वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp23 क्र. १ पृ. १०-११
  • ३ | बायबलमधल्या उदाहरणांतून मदत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३ | बायबलमधल्या उदाहरणांतून मदत
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • याचा काय अर्थ होतो?
  • यामुळे कशी मदत होऊ शकते?
  • २ | बायबलच्या वचनांमधून सांत्वन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२३
  • ४ | बायबलमधले व्यावहारिक सल्ले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२३
  • १ | प्रार्थना—“आपल्या सगळ्या चिंता त्याच्यावर टाकून द्या”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२३
  • असुरक्षिततेच्या भावनांवर कशी मात कराल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२३
wp23 क्र. १ पृ. १०-११
देवाचा सेवक मोशे खूप दुःखात असताना आकाशाकडे पाहून देवाला प्रार्थना करतोय.

३ | बायबलमधल्या उदाहरणांतून मदत

बायबलमध्ये . . . देवाची विश्‍वासूपणे उपासना करणाऱ्‍या अशा स्त्रीपुरुषांबद्दल सांगितलंय ज्यांच्या “आपल्यासारख्याच भावना” होत्या.​—याकोब ५:१७.

याचा काय अर्थ होतो?

आपल्याला बायबलमध्ये अशा कित्येक स्त्रीपुरुषांचे वृत्तान्त वाचायला मिळतात ज्यांनी वेगवेगळ्या भावना अनुभवल्या. त्यांचे हे अनुभव वाचताना कदाचित आपल्याला जाणवेल की त्यांच्यापैकी एखाद्या व्यक्‍तीच्या भावना आपल्यासारख्याच होत्या.

यामुळे कशी मदत होऊ शकते?

आपल्या भावना इतरांनी समजून घ्याव्यात असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण जेव्हा आपण मानसिक समस्यांचा सामना करत असतो तेव्हा आपल्याला याची जास्तच गरज भासते. बायबलमधल्या व्यक्‍तींचे अनुभव वाचताना आपल्याला कदाचित दिसून येईल की त्यांच्यापैकी काहींना कधी ना कधी आपल्यासारखंच वाटलं होतं. इतरांनीही आपल्यासारखंच दुःख सहन केलंय हे कळल्यामुळे, चिंता आणि त्रासदायक भावनांशी लढताना आपल्याला एकटं पडल्यासारखं वाटणार नाही.

  • बायबलमध्ये आपल्याला अशा लोकांचे शब्द वाचायला मिळतात ज्यांना असाहाय्य आणि निराधार वाटलं होतं. “आणखी सहन होत नाही मला!” असं कधी तुम्हाला वाटलंय का? मोशे, एलीया आणि दावीद या देवाच्या सेवकांनाही एकेकाळी असंच वाटलं होतं.​—गणना ११:१४; १ राजे १९:४; स्तोत्र ५५:४.

  • बायबलमध्ये हन्‍ना नावाच्या एका स्त्रीबद्दल सांगितलंय. तिला मूलबाळ नव्हतं आणि तिची सवत तिला सारखी टोमणे मारायची. यामुळे हन्‍नाला तिचं “दुःख अनावर” झालं होतं.​—१ शमुवेल १:६, १०.

  • बायबलमध्ये ईयोब नावाच्या व्यक्‍तीबद्दलही सांगितलंय. त्याला जसं वाटलं ते कदाचित आपण समजू शकतो. तो देवाची भक्‍ती करणारा होता, तरी एकदा त्याला इतकं नैराश्‍य आलं की तो म्हणाला: “मला माझ्या जीवनाचा वीट आलाय; मला आता आणखी जगायचं नाही.”​—ईयोब ७:१६.

बायबलमधल्या या व्यक्‍तींनी नकारात्मक भावनांवर कशी मात केली हे जाणून घेतल्यामुळे, आपल्याला होत असलेल्या त्रासाचा सामना करायची ताकद आपल्याला मिळेल.

बायबलमधून कशी मदत मिळते? केविन सांगतो . . .

बायपोलर डिसऑर्डरमुळे मला काय त्रास होतो?

केविन आपल्या दोन मित्रांसोबत बसून कॉफी घेतोय.

“मी पन्‍नास वर्षांचा होत आलो तेव्हा मला बायपोलर डिसऑर्डर (मनातल्या भावना किंवा मूड सतत वेगाने बदलत राहणं) आहे असं कळलं. कधीकधी मी खूप खूश असतो. आणि मला असं वाटतं की मी जीवनात कोणत्याही समस्येचा सामना करू शकतो. पण दुसऱ्‍याच क्षणाला मी इतका निराश होतो, की वाटतं जगण्याला काहीच अर्थ नाही.”

बायबलमुळे मला कशी मदत होते?

“बायबलमधला येशूचा शिष्य पेत्र याच्याबद्दल वाचताना मला त्याच्या भावना अगदी आपल्याशा वाटतात. त्याच्या हातून काही चुका झाल्या होत्या आणि त्यामुळे त्याच्या मनात खूप कमीपणाच्या भावना आल्या. पण त्यांवरच लक्ष केंद्रित करण्याऐवजी, ज्यांना त्याची मनापासून काळजी होती अशा चांगल्या मित्रांची पेत्रने मदत घेतली. बायपोलर डिसऑर्डरमुळे जेव्हा एखाद्या दिवशी मला खूप त्रास होत असतो तेव्हा मलासुद्धा दोषीपणाच्या आणि कमीपणाच्या भावना सतावतात. पण माझे काही जवळचे मित्र आहेत ज्यांना मला मदत करायची खरंच इच्छा आहे. म्हणून पेत्रसारखंच मीसुद्धा माझ्या समस्येवर मात करण्यासाठी या मित्रांची मदत घ्यायचा प्रयत्न करतो.

“बायबलमधल्या आणखी एका व्यक्‍तीबद्दल वाचून मला खूप सांत्वन मिळतं. तो म्हणजे दावीद राजा. त्यालासुद्धा बऱ्‍याचदा त्याच्या परिस्थितीमुळे आणि त्याच्या हातून झालेल्या चुकांमुळे खूप निराश वाटायचं. मीही कधीकधी असं काही बोलून जातो किंवा करतो ज्याचा मला नंतर पस्तावा होतो. त्यामुळे दावीदच्या भावना मी चांगल्या प्रकारे समजू शकतो. त्याने स्तोत्र ५१ मध्ये जे काही म्हटलं त्यामुळे मला खूप दिलासा मिळतो. उदाहरणार्थ, तिसऱ्‍या वचनात दावीद म्हणाला: ‘माझ्या चुका मी चांगल्या ओळखून आहे, माझं पाप सतत माझ्या डोळ्यांपुढे असतं.’ मी खूप निराश असतो तेव्हा मलाही अगदी असंच वाटतं. स्वतःबद्दल एकही चांगला विचार माझ्या मनात येत नाही. पण मग दहाव्या वचनात तो जे म्हणाला तसंच मलाही वाटतं. तो म्हणाला: ‘हे देवा, माझ्यात शुद्ध मन उत्पन्‍न कर, माझ्यात एक नवीन, स्थिर मनोवृत्ती निर्माण कर.’ मीसुद्धा स्वतःबद्दल चांगला विचार करता यावा म्हणून देवाला अशीच प्रार्थना करतो. शेवटी सतराव्या वचनात दावीद म्हणतो: ‘हे देवा, दुःखी आणि हताश झालेलं हृदय तू झिडकारणार नाहीस.’ या शब्दांमुळे मला खूप सांत्वन मिळतं आणि हा भरवसा मिळतो की देवाचं माझ्यावर प्रेम आहे.

“बायबलमधल्या उदाहरणांवर आणि आजसुद्धा देव माझी कशी काळजी घेतोय यावर विचार केल्यामुळे भविष्याबद्दलची माझी आशा आणखी पक्की होते. बायबलमध्ये पुढे होणाऱ्‍या ज्या चांगल्या गोष्टींबद्दल सांगितलंय, त्यांवरचा माझा भरवसा आणखी वाढतो आणि माझ्या परिस्थितीशी लढत राहायची प्रेरणा मला मिळते.”

आणखी मदतीसाठी:

jw.org या वेबसाईटवर सावध राहा!  जानेवारी २०१५ यातला “मनोविकार—समज-गैरसमज” हा लेख वाचा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा