वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp23 क्र. १ पृ. ८-९
  • २ | बायबलच्या वचनांमधून सांत्वन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २ | बायबलच्या वचनांमधून सांत्वन
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • याचा काय अर्थ होतो?
  • यामुळे कशी मदत होऊ शकते?
  • किशोरवयात नैराश्‍य—का येतं? त्यावर मात कशी कराल?
    सावध राहा!—२०१७
  • नकारात्मक भावनांवर कशी मात कराल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • मला खिन्‍नता का वाटते?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • ३ | बायबलमधल्या उदाहरणांतून मदत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२३
wp23 क्र. १ पृ. ८-९
एक वयस्क माणूस बायबलमध्ये वाचलेल्या गोष्टींवर विचार करत आहे.

२ | बायबलच्या वचनांमधून सांत्वन

बायबल म्हणतं: “आधीपासूनच लिहून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी, आपल्याला शिक्षण देण्यासाठी लिहून ठेवण्यात आल्या होत्या. या शास्त्रवचनांमुळे आपल्याला आशा मिळते, कारण ती आपल्याला धीर धरायला मदत करतात आणि सांत्वन देतात.”​—रोमकर १५:४.

याचा काय अर्थ होतो?

बायबलमधल्या सांत्वनदायक शब्दांमुळे आपल्याला बळ मिळतं. तसंच, आपली सहनशक्‍ती वाढते आणि यामुळे आपल्याला नकारात्मक विचारांवर मात करणं शक्य होतं. इतकंच काय तर, बायबल आपल्याला एक आशासुद्धा देतं. त्यात सांगितलंय की लवकरच एक अशी वेळ येईल जेव्हा मनाला वेदना देणाऱ्‍या भावना पुन्हा कधीही आपल्याला सतावणार नाहीत.

यामुळे कशी मदत होऊ शकते?

आपल्या प्रत्येकालाच अधूनमधून नकारात्मक भावनांना तोंड द्यावं लागतं. पण डिप्रेशन किंवा अँग्झायटीची समस्या असलेल्यांना अशा त्रासदायक भावनांशी दररोज झगडावं लागतं. अशा वेळी बायबल कशी मदत करू शकतं?

  • बायबलमध्ये बरेच सकारात्मक विचार दिले आहेत. आणि यामुळे आपल्याला नकारात्मक विचार काढून टाकायला मदत होऊ शकते. (फिलिप्पैकर ४:८) यातले शब्द वाचल्यामुळे त्रास देणाऱ्‍या विचारांऐवजी मनाला दिलासा आणि शांती देणाऱ्‍या गोष्टींवर विचार करत राहायला मदत होते.​—स्तोत्र ९४:१८, १९.

  • आपली काहीच किंमत नाही हा विचार मनातून काढून टाकायला बायबल आपल्याला मदत करू शकतं.​—लूक १२:६, ७.

  • बायबलमध्ये असे बरेचसे वृत्तान्त दिले आहेत ज्यांमुळे आपल्याला याची खात्री पटते की आपण एकटे नाही, आणि आपला सृष्टिकर्ता देव आपल्या भावना पूर्णपणे समजू शकतो.​—स्तोत्र ३४:१८; १ योहान ३:१९, २०.

  • बायबल आपल्याला असं वचन देतं, की देव आपल्या त्रासदायक आठवणीही नेहमीसाठी काढून टाकेल. (यशया ६५:१७; प्रकटीकरण २१:४) ही गोष्ट लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला हार न मानता नकारात्मक विचारांशी आणि भावनांशी लढत राहायला मदत होऊ शकते.

बायबलमधून कशी मदत मिळते? जेसिका सांगते . . .

डिप्रेशनमुळे मला काय त्रास होतो?

जेसिकाला झोप लागलीये आणि तिच्या हातात बायबल आहे.

“२५ वर्षांची असताना मी मनाने इतकी खचून गेले, की रोजची कामंसुद्धा मला करता येत नव्हती. नंतर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर मला समजलं की मला डिप्रेशन आलंय. जुन्या आठवणी अचानक माझ्या डोळ्यांपुढे यायच्या आणि त्यामुळे मला खूप त्रास व्हायचा. डॉक्टरांनी मला हे समजायला मदत केली की आधी घडलेल्या धक्कादायक घटनांमुळे माझ्या मनात सतत नकारात्मक विचार येतात आणि यामुळे मला डिप्रेशन आलंय. हे नकारात्मक विचार ओळखण्यासाठी आणि ते बदलण्यासाठी मला औषधांची आणि उपचाराची गरज आहे असंही डॉक्टरांनी सांगितलं.”

बायबलमुळे मला कशी मदत होते?

“जेव्हा माझं डिप्रेशन खूप वाढायचं तेव्हा मला पॅनिक अटॅक (अचानक खूप भीती आणि अस्वस्थ वाटणं) यायचे, खूप जास्त चिंता वाटायची आणि माझी झोप उडून जायची. बऱ्‍याचदा रात्रीच्या वेळी अस्वस्थ करणारे विचार माझ्या मनात घोळत राहायचे. त्यामुळे मी खूप बेचैन व्हायचे. स्तोत्र ९४:१९ मध्ये सांगितलंय, की जेव्हा आपल्याला चिंता सतावतात तेव्हा देव आपल्याला सांत्वन आणि दिलासा देतो. म्हणून माझ्या उशाजवळ मी माझं बायबल आणि एक वही ठेवायचे. त्या वहीत मी प्रोत्साहन देणारी बरीच वचनं लिहून ठेवली होती. जेव्हा मला झोप यायची नाही तेव्हा मी बायबलची काही वचनं वाचायचे. देवाचे विचार वाचल्यावर मला अगदी शांत वाटायचं.

“देवाबद्दल आपल्याला जे माहीत आहे त्याच्या विरोधात असणारे सगळे विचार मनातून पूर्णपणे काढून टाकायचं प्रोत्साहन, बायबल आपल्याला देतं. आधी मला नेहमी असं वाटायचं की माझी काहीच किंमत नाही, माझ्यावर कोणीच प्रेम करू शकत नाही, मी काहीच कामाची नाही. पण मला समजलं की असा विचार करणं खरंतर बायबलच्या विरोधात आहे. कारण बायबल असं सांगतं, की देव एक प्रेमळ आणि दयाळू पिता आहे आणि त्याला आपल्या प्रत्येकाची काळजी आहे. म्हणून मग नकारात्मक विचारांना स्वत:वर नियंत्रण करू देण्याऐवजी, मी हळूहळू त्यांवर नियंत्रण करायला शिकले. देव माझ्याबद्दल जसा विचार करतो तसाच विचार करायला मी शिकले. आणि यामुळे स्वत:बद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन बदलायला मला मदत झाली.

“मी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे जेव्हा सगळ्या दु:ख देणाऱ्‍या आठवणी आणि नकारात्मक विचार कायमचे नाहीसे होतील. तेव्हा कोणालाही कधीच मानसिक विकार होणार नाहीत. हे माहीत असल्यामुळे आज मला माझ्या परिस्थितीशी लढायला मदत होते. शिवाय मला एक सुंदर आशा मिळालीये की भविष्यात पुन्हा कधीही मला डिप्रेशनशी लढावं लागणार नाही.”

आणखी मदतीसाठी:

jw.org या वेबसाईटवर सावध राहा!  २०१७ क्र. १ यातला “किशोरवयात नैराश्‍य—का येतं? त्यावर मात कशी कराल?” हा लेख वाचा.

jw.org या वेबसाईटवर स्तोत्रं या पुस्तकाची ऑडिओ रेकॉर्डिंग ऐका.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा