२७ जुलै–२ ऑगस्ट
यिर्मया २०-२१
गीत ७३ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. तो एक धाडसी प्रचारक होता
(१० मि.)
यहोवाचा न्यायाचा संदेश सांगितल्यामुळे यिर्मयाला छळाचा सामना करावा लागला (यिर्म २०:२, ८)
तो खूप खचून गेला आणि म्हणून त्याने संदेश न सांगायचं ठरवलं (यिर्म २०:९क)
यहोवाच्या वचनामुळे आणि त्याच्या मदतीमुळे तो धैर्याने लोकांना संदेश सांगत राहिला (यिर्म २०:९ख, ११; टेहळणी बुरूज११ ३/१५ ३० ¶९; टेहळणी बुरूज१० २/१५ ७ ¶८-९)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
यिर्म २०:१२—हे वचन आपल्याला काय करायची प्रेरणा देतं? (टेहळणी बुरूज१३ ३/१५ १० ¶११)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) यिर्म २०:७-१८ (शिकवणे अभ्यास २)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. तुम्ही यहोवाचे साक्षीदार आहात ही गोष्ट समोरच्याला बोलता-बोलता सहजपणे सांगा. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ४)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. शिष्य बनवा माहितीपत्रकातल्या ‘आणखी माहिती—क’ यात दिलेल्या एखाद्या बायबल सत्याबद्दल सांगा. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ३)
६. विश्वासाबद्दल समजावून सांगणं
(४ मि.) प्रात्यक्षिक. एका मुलाने उत्क्रांती की निर्मिती?, लेख ४१ मधून शाळेच्या प्रोजेक्टसाठी काही माहिती काढली आहे. ती माहिती वर्गात सादर करण्याआधी तो आपल्या आई किंवा वडिलांसोबत सराव करतो. (शिकवणे अभ्यास १३)
गीत ५७
७. बदल करायला तयार असा—इतरांचा विचार करा
(१५ मि.) चर्चा.
प्रचाराला जाण्याआधी आपल्या क्षेत्रात लोकांना ज्या गोष्टींची जास्त काळजी आहे त्या विषयावर आपण बोलायचं ठरवलं असेल. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ३) पण घरमालकाला एका वेगळ्याच विषयावर बोलायचंय हे तुम्हाला कळलं तर तुम्ही काय कराल? येशूने एका अंध व्यक्तीला आनंदाचा संदेश सांगण्याआधी काय केलं याचा विचार करा. त्याने त्याच्याबद्दल काळजी असल्याचं दाखवलं. (योह ९:१, ६, ७, ३५-३८) मग यावरून आपण काय शिकू शकतो? जर आपण एखाद्याची काळजी असल्याचं दाखवलं तर तो आपला संदेश चांगल्याप्रकारे ऐकून घेऊ शकतो. म्हणून घरोघरचं साक्षकार्य करताना समोरच्याचा विचार करा आणि त्याच्या आवडीच्या विषयावर बोला.
१ करिंथकर ९:२०-२३ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:
पौलने इतरांची काळजी असल्याचं कसं दाखवलं?
पौल सर्व लोकांसाठी सर्वकाही व्हायला का तयार होता?
“आनंदाचा संदेश सांगायला उत्सुक राहा”—योग्य साधनं घेऊन तयार राहा—निवडक भाग हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:
कोणत्या विषयावर बोलायचं हे भावाने आधीच ठरवलं होतं, मग तरीही त्याने विषय का बदलला?
इतरांबद्दल काळजी असल्याचं दाखवणं का गरजेचंय?
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) धैर्य भाग १ ची प्रस्तावना, समयरेषा, आणि अध्या. १