वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ijwbq article ४६
  • सैतान एक खरी व्यक्‍ती आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सैतान एक खरी व्यक्‍ती आहे का?
  • बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बायबलचं उत्तर
  • सैतानाबद्दल आणखी काही गैरसमज
  • सार्वकालिक जीवनाचा शत्रू
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • दियाबल—फक्‍त अंधविश्‍वास नाही
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • सैतानाला विरोध करा आणि तो पळून जाईल!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • जगावर खरोखर कोण राज्य करत आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
अधिक माहिती पाहा
बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
ijwbq article ४६

सैतान एक खरी व्यक्‍ती आहे का?

बायबलचं उत्तर

हो, सैतान एक खरी व्यक्‍ती आहे. त्याला एक स्वर्गदूत म्हणून निर्माण करण्यात आलं होतं. पण, नंतर तो दुष्ट बनला आणि त्याने देवाविरुद्ध बंड केलं. बायबलमध्ये त्याला “या जगाचा अधिकारी” म्हटलं आहे. (योहान १४:३०; इफिसकर ६:११, १२) सैतान कशा प्रकारची व्यक्‍ती आहे हे दाखवण्यासाठी बायबलमध्ये त्याच्यासाठी वेगवेगळी नावं आणि शब्द वापरले आहेत. जसं की,

  • सैतान, ज्याचा अर्थ ‘विरोधक’ असा होतो.​—ईयोब १:६.

  • दियाबल, ज्याचा अर्थ ‘निंदा करणारा’ असा होतो.​—प्रकटीकरण १२:९.

  • साप, ज्याचा बायबलमध्ये ‘फसवणारा’ या अर्थाने उपयोग केला आहे.​—२ करिंथकर ११:३.

  • मोहात पाडणारा.​—मत्तय ४:३.

  • खोटारडा.​—योहान ८:४४.

नुसतीच एक कल्पना किंवा वाईटपणा नाही

काही लोकांना वाटतं, की सैतान एक खरी व्यक्‍ती नसून नुसतीच एक कल्पना किंवा वाईटपणा आहे. पण हे खरं नाही. कारण बायबलमध्ये देव आणि सैतान यांच्यात झालेलं एक संभाषण दिलंय. देव परिपूर्ण आहे. त्यामुळे साहजिकच त्याच्यात कोणताही वाईटपणा नाही. याचाच अर्थ तो सैतान या खऱ्‍या व्यक्‍तीशी बोलत होता. (अनुवाद ३२:४; ईयोब २:१-६) तसंच, येशूसुद्धा परिपूर्ण आहे त्याच्यात कोणतंही पाप किंवा वाईटपणा नाही. पण तो पृथ्वीवर असताना सैतानाने त्याला मोहात पाडायचा प्रयत्न केला. (मत्तय ४:८-१०; १ योहान ३:५) तर बायबलमधल्या या उदाहरणांवरून दिसून येतं, की सैतान नुसतीच एक कल्पना किंवा वाईटपणा नसून एक खरी व्यक्‍ती आहे.

पण सैतान खरोखर आहे हे बरेच लोक मानत नाहीत, याचं आपल्याला आश्‍चर्य वाटलं पाहिजे का? अजिबात नाही. कारण बायबलमध्ये सांगितलंय की सैतान आपली ध्येयं साध्य करण्यासाठी इतरांची फसवणूक करतो. (२ थेस्सलनीकाकर २:९, १०) तो खूप चलाख आहे. आणि आपण एक खरी व्यक्‍ती नाही असा लोकांनी विचार करावा म्हणून त्याने बऱ्‍याच जणांना एक प्रकारे अंधळं केलंय.​—२ करिंथकर ४:४.

सैतानाबद्दल आणखी काही गैरसमज

खरी माहिती: काही बायबलमध्ये “लूसिफर” असं भाषांतर केलेल्या इब्री भाषेतल्या शब्दाचा अर्थ “तेजस्वी” असा होतो. (यशया १४:१२) या वचनाची मागची-पुढची माहिती पाहिली, तर कळतं की हा शब्द बाबेलच्या राजघराण्याला किंवा राजांना सूचित करण्यासाठी वापरण्यात आलाय. पण देव या गर्विष्ठ राजांना नमवेल असं सांगण्यात आलं होतं. (यशया १४:४, १३-२०) बाबेलच्या राजघराण्याचा पराभव झाल्यावर त्याची थट्टा करण्यासाठी “तेजस्वी” हा शब्द वापरण्यात आला.

खरी माहिती: सैतान देवाचा सेवक नाही, तर त्याचा शत्रू आहे. जे देवाची सेवा करतात त्यांचा तो विरोध करतो आणि त्यांच्यावर खोटे आरोप लावतो.​—१ पेत्र ५:८; प्रकटीकरण १२:१०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा