वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp21 क्र. २ पृ. १०-१२
  • नवीन जगात राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नवीन जगात राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अंतातून वाचण्यासाठी देवाला ओळखा
  • बायबलचं रोज वाचन करा
  • देवाकडे मदत मागा
  • देवाने आपल्यासाठी काय केलं आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
  • येशूला यातना सहन करून मरण का सोसावं लागलं?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
  • सार्वकालिक जीवन शक्य आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • तुम्ही सर्वकाळ पृथ्वीवर राहू शकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
wp21 क्र. २ पृ. १०-१२

नवीन जगात राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

आधीच्या काही लेखांमध्ये आपण पाहिलं, की लवकरच देव दुष्ट लोकांचा आणि या जगातल्या समस्यांचा अंत करणार आहे. या गोष्टी नक्की घडतील असं आपण म्हणू शकतो. कारण देवाने बायबलमध्ये असं वचन दिलं आहे:

‘जग नाहीसं होण्याच्या मार्गावर आहे.’—१ योहान २:१७.

पण या जगाचा अंत होईल तेव्हा काही लोक वाचतीलसुद्धा. कारण याच वचनात पुढे असंही म्हटलं आहे:

“जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तो सर्वकाळ टिकून राहतो.”

म्हणून, जर आपल्याला जगाच्या अंतातून वाचायचं असेल, तर आपण देवाच्या इच्छेप्रमाणे वागलं पाहिजे. पण देवाची इच्छा काय आहे? ती माहीत करून घेण्यासाठी आपण आधी त्याला ओळखलं पाहिजे.

अंतातून वाचण्यासाठी देवाला ओळखा

चित्रं: १. हॉस्पिटलमध्ये एक नर्स दमून खाली बसली आहे. ती पार गळून गेली आहे. २. ती कॅन्टीनमध्ये चहा घेत असताना, तिच्यासोबत काम करणारी एक नर्स आनंदाने मासिक वाचत असल्याचं तिला दिसतं. ३. तिच्यासोबत काम करणारी ती नर्स तिला बायबलमधून एकदोन ओळी वाचून दाखवते आणि तिला jw.org संपर्क कार्ड देते.

येशूने म्हटलं: ‘सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी त्यांनी एकाच खऱ्‍या देवाला ओळखणं गरजेचं आहे.’ (योहान १७:३) तर मग, येणाऱ्‍या अंतातून वाचण्यासाठी आणि कायम या पृथ्वीवर राहण्यासाठी आपण देवाला ओळखलं पाहिजे. आज बरेच लोक मानतात, की देव आहे आणि त्याच्याबद्दल त्यांना थोडीफार माहितीही आहे. पण देवाला ओळखण्यासाठी इतकंच पुरेसं नाही. त्यासाठी आपण त्याच्याशी मैत्री केली पाहिजे. एखाद्यासोबत आपली मैत्री वाढवण्यासाठी आपल्याला त्याच्यासोबत वेळ घालवावा लागतो. त्याचप्रमाणे देवासोबत आपली मैत्री घट्ट करण्यासाठी आपल्यालाही वेळ देणं गरजेचं आहे. म्हणून देवाला चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी आता आपण बायबलमधून काही महत्त्वाच्या गोष्टी पाहू.

बायबलमध्ये सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी

घरी आल्यावर ती नर्स jw.org वेबसाईट उघडून पाहते.

आपण आनंदाने या पृथ्वीवर राहावं अशी देवाची इच्छा आहे.

सुरुवातीला देवाने पहिल्या मानवी जोडप्याला, म्हणजे आदाम आणि हव्वाला बनवलं आणि त्यांना राहण्यासाठी एक सुंदर बाग दिली. जीवनाचा आनंद घेण्यासाठी त्या बागेत सगळं काही होतं. त्यांना कशाचीही कमी नव्हती, कसलंही दुःख नव्हतं आणि ते कधीही आजारी पडणार नव्हते. तसंच, देवाने त्यांना सांगितलं होतं, की जर त्यांनी त्याची आज्ञा पाळली तर ते कधीही मरणार नाहीत, ते कायम जगू शकतील. पण दुःखाची गोष्ट म्हणजे त्यांनी जाणूनबुजून देवाची आज्ञा मोडली.

आपल्याला दुःख का सहन करावं लागतं?

पहिल्या मानवाने, म्हणजे आदामने देवाची आज्ञा मोडली. त्यामुळे त्याने कायम जगण्याची संधी गमावली. आणि याचा परिणाम त्याच्यापासून आलेल्या संपूर्ण मानवजातीवर झाला. म्हणून त्यांनीही कायम जगण्याची संधी गमावली. याबद्दल बायबल म्हणतं: “एका माणसाद्वारे पाप जगात आलं आणि पापाद्वारे मरण आलं आणि अशा रितीने सर्व माणसांमध्ये मरण पसरलं.” (रोमकर ५:१२) हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहू या. ज्याप्रमाणे आईवडिलांमुळे मुलांना काही वांशिक आजार होतात, त्याचप्रमाणे आपल्या बाबतीतही झालं. आदाम आणि हव्वाने केलेल्या चुकीमुळे ते म्हातारे झाले आणि मेले. आणि आपण त्यांची मुलं असल्यामुळे आपल्यालासुद्धा दुःख भोगावं लागतं, आपण म्हातारे होतो आणि मरतो.

देवाने आपल्यासाठी काय केलं आहे?

बायबलं म्हणतं: “देवाने जगावर इतकं प्रेम केलं, की त्याने आपला एकुलता एक मुलगा दिला. कारण त्याची अशी इच्छा आहे, की जो कोणी त्याच्या मुलावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.” (योहान ३:१६) आदामपासून मिळालेल्या दुःखातून आपल्याला सोडवण्यासाठी देवाने येशूला पृथ्वीवर पाठवलं. आणि आपल्यासाठी येशूने स्वतःचं जीवन बलिदान केलं. याबद्दल भारतातले ८६ वर्षांचे प्रभाकर म्हणतात: “यहोवानेa माझ्यासाठी स्वतःचा मुलगा दिला. यावरून मला कळतं, की त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे. त्याच्या या प्रेमामुळेच मला पृथ्वीवर कायम जगण्याची आशा मिळाली.”

आपण देवाचे आभारी आहोत हे आपण कसं दाखवू शकतो?

बायबल म्हणतं, की देवाने आपल्यासाठी जे काही केलं आहे, त्याबद्दल आपल्याला कदर असेल तर ‘आपण त्याच्या आज्ञांचं पालन करू.’ (१ योहान २:३) यहोवा देवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे. म्हणून सध्याच्या काळात आपण आनंदी कसं राहू शकतो हे तो आपल्याला सांगतो. (यशया ४८:१७, १८) आपण आपलं आयुष्य त्रासात घालवावं असं त्याला वाटत नाही. म्हणून तो आपल्याला वचन देतो, की आपण जर त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागलो, तर आत्ताही आपण खूश राहू शकतो आणि भविष्यातही कायम जीवनाचा आनंद घेऊ शकतो.

बायबलचं रोज वाचन करा

जेवणाच्या सुट्टीत ती नर्स बाहेर बसून बायबल वाचते आणि वर पाहून विचार करते.

मदतीसाठी आपण देवाला प्रार्थना केली आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागलो तर आपण या जगाच्या अंतापासून वाचू शकतो

जगण्यासाठी आपल्याला रोज जेवावं लागतं. पण येशूने म्हटलं: “माणसाने फक्‍त भाकरीनेच नाही, तर यहोवाच्या तोंडातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगलं पाहिजे.”—मत्तय ४:४.

यहोवा देवाची वचनं, म्हणजेच त्याचे शब्द आज आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतात. त्यामुळे बायबलचा अभ्यास केल्यामुळे तुम्हाला अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजतील. जसं की, देवाने मानवांसाठी आधी काय केलं, आता तो काय करत आहे आणि भविष्यात तो काय करणार आहे.

देवाकडे मदत मागा

देवाच्या आज्ञांचं पालन करायची तुमची मनापासून इच्छा असेल. पण त्याला आवडत नाही अशी एखादी गोष्ट सोडायला तुम्हाला कठीण जात असेल तर काय? तर देवाला चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. त्यामुळे ती सोडून द्यायला तुम्हाला नक्कीच खूप मदत होईल.

समीरासोबत काय झालं त्याकडे लक्ष द्या. ती एक अनैतिक जीवन जगत होती. पण ती बायबलचा अभ्यास करू लागली तेव्हा तिला समजलं, की आपण “अनैतिक लैंगिक कृत्यांपासून” दूर राहिलं पाहिजे अशी देवाची आज्ञा आहे. (१ करिंथकर ६:१८) म्हणून तिने देवाला प्रार्थना केली, की तिला असं जीवन सोडायचं आहे आणि देवाच्या मदतीमुळे ती ते सोडूही शकली. पण आजसुद्धा तिला त्या इच्छांशी लढावं लागतं. ती म्हणते: “माझ्या मनात चुकीचे विचार येतात तेव्हा मी यहोवाला प्रार्थना करते आणि मला नेमकं कसं वाटतंय हे त्याला सांगते. कारण मला माहितीए, की त्याच्या मदतीशिवाय मी या चुकीच्या इच्छांशी लढू शकत नाही. प्रार्थना केल्यामुळे मी यहोवा देवाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखू शकले.” समीरासारखे लाखो लोक आज देवाला ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच, तोसुद्धा त्यांना आपल्या जीवनात बदल करायला आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागायला मदत करतो.—फिलिप्पैकर ४:१३.

जितकं जास्त तुम्ही देवाला ओळखाल, तितकं जास्त तोही तुम्हाला ओळखेल. आणि तुमच्यातली मैत्री घट्ट होईल. (गलतीकर ४:९; स्तोत्र २५:१४) यामुळे तुम्हाला नवीन जगात राहायला मिळेल. पण ते नवीन जग नेमकं कसं असेल? याबद्दल आपण पुढच्या लेखात पाहू या.

a बायबलमध्ये देवाचं नाव यहोवा असं दिलं आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा