वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ijwbq article ५४
  • लोक का मरतात?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • लोक का मरतात?
  • बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बायबलचं उत्तर
  • येशू तारण करतो—कसे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • येशूला यातना सहन करून मरण का सोसावं लागलं?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
  • पापाचा अंत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • आपण वृद्ध होतो व मरतो ते का?
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
अधिक माहिती पाहा
बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
ijwbq article ५४

लोक का मरतात?

बायबलचं उत्तर

आपल्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू होतो, तेव्हा खासकरून आपल्या मनात प्रश्‍न येऊ शकतो की आपण का मरतो. बायबल म्हणतं: “मरण आणणारी नांगी म्हणजे पाप.”—१ करिंथकर १५:५६.

सगळे लोक पापी का आहेत आणि ते का मरतात?

पहिल्या मानवी जोडप्याने, आदाम आणि हव्वा यांनी देवाविरुद्ध पाप केल्यामुळे आपला जीव गमावला. (उत्पत्ती ३:१७-१९) देवच “जीवनाचा उगम” असल्यामुळे, त्याच्याविरुद्ध पाप करण्याचा परिणाम मृत्यू होता.—स्तोत्र ३६:९; उत्पत्ती २:१७.

आदामने पापाचा दोष आपल्या सर्व वंशजांना दिला. बायबल म्हणतं: “एका माणसाद्वारे पाप जगात आलं आणि पापाद्वारे मरण आलं आणि अशा रितीने सर्व माणसांमध्ये मरण पसरलं, कारण त्या सगळ्यांनी पाप केलं होतं.” (रोमकर ५:१२) याचा अर्थ, सगळ्यांनी पाप केल्यामुळे सगळे मरतात.—रोमकर ३:२३.

मृत्यू कसा नाहीसा केला जाईल?

देव अभिवचन देतो, की तो लवकरच “मृत्यू कायमचा काढून टाकेल.” (यशया २५:८) पण मृत्यू काढून टाकण्यासाठी त्याला त्याचं मूळ कारण, म्हणजे पाप काढून टाकावं लागेल. देव हे येशू ख्रिस्ताद्वारे करेल. कारण येशू हा ‘जगाचा पाप दूर करणारा’ आहे.—योहान १:२९; १ योहान १:७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा