वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mrt article १३४
  • हिंसेने समस्या सुटत नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हिंसेने समस्या सुटत नाही
  • आणखी विषय
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • येशूने काय शिकवलं?
  • येशूने काय केलं आणि तो काय करणार आहे?
  • संपूर्ण जगात लवकरच शांती असेल
    आणखी विषय
  • इतरांचे बरे करत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • सर्वाधिक प्रसिद्ध असलेले प्रवचन
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • ख्रिस्ताची मनोवृत्ती आत्मसात करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
अधिक माहिती पाहा
आणखी विषय
mrt article १३४
येशू स्त्री-पुरुषांच्या आणि मुलांच्या एका जमावाला शिकवतोय.

येशूकडून शिका

हिंसेने समस्या सुटत नाही

आज बऱ्‍याच लोकांना वाटतं, की वाद झाले किंवा समस्या उद्‌भवल्या तर ते हिंसेनेच सुटतील. पण ही गोष्ट महान शिक्षकाच्या म्हणजेच येशूच्या शिकवणींच्या विरोधात आहे. शिवाय तो तसा वागलाही नाही. चला, त्याने काय शिकवलं आणि तो कसा वागला त्यांपैकी काही गोष्टी आपण पाहू या.

येशूने काय शिकवलं?

येशूने एका प्रसिद्ध प्रवचनात असं शिकवलं की राग, संताप आणि हिंसा याने मतभेद सुटत नाहीत. त्याने काय म्हटलं ते पाहू या.

  • “ज्या गोष्टी इतरांनी आपल्यासाठी कराव्यात असं तुम्हाला वाटतं, त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी केल्या पाहिजेत.” (मत्तय ७:१२; लूक ६:३१) या सल्ल्याला ‘सुवर्ण नियम’a असं म्हटलं जातं. आपण कसं वागलं पाहिजे हे या नियमातून कळतं. त्यात सांगितलंय, की इतरांनी आपल्याशी जसं वागायला हवं असं आपल्याला वाटतं, तसं आपणही त्यांच्याशी वागलं पाहिजे. लोकांनी आपल्याशी भांडावं, वाईट वागावं असं कोणालाच वाटत नाही. मग आपणसुद्धा मतभेद झाले तरीही सगळ्यांशीच आदराने आणि प्रेमाने वागू नये का?

  • “जो तुमच्या उजव्या गालावर मारतो, त्याच्यापुढे दुसराही गाल करा.” (मत्तय ५:३८, ३९; लूक ६:२९) येशूला इथे असं म्हणायचं नव्हतं, की आपण दुसऱ्‍यांना आपल्याशी वाईट वागायचा बढावा द्यावा. त्याऐवजी तो त्याच्या काळातल्या काही धर्मपुढारींच्या शिकवणी चुकीच्या असल्याचं सांगत होता. ते धर्मपुढारी कदाचित असं शिकवत होते, की बदला घेणं चुकीचं नाही. पण येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं, की आपल्याला भडकवलं जातं तेव्हा त्यांनी बदला घेऊ नये तर प्रेमाने समोरच्याला उत्तर द्यावं.b

  • “आपल्या शत्रूंवर प्रेम करत राहा.” (मत्तय ५:४३, ४४; लूक ६:२७) येशूने शिकवलं की जे आपला द्वेष करतात किंवा आपल्याशी वाईट वागतात त्यांच्याशी आपण दयेने वागलं पाहिजे. पण त्याच्या म्हणण्याचा असा अर्थ नव्हता, की समोरच्याचं वाईट वागणं आपल्याला पटतंय.c याउलट, आपण जेव्हा त्याच्याशी दयेने वागतो तेव्हा त्याचा राग शांत होऊ शकतो. इतकंच काय तर, यामुळे त्याला आपल्याशी चांगलं वागावंसंही वाटेल.

येशूने काय केलं आणि तो काय करणार आहे?

येशूने शिकवलं की हिंसेने समस्या सुटत नाही. त्याने जे शिकवलं त्याप्रमाणे तो वागलासुद्धा. त्याला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा त्याच्या एका शिष्याने त्याला वाचवण्यासाठी हिंसेचा आधार घेतला. पण येशू त्याला म्हणाला: “आपली तलवार जागच्या जागी ठेव, कारण जे तलवार हातात घेतात त्यांचा तलवारीने नाश होईल.” (मत्तय २६:५२) आपल्याशी वाईट वागणाऱ्‍यांना माफ करून आणि त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करून येशूने त्यांच्यावर प्रेम असल्याचं दाखवलं!—लूक २३:३३, ३४; १ पेत्र २:२३.

बायबल वचन देतं, की “शांतीचा राजकुमार” येशू लवकरच सर्व प्रकारच्या हिंसेचा अंत करणार आहे. (यशया ९:६, ७) या सुंदर भविष्याविषयी जास्त जाणून घ्यायला “युद्ध आणि संघर्षांचा अंत कसा होईल?” हा लेख वाचा.

a जास्त माहितीसाठी “सुवर्ण नियम व्यावहारिक आहे” हा लेख वाचा.

b जास्त माहितीसाठी “यह कानून क्यों दिया गया था कि ‘आँख के बदले आँख’ ली जाए?” हा लेख वाचा.

c जास्त माहितीसाठी “आपल्या ‘शत्रूंवर प्रेम करत राहा’ याचा काय अर्थ होतो?” हा इंग्रजीतला लेख वाचा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा