वाचकांसाठी
प्रिय वाचकांनो
टेहळणी बुरूजच्या या अंकात आपण एकमेकांशी संबंधित असलेले पाच अभ्यास लेख पाहणार आहोत. या लेखांमध्ये पुढे दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे:
पहिला, आपल्या मानवी मुलांना आणि मुलींना पापाविरुद्ध लढता यावं म्हणून यहोवाने कोणती व्यवस्था केली आहे?
दुसरा, खरा पश्चात्ताप म्हणजे काय हे यहोवाने कसं शिकवलं आणि पाप करणाऱ्यांना त्याने पश्चात्ताप करायला कशी मदत केली?
तिसरा, गंभीर पाप करून पश्चात्ताप न करणाऱ्या व्यक्तीचं प्रकरण हाताळण्यासाठी करिंथच्या मंडळीला कोणत्या सूचना देण्यात आल्या?
चौथा, मंडळीतल्या वडिलांनी आज गंभीर पापांची प्रकरणं कशी हाताळली पाहिजेत?
पाचवा, पश्चात्ताप न करणाऱ्या पापी व्यक्तीला मंडळीतून काढून टाकल्यावरही मंडळी तिच्याशी प्रेमाने आणि दयेने कशी वागत राहू शकते?