बायबलमधल्या लोकांकडून शिका
मनाएन—यहोवाच्या सेवेला जीवनात पहिली जागा द्या
मनाएन पहिल्या शतकातल्या अंत्युखियाच्या मंडळीत पुढाकार घेणाऱ्यांपैकी एक होता. तो ‘प्रांताधिकारी हेरोदसोबत शिकला’ होता. (प्रे. कार्यं १३:१) म्हणून आपण असं म्हणू शकतो, की तो सुशिक्षित होता आणि एका श्रीमंत कुटुंबात लहानाचा मोठा झाला होता.
असं असूनही तो ख्रिस्ती बनला आणि त्याने मंडळीला मदत केली. तो त्याच्या शिक्षणाचा आणि मोठ्या लोकांसोबत असलेल्या त्याच्या ओळखीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करू शकला असता. पण त्याने तसं केलं नाही. उलट, त्याने भाऊबहिणींची सेवा केली.
जगात मोठं नाव कमवण्याऐवजी आपण यहोवाच्या सेवेला जास्त महत्त्व दिलं पाहिजे, हे आपल्याला मनाएनकडून शिकायला मिळतं. त्याच्यासारखं आपणही राज्याच्या कामाला जीवनात पहिली जागा दिली पाहिजे. (मत्त. ६:३३) आपल्याला शिक्षणाचं महत्त्वं माहीत असलं, तरी आपण ‘कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची नेहमी खातरी’ केली पाहिजे. तसंच, आपण कोणत्याच गोष्टीला यहोवाच्या सेवेच्या आड न येऊ द्यायचा निश्चय केला पाहिजे.—फिलिप्पै. १:९, १०.