अभ्यासासाठी टीप
सभांमध्ये इतरांना प्रोत्साहन मिळेल अशी उत्तरं द्या
सभांमध्ये उत्तरं देऊन भाऊबहिणींना प्रोत्साहन द्यायची आपल्या सगळ्यांकडे एक संधी आहे. हा खरंच आपल्यासाठी एक मोठा बहुमान आहे. (इब्री १०:२४, २५) मग इतरांना प्रोत्साहन मिळेल अशी उत्तरं आपण कशी तयार करू शकतो?
यहोवाला प्रार्थना करा. यहोवाचा आदर होईल आणि इतरांना प्रोत्साहन मिळेल असं उत्तर तयार करायला त्याच्याकडे मदत मागा.—स्तो. ३५:१८.
फक्त वाचून उत्तर देऊ नका. तुम्ही तुमच्या शब्दांत उत्तर देता, तेव्हा तुमचा विश्वास किती मजबूत आहे हे दिसून येतं आणि त्यामुळे इतरांना प्रोत्साहन मिळतं.
थोडक्यात उत्तर द्या. सहसा छोट्या आणि साध्या उत्तरांमुळे इतरांना खूप प्रोत्साहन मिळतं आणि यामुळे त्यांना उत्तरं द्यायची संधीही मिळते.—नीति. १०:१९.
इतरांची टीका करू नका. तुमच्या उत्तरातून इतरांना सल्ला देऊ नका. तसंच, मंडळीची किंवा एखाद्या भाऊबहिणीची टीकाही करू नका.
तुम्हाला उत्तर द्यायची संधी मिळाली नाही, तरी तुम्ही इतरांना प्रोत्साहन देऊ शकता. तुम्ही इतरांची उत्तरं लक्ष देऊन ऐकू शकता आणि नंतर त्यासाठी त्यांची प्रशंसा करू करू शकता.—नीति. १०:२१.