वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w26 जुलै पृ. ३१
  • ‘लवकरात लवकर वाद मिटवा’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘लवकरात लवकर वाद मिटवा’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • मिळती जुळती माहिती
  • “मी तर तुम्हाला मित्र म्हटलं आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • तुम्हाला मित्र बनवायचेत का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • माझ्या जिवलग स्नेह्‍याने स्थलांतर का केले?
    सावध राहा!—१९९७
  • तुम्ही यहोवाशी मैत्री करू शकता!
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
w26 जुलै पृ. ३१
एक बहीण दुसऱ्‍या बहिणीच्या घरी जाऊन मनापासून तिची माफी मागत आहे.

‘लवकरात लवकर वाद मिटवा’

एखाद्या भावाने किंवा बहिणीने कधी तुमचं मन इतकं दुखावलंय का, की आता तुम्हाला त्यांचा राग आलाय आणि तुमचं नातं आधीसारखं राहिलेलं नाही? जर असं असेल, तर तुटलेलं नातं पुन्हा जोडण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर पाऊल उचलावं लागेल.a

या उदाहरणाचा विचार करा. जर आपलं हाड मोडलं आणि आपण लवकरात लवकर इलाज केला नाही, तर आपला त्रास वाढू शकतो. इतकंच काय, तर आपल्याला हालचाल करणं शक्य होणार नाही आणि आपलं कायमचं नुकसानही होऊ शकतं. पण जर आपण लगेच इलाज केला, तर आपलं दुखणं कमी होईल आणि आपल्याला बरं वाटेल.

मोडलेल्या हाडासारखंच बिघडलेलं नातं पुन्हा जोडण्यासाठीही लवकरात लवकर पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे. येशूने म्हटलं होतं: ‘लवकरात लवकर वाद मिटवा.’ (मत्त. ५:२५) जर आपण असं केलं नाही तर आपल्यातला दुरावा आणखी वाढू शकतो आणि भाऊबहिणींसोबतची आपली मैत्री आपण कायमची गमावू शकतो. त्यामुळे मतभेद होतात तेव्हा आपण आपल्या मित्राशी प्रेमाने आणि मनमोकळेपणे बोललं पाहिजे. पण हे नेहमीच सोपं नसतं. का बरं? याची दोन कारणं आहेत.

पहिलं, झालेल्या गोष्टीबद्दल काही न बोललेलंच बरं असा आपण कदाचित विचार करू.b पहिल्या शतकातल्या युवदीया आणि सुंतुखे या बहिणींच्या बाबतीतही हेच झालं होतं. त्यांच्यात मतभेद झाले होते आणि त्यांनी ते लवकर सोडवले नव्हते. असं दिसतं, की त्यांच्यातला वाद बराच काळ राहिला. कारण दूरवर राहणाऱ्‍या प्रषित पौललासुद्धा याबद्दल समजलं. म्हणूनच त्याने त्यांना त्यांच्यातला वाद मिटवून ‘एक मनाचे’ असण्याचा सल्ला दिला. (फिलिप्पै. ४:२) त्यांचं नातं पुन्हा जोडण्यासाठी त्यांना नम्रता दाखवायची, मनमोकळेपणे बोलायची आणि मोठ्या मनाने एकमेकांना माफ करायची गरज होती.

दुसरं, समोरच्या व्यक्‍तीने त्याची चूक कबूल करावी असं आपल्याला कधीकधी वाटतं. पण लक्षात असून द्या आपला उद्देश कोण चूक कोण बरोबर हे ठरवणं नाही, तर आपली मैत्री पुन्हा घट्ट करणं हा आहे. मोडलेल्या हाडाचा इलाज करणारा डॉक्टर हे सगळं कसं घडलं याबद्दल बारीकसारीक माहिती विचारण्याऐवजी, आपल्याला लवकरात लवकर कसं बरं वाटेल याकडे लक्ष देतो. तसंच, वाद सोडवताना चूक कोणाची होती यावर चर्चा करण्याऐवजी, तुमची मैत्री किती मोलाची आहे आणि ती पुन्हा घट्ट कशी करता येईल याकडे लक्ष द्या.

म्हणून वाद होतात तेव्हा ते सोडवायला लवकरात लवकर पाऊल उचला आणि मैत्रीचं नातं घट्ट करायचा निश्‍चय करा. “सूर्य मावळेपर्यंत तुमचा राग राहू नये” या सल्ल्याचं पालन करा. (इफिस. ४:२६) नातं पुन्हा सुधारण्यासाठी लगेच पाऊल उचलल्यामुळे, शांती आणि एकता टिकवून ठेवता येते.—इफिस. ४:१-३.

a छोटे-मोठे वाद होतात, तेव्हा ते आपसातच सोडवले पाहिजेत आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा केली पाहिजे. (मत्त. ५:२३, २४) पण जर मोठे किंवा गंभीर वाद झाले, तर वाद सोडवायला सगळ्यात आधी मत्तय १८:१५-१६ मध्ये दिलेली पावलं उचलली पाहिजेत. त्यानंतरही वाद सुटला नाही तर मंडळीतल्या वडिलांची मदत घेतली जाऊ शकते.—मत्त. १८:१७.

b भाऊबहिणींनी जर आपलं मन दुखावलं, आणि जर ती खूप मोठी गोष्ट नसेल तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं.—नीति. २६:२०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा