुढाऱ्यांसारखे आहेत, ज्यांच्याविषयी येशू असे म्हटले होते की, “तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहे, आणि आपल्या बापाच्या वासनाप्रमाणे करावयास पाहता. . . . तो लबाड व लबाडाचा बाप आहे.” (योहान ८:४४) त्यांचे आचरण देखील ते अधर्मी असल्याचे स्पष्ट करते, कारण ते देवाच्या नियमांचा भंग करणाऱ्या कार्यात स्वतःला समाविष्ठ करतात. अशा लोकांना येशू म्हणतोः “अहो, अधर्म करणाऱ्यांनो, मजपासून दूर व्हा.”—मत्तय ७:२१-२३.
स्वतःला उंच करणे
१०. धर्मत्यागी माणसाने राजकीय अधिपतींसोबत कोणता संबंध राखला?
१० इतिहास दाखवितो की, या धर्मत्यागी पुरुषाच्या वर्गात असणाऱ्यांनी अशा स्वरुपाचा गर्व व उद्धटपणा दाखविला की ज्यामुळे त्यांनी जगाच्या अधिपतींना देखील वास्तविकपणे मार्गदर्शित केले. ‘राजांचा ईश्वरी हक्क’ या तत्त्वाचा बहाणा करुन पाळकांनी, स्वतः अधिपती व देव याजमध्ये आवश्यक असणारी मध्यस्ती करणारे आहोत असा दावा केला. त्यांनी राजे व बादशहांना गादीवर बसविले व त्यांना पदभ्रष्टही केले, तसेच लोकांना अधिपतीकरता किंवा त्यांच्याविरुद्ध जाण्यास चिथविले. वस्तुतः, त्यांनी येशूला नाकारणाऱ्या यहुदी प्रमुख याजकांसारखेच म्हटले की, “कैसरावाचून आम्हाला कोणी राजा नाही.” (योहान १९:१५) तरीपण, येशूने हे स्पष्ट शिक्षण दिले होते की, “माझे राज्य या जगाचे नाही.”—योहान १८:३६.
११. पाळकवर्गाने स्वतःला कसे उंच केले?
११ सर्वसाधारण लोकांपेक्षा आपण अत्युच्च आहोत हे दाखविण्यासाठी या धर्मत्यागी वर्गाने वेगवेगळे पेहराव, जे बहुधा काळे आहेत ते निवडले. याशिवाय त्यांनी सर्व प्रकारच्या पंथचिन्हांनी आणि मुकुट, क्रुस व टोके असणाऱ्या टोप्यांनी स्वतःला विभूषित केले. (पडताळा मत्तय २३:५, ६.) पण येशू व त्याच्या अनुयायांनी असा काही पेहराव केला नव्हता; ते तर सर्वसाधारण लोकांसारखाच पेहराव घालीत. धर्मपुढाऱ्यांनी स्वतःला आणखी वेगवेगळ्या पदव्या लावून घेतल्या आहेत जसे की, “फादर,” “होली फादर,” “रेव्हरंड,” “मोस्ट रेव्हरंड,” “हिज एक्सेलेंन्सी,” “हिज एमिनन्स.” अशाप्रकारे त्यांनी ‘स्वतःला उंच केले आहे.’ पण येशूने या धार्मिक पदव्यांविषयी म्हटले होतेः “पृथ्वीवरील कोणाला बाप [फादर] म्हणू नका.” (मत्तय २३:९) एलिहू देखील इयोबाच्या तीन भिकार सांत्वनकर्त्यांचे खंडण करताना म्हणाला होताः “मी कोणाचा पक्ष धरणार नाही, कोणाची खुशामत करणार नाही.”—ईयोब ३२:२१.
१२. हे पाळक खरेपणाने कोणाची सेवा करतात असे पौलाने म्हटले?
१२ धर्मत्यागी पुरुषाने आपल्या कामाचा आरंभ त्या काळी केला आहे असे पौलाने म्हटले तेव्हा जे या धर्मत्यागी प्रवृत्तीचे अनुकरण करतील त्यांच्याविषयीही तो हे म्हणाला होताः “अशी ही माणसे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रुप धरणारी अशी आहेत. ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. सैतानही स्वतः तेजोमय देवदूताचे रूप धरतो. यास्तव त्याच्या सेवकांनीही नीतीवानाच्या सेवकांचे रूप धारण केल्यास त्यामध्ये मोठीशी गोष्ट नाही. त्यांचा शेवट त्यांच्या कर्माप्रमाणे होईल.”—२ करिंथकर ११:१३-१५.
खऱ्या भक्तीविरुद्ध बंड
१३. पौलाने भाकित केलेला धर्मत्याग कोणता आहे?
१३ पौलाने म्हटले की धर्मत्यागी माणसाची वाढ धर्मत्यागासोबतच होईल. खरे म्हणजे, पौलाने या धर्मत्यागी वर्गाची पहिली ओळख देताना असे म्हटले की, “यहोवाच्या दिवसाच्या [जेव्हा यहोवा या दुष्ट व्यवस्थेचा अंत करील] अगोदर धर्मत्याग” होईल. (२ थेस्सलनीकाकर २:२, ३) पण, “धर्मत्याग” म्हणजे काय? या संदर्भात पाहू जाता त्याचा आध्यात्मिक अशक्तपणामुळे पडणे किंवा अंतर देणे असा अर्थ होत नाही. येथे जो ग्रीक शब्द “धर्मत्याग” यासाठी वापरण्यात आला आहे तो इतर गोष्टींसमवेत “त्याग,” किंवा “बंड” असाही अर्थ देतो. कित्येक भाषांतरे येथे “बंड” असा अनुवाद करतात. विल्यम बर्कले यांची आवृत्ती म्हणतेः “मोठे बंड घडल्याशिवाय तो दिवस येणार नाही.” द जरुसलेम बायबल याला “मोठी फितुरी” म्हणते. या कारणास्तव, पौल आपली चर्चा ज्या अनुषंगाने करीत आहे ते पाहता “धर्मत्याग” म्हणजे खऱ्या भक्तीविरुद्धचे बंड असा त्याचा अर्थ होतो.
१४. धर्मत्यागाची मोठ्या प्रमाणात केव्हा वाढ सुरु झाली?
१४ हा धर्मत्याग, हे बंड कसे वाढले? २ थेस्सलनीकाकर २:६ मध्ये पौलाने त्याच्या काळाविषयी लिहिताना म्हटले की, “प्रतिबंधक” या धर्मत्यागाविरुद्ध कार्य करीत होता. ते काय होते? तो प्रेषितांकरवीचा प्रतिबंध होता. त्यांचे अस्तित्व व सोबत त्यांना मिळालेली पवित्र आत्म्याची दाने यांजमुळे हा धर्मत्याग मोठी पिडा होण्यापासून प्रतिबंध लादला गेला. (प्रे. कृत्ये २:१-४; १ करिंथकर १२:२८) पण, पहिल्या शतकाच्या अंतापर्यंत सर्व प्रेषित निवर्तले तेव्हा हा प्रतिबंध मोडला गेला.
अशास्त्रीय पाळकवर्ग विकसित होतो
१५. येशूने ख्रिस्ती मंडळीकरता कोणती व्यवस्था लावून दिली होती?
१५ येशूने ज्या मंडळीची प्रस्थापना केली होती ती पहिल्या शतकात वडील (देखरेखे) व उपाध्य सेवक यांच्या मार्गदर्शनाखाली वाढू लागली. (मत्तय २०:२५-२७; १ तीमथ्य ३:१-१३; तीत १:५-९) यांची निवड मंडळीतूनच होत असे. ज्याप्रमाणे येशूला खास वेदांतीय शिक्षण नव्हते त्याचप्रमाणे हेही त्या प्रकारातील शिक्षण नसणारे लायक असे आध्यात्मिक पुरुष होते. येशूच्या विरोधकांना याविषयी खरेच नवल वाटले होतेः “शिकल्यावाचून याला विद्या कशी आली?” (योहान ७:१५) तसेच प्रेषितांविषयी धार्मिक पुढाऱ्यांनीही हेच निरिक्षण केले होतेः “पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे अनक्षर व अज्ञानी इसम आहेत असे समजून त्यांनी आश्चर्य केले; आणि हे येशूच्या सहवासात होते असेही त्यांनी ओळखले.”—प्रे. कृत्ये ४:१३.
१६. मंडळ संघटनेच्या बाबतीत पहिल्या शतकाच्या ख्रिस्ती नमुन्यापासून धर्मत्यागाने कसे दूर जाणे केले?
१६ तथापि, धर्मत्यागाने यहुदी धर्मपुढारी यांच्यापासून तसेच ओघाओघाने मूर्तिपूजक रोमी धर्मव्यवस्थेकडून विचारधारा प्राप्त करून ती सामोरी आणली. काळ जात राहिला व खऱ्या विश्वासातून पतन होऊ लागले तसतसे अशास्त्रीय धार्मिक पुढाऱ्यांचा वर्ग वाढू लागला. मुकुटमंडीत पोपनी कार्डिनलच्या विद्यालयावर प्रभुत्व करणे आरंभिले. हे कार्डिनल बिशप व आर्चबिशपमधून निवडण्यात येत आणि या बिशप तसेच आर्चबिशप हे वेदांत शाळेत प्रशिक्षण घेणाऱ्या पाळकातून पुढे येत असत. अशाप्रकारे, पहिल्या शतकानंतर बराच काळ गेला नसेल, तेव्हा राजयोगी धार्मिक पुढाऱ्यांच्या वर्गाने ख्रिस्ती धर्मराज्यात आपले स्थान पटकावले. या वर्गाने पहिल्या शतकातील ख्रिस्ती वडील व उपाध्य सेवकांचा नमुना अनुसरला नाही, तर मूर्तिपूजक धर्मव्यवस्थेनुरुपचा नमुना उचलला.
१७. धर्मत्यागी पुरुषाला खासकरुन केव्हा अधिकार सूत्रे मिळाली?
१७ तिसऱ्या शतकाच्या आरंभापर्यंत साधारण विश्वासधारकांची दुसऱ्या वर्गाचे लोक अशी खालच्या दर्जावर वर्गवारी करण्यात आली होती. धर्मभ्रष्ट धर्मत्यागी मानवाने हळूवारपणे आपल्या अधिकाराची सूत्रे हाती घेतली. ही सूत्रे रोमी सम्राट कॉन्स्टंटाईनच्या काळी खासपणे इ.स. ३२५ मध्ये निका येथील परिषदेनंतर बहाल झाली. यावेळी चर्च व राज्य एक झाले होते. अशाप्रकारे धर्मत्यागी पुरुष—ख्रिस्ती धर्मजगतातील पाळकवर्ग—याची शतकानुशतके अशी खरा देव यहोवा याच्याविरुद्ध बंडाळी करण्याची प्रदीर्घ वाटचाल आरंभिली गेली. जे नियम व ज्या व्यवस्था यांनी आचरल्या त्या त्यांच्या स्वतःच्या होत्या, देवाच्या नव्हे.
मूर्तिपूजक शिकवणी
१८. त्या धर्मत्याग्याने कोणती निंद्य अशी मूर्तिपूजक शिकवण कवटाळली?
१८ वाढणाऱ्या धर्मत्यागी पुरुषाने मूर्तिपूजक शिकवणी देखील उसनवारीने घेतल्या. उदाहरणार्थ, एकच खरा देव जो म्हणतो की, “मी यहोवा आहे, हे माझे नाम आहे. मी आपले गौरव दुसऱ्यास देऊ देणार नाही,” आणि “मीच यहोवा, अन्य कोणी नव्हे, मजवेगळा देव नाही,” याच्या ऐवजी गूढ, आकलन होऊ न शकणाऱ्या त्रैक्य देवाची बदली करण्यात आली. (यशया ४२:८; ४५:५) देवाच्या सत्याची बदली मानवी काय पण मूर्तिपूजक विचारधारेशी करण्याची मजल आणखी एका निंद्य गोष्टीचा स्विकार करण्यात घडली. ते म्हणजे पवित्र शास्त्रातील नम्र अशा मरीयेची ख्रिस्ती धर्मजगतामधील “देवाची आई” या अर्थी पूजाअर्चा सुरु झाली. याप्रकारे अशा खोट्या धर्माचे प्रवर्तक, धार्मिक पुढाऱ्यांचा वर्ग सैतानाकरवी पेरल्या गेलेल्या “निदणा”च्या मालिकेत बसला. ख्रिस्ताने पेरलेल्या सुंदर बीजाची वाढ खुंटवावी हा यात सैतानाचा हेतू होता.—मत्तय १३:३६-३९.
१९. ख्रिस्ती धर्मजगताचे शतकाशतकात कसे तुकडे होत गेले, पण काय चिरस्थायी राहिले?
१९ जेव्हा दुफळी व तट पडू लागले तेव्हा ख्रिस्ती धर्मजगताचे शेकडो धर्मपंथ किंवा विभाग यात विभाजन झाले. पण प्रत्येक नव्या धर्मात वा पंथात, काहींचा अपवाद वगळता धर्मपुढारी व दुय्यम लोकांचा सर्वसाधारण वर्ग ही व्यवस्था तशीच राहिली. याप्रकारे धर्मत्यागी पुरुष आजतागायत जिवंत राहिला आहे. शिवाय तो आजही स्वतःला वेगळ्या पेहरावांनी भूषित करून आणि जोरदार पदव्या लेववून सर्वसाधारण लोकांपेक्षा उंच जागी विराजमान होऊन बसला आहे. तद्वत, पौलाने जेव्हा असे लिहिले की, हा धर्मत्यागी पुरुष वर्ग स्वतःला गौरवील आणि देवाच्या दर्जापेक्षा स्वतःला उंच करील ते अतिशयोक्तीचे वाटत नाही.
धर्मगुरुंची परंपरा
२०. कॅथोलिकांचा संदर्भग्रंथ पोपविषयी काय माहिती देतो?
२० रोमच्या धर्मगुरुंची परंपरा हे अशा उंचावण्याचे एक उदाहरण आहे. इटलीत प्रकाशित करण्यात आलेला लुसिओ फेरारीस याच्याकरवी लिखित असणारा चर्च-शब्दकोष पोपचे वर्णन “ते इतके थोर व श्रेष्ठ आहेत की, ते मनुष्य नव्हे तर प्रत्यक्षात देव आहेत व ‘देवाची बदली’ आहेत,” असे करते. पोपचा मुकुट तिहेरी म्हणजे, “स्वर्ग, पृथ्वी व नरकाचा राजा” असल्याचे सूचित करते. हाच शब्दकोष पुढे म्हणतोः “पोप जणू पृथ्वीवर देवच आहेत. ख्रिस्तावरील सर्व विश्वासधारकाचे एकमेव राजपुत्र व राजांचे राजे आहेत.” ते आणखी सांगतेः “ईश्वरी कायद्याची बदली कधीकधी पोपना करता येते.” याचप्रमाणे पोपविषयी द न्यू कॅथोलिक डिक्शनरी म्हणतेः “त्यांच्या प्रतिनिधींना परराष्ट्रात असणाऱ्या इतर सर्व वर्गाच्या सदस्यांवर प्रभुत्व आहे.”
२१. पोपकरवीची हालचाल पेत्र व दूताच्या हालचालीपेक्षा कशी भिन्न आहे ते स्पष्ट करा.
२१ येशूच्या शिष्यांसारखे न राहता पोप बहुधा खूपच दिमाखी पेहराव घालतात व मानवाकडून मानवंदना घेतात. पोप लोकांना प्रणिपात करण्यास, त्यांच्या अंगठीचे चुंबन घेण्यास आणि खास खुर्चीत स्वतःला बसवून लोकांना खांद्यावरुन वाहून नेण्यास मुभा देतात. पण या सर्व शतकात पोपनी केवढी व्यर्थता दाखविली आहे! याउलट, पेत्राने केवढा साधा व नम्र भाव प्रदर्शित केला तो पहा. कर्नेल्य हा रोमी सैन्याचा अधिकारी पेत्राच्या पाया पडून त्याला वंदन करू इच्छित होता, पण पेत्राने त्याला म्हटले: “उभे राहा; मीही केवळ मनुष्यच आहे!” (प्रे. कृत्ये १०:२५, २६, कॅथोलिक जरुसलेम बायबल) याशिवाय, ज्या दिव्यदूताने प्रेषित योहानाला प्रकटीकरण दाखविले त्याचीही प्रवृत्ती बघा ना! योहान भारावून जाऊन या दूताच्या पाया पडू लागला; पण तो दूत त्याला म्हणालाः “सावधान! असे करू नको. मी तुझा, तुझे बंधु संदेष्टे व या पुस्तकातील वचने पाळणारे लोक यांचा सोबतीचा दास आहे. नमस्कार देवाला घाल.”—प्रकटीकरण २२:८, ९.
२२. कोणत्या शास्त्रवचनीय नियमाद्वारे धर्मत्यागी पुरुषाची ओळख घडते?
२२ पाळकवर्गाचे करण्यात आलेले हे मूल्यमापन फारच कडक वाटते का? येशूने खोट्या संदेष्ट्यांना ओळखण्याविषयीचा जो नियम दिला होता त्याचा अवलंब करून ते आपल्याला ठरविता येईल. तो म्हणालाः “तुम्ही त्यांच्या फळावरुन त्यांना ओळखाल.” (मत्तय ७:१५, १६) तर मग, इतक्या शतकापावेतो तसेच आमच्या या विसाव्या शतकात पाळकवर्गाची कोणत्या प्रकारातील फलप्राप्ती दिसून आली? मग, या धर्मत्यागी पुरुषाचे काय होणार व त्यात आणखी कोणाला सहभाग मिळणार? जे खरोखरीच देवाचे भय बाळगत आहेत अशांवर या धर्मत्यागी पुरुषाच्या अनुषंगाने काय करण्याची जबाबदारी येते? या सर्व मुद्यांची चर्चा पुढील लेख करील.
उजळणीसाठी प्रश्नः
◻ धर्मत्यागी पुरुष काय आहे व तो केव्हा दिसू लागला?
◻ या धर्मत्यागी वर्गाचा कोण जनक आहे ते पवित्र शास्त्र कसे दाखविते?
◻ पाळकवर्गाने स्वतःला लोकांपेक्षा कसे अधिक उंचावले?
◻ पाळकवर्गाकरवी कोणत्या धर्मत्यागी शिकवणी व प्रथांची वाढ करण्यात आली?
◻ पेत्र तसेच दिव्यदूताची प्रवृत्ती पोपपेक्षा कशी वेगळी दिसते?
[१६ पानांवरील चित्रं]
प्रेषित पेत्राने पोपप्रमाणे लोकांना आपल्या पाया पडू दिले नाही