वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp21 क्र. १ पृ. १४-१५
  • प्रार्थना केल्यामुळे तुम्हाला कशी मदत होऊ शकते?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रार्थना केल्यामुळे तुम्हाला कशी मदत होऊ शकते?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • प्रार्थना केल्यानं तुम्हाला काय फायदा होतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
  • प्रार्थनेद्वारे देवाच्या जवळ या
    बायबल नेमके काय शिकवते?
  • देवाला प्रार्थना करण्याचा बहुमान
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • देवाशी नातं मजबूत करण्यासाठी प्रार्थना करा
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
wp21 क्र. १ पृ. १४-१५

प्रार्थना केल्यामुळे तुम्हाला कशी मदत होऊ शकते?

पॅमेला नावाच्या एका स्त्रीला एक गंभीर आजार झाला होता आणि त्यासाठी ती उपचार घेत होती. पण उपचारासोबतच ती देवाला प्रार्थनाही करत होती. होणारा त्रास सहन करायचं बळ त्याने द्यावं अशी विनंती ती करत होती. मग प्रार्थना केल्यामुळे तिला काही फायदा झाला का?

पॅमेला म्हणते, “कॅन्सरवर उपचार घेताना मला बऱ्‍याचदा खूप भीती वाटायची. पण यहोवा देवाला प्रार्थना केल्यावर मला खूप शांत वाटायचं. आणि त्या परिस्थितीचा सामना करायला मला बळ मिळायचं. मला अजूनही खूप त्रास होतो, नाही असं नाही. पण प्रार्थनेने मला आयुष्याकडे एका वेगळ्या पद्धतीने पाहायला शिकवलं. मी कशी आहे, असं लोक मला विचारतात, तेव्हा मी त्यांना म्हणते, ‘मला बरं तर वाटत नाही, पण मी आनंदी आहे.’”

पण एखादा गंभीर आजार झाल्यावरच किंवा एखादं मोठं संकट कोसळल्यावरच आपण प्रार्थना केली पाहिजे असं नाही. आपल्या सगळ्यांनाच, लहान-मोठ्या अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, आणि त्या वेळी आपल्याला मदतीची खूप गरज असते. मग प्रार्थना आपल्याला मदत करू शकते का?

बायबलमध्ये म्हटलं आहे, “तुझं सगळं ओझं यहोवावर टाकून दे, म्हणजे तो तुला सांभाळेल. नीतिमान माणसाला तो कधीच पडू देणार नाही.” (स्तोत्र ५५:२२) खरंच, किती दिलासा देणारे शब्द आहेत हे! आपण जर योग्य प्रकारे देवाला प्रार्थना केली, तर समस्यांचा सामना करण्यासाठी लागणारी मदत तो आपल्याला नक्कीच देईल.—“प्रार्थनेमुळे मिळणारी मदत,” ही चौकट पाहा.

प्रार्थनेमुळे मिळणारी मदत

मनाची शांती

नोकरी गेल्यामुळे उदास झालेला माणूस आता खूप आनंदी आहे.

बायबल म्हणतं: “आपल्या विनंत्या देवाला कळवा. म्हणजे, सर्व समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती ख्रिस्त येशूद्वारे तुमच्या मनाचं आणि बुद्धीचं रक्षण करेल.” (फिलिप्पैकर ४:६, ७) तुम्ही तुमच्या सगळ्या चिंता देवाला सांगितल्या, तर तो तुम्हाला तुमचं मन शांत ठेवायला आणि योग्य पावलं उचलायला मदत करेल.

बुद्धी

प्रार्थना-पुस्तकातून प्रार्थना म्हणणारी स्त्री आता आपल्या घरात बायबल वाचत आहे.

बायबल म्हणतं: “तुमच्यापैकी कोणाला बुद्धीची गरज असली, तर त्याने ती देवाजवळ मागत राहावी म्हणजे त्याला ती दिली जाईल. कारण देव कोणालाही कमी न लेखता सगळ्यांना उदारपणे बुद्धी देतो.” (याकोब १:५) तणावात असताना आपण सहसा नीट विचार करू शकत नाही. त्यामुळे बऱ्‍याचदा आपण चुकीचे निर्णय घेतो. पण योग्य निर्णय घेण्यासाठी देव आपल्याला बुद्धी देऊ शकतो. आपण बुद्धीसाठी देवाकडे प्रार्थना केली, तर तो बायबलमधली तत्त्वं आपल्या लक्षात आणून देईल आणि त्यामुळे आपल्याला योग्य निर्णय घेता येतील.

बळ आणि दिलासा

हॉस्पिटलमध्ये असलेलं जोडपं आता बागेत चालत आहे. पती आपल्या पत्नीला काठी धरून चालायला मदत करत आहे.

बायबल म्हणतं: “जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सगळ्या गोष्टी करण्याची मला शक्‍ती मिळते.” (फिलिप्पैकर ४:१३) यहोवा सर्वशक्‍तिमान देव असल्यामुळे तो तुम्हाला समस्यांचा धीराने सामना करायचं बळ देईल. (यशया ४०:२९) यहोवाबद्दल बायबल असंही म्हणतं, की तो “सगळ्या प्रकारच्या सांत्वनाचा देव आहे.” त्यामुळे “तो आपल्या सगळ्या संकटांमध्ये आपलं सांत्वन” करू शकतो.—२ करिंथकर १:३, ४.

तुम्ही मदतीसाठी देवाला हाक माराल का?

यहोवा कोणालाही प्रार्थना करायची बळजबरी करत नाही; तर तो आपल्याला प्रार्थना करायचं प्रोत्साहन देतो. (यिर्मया २९:११, १२) पण देवाने तुमची प्रार्थना ऐकली नाही असं कधी तुम्हाला वाटलं असेल, तर निराश होऊ नका. प्रार्थना करायचं सोडू नका. आता आईवडिलांचाच विचार करा. मुलं एखाद्या वस्तूसाठी त्यांच्याकडे हट्ट करतात, तेव्हा आईवडील ती वस्तू त्यांना देतातच असं नाही किंवा प्रत्येक वेळी लगेच देतात असंही नाही. कारण कदाचित, मुलांनी जे मागितलं आहे त्यापेक्षा चांगलं काहीतरी द्यायचं त्यांच्या मनात असतं. पण एक गोष्ट मात्र नक्की. ती म्हणजे, आईवडिलांचं आपल्या मुलांवर खूप प्रेम असतं आणि ते नेहमी त्यांच्या भल्याचाच विचार करतात.

यहोवा देवासारखा प्रेमळ पिता कोणीही नाही. आपल्यावर असलेल्या प्रेमामुळेच तो आपल्याला मदत करायला नेहमी तयार असतो. आपण आतापर्यंत बायबलमधून प्रार्थनेबद्दल बऱ्‍याच गोष्टी पाहिल्या. त्यांचा आपण विचार केला आणि त्याप्रमाणे प्रार्थना केली, तर देव नक्की आपली प्रार्थना ऐकेल, आणि आपण कल्पनासुद्धा करणार नाही इतक्या चांगल्या पद्धतीने तो तिचं उत्तर देईल.—स्तोत्र ३४:१५; मत्तय ७:७-११.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा