२०-२६ जुलै
यिर्मया १८-१९
गीत ४४ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. देवासोबत पुन्हा नातं जोडणं शक्य आहे
(१० मि.)
यहूदाच्या लोकांनी त्यांची वाईट कामं सोडून द्यावीत अशी यहोवाने त्यांना विनंती केली (यिर्म १८:११; टेहळणी बुरूज२५.०४ ४ ¶१०)
“पण ते म्हणाले: असं करण्यात काय अर्थ आहे?” (यिर्म १८:१२)
पापाविरुद्धच्या लढाईत आपण जिंकू शकतो (यिर्म १८:७, ८; टेहळणी बुरूज२५.०८ २३ ¶११)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
यिर्म १८:६; १९:१०, ११—यहोवा महान कुंभार असल्यामुळे तो काय करू शकतो? (टेहळणी बुरूज१६.०६ ६-७ ¶२-३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) यिर्म १९:१-११ (शिकवणे अभ्यास ५)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. बायबल अभ्यासासाठी विचारा आणि तो कसा केला जातो ते दाखवा. (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ३)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. आधीच्या भेटीत तुम्ही घरमालकाला दिलेल्या पत्रिकेवर चर्चा करा. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ३)
६. विश्वासाबद्दल समजावून सांगणं
(४ मि.) भाषण. बायबलमधून प्रश्नांची उत्तरं, लेख ४४—विषय: इच्छास्वातंत्र्याबद्दल बायबल काय म्हणतं? (शिकवणे अभ्यास २०)
गीत ३८
७. ज्यांनी यहोवाची सेवा करायचं सोडलंय ते काय करू शकतात?
(१५ मि.) चर्चा.
ज्यांनी यहोवाला सोडून दिलंय त्यांच्यावरही यहोवा प्रेम करतो. पण त्याच्याकडे परत कसं यावं हे बऱ्याच जणांना कळत नाही किंवा त्यांच्यात कमीपणाची भावना असते. पण यहोवाने आधीच्या काळात त्याच्या लोकांना जशी मदत केली, तशी आजही त्याच्याकडे परत येणाऱ्यांना तो करू शकतो.
ज्यांनी यहोवाची सेवा करायचं सोडून दिलंय, त्यांना असं वाटू शकतं, की ते पूर्वी यहोवाच्या सेवेत करत असलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना लगेच कराव्या लागतील. पण त्या सगळ्या गोष्टी पुन्हा सुरू करायला त्यांना थोडा वेळ द्यावा लागेल. मग ते हळूहळू यहोवाच्या सेवेत पूर्वीसारख्या सगळ्या गोष्टी कशा करू शकतात?
यहोवाकडे मदतीसाठी प्रार्थना करा. (१पेत्र ५:७) तो तुम्हाला बळ द्यायचं वचन देतो.—यश ४०:२८, २९
दररोज निदान बायबलची काही वचनं वाचण्याचा प्रयत्न करा. तुम्ही jw.org वरून काही वचनं वाचू शकता किंवा ऐकू शकता. जसं जेवल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं, तसंच यहोवाबद्दल शिकल्यामुळे त्याच्यासोबतचं आपलं नातं टिकून राहतं.—स्तो १:२, ३
लवकरात लवकर सभेला जायला सुरूवात करा. कारण सभांमधून यहोवा आपल्याला प्रोत्साहन देतो आणि आपल्याला मदत पुरवतो.—इब्री १०:२४, २५
मी यहोवाकडे परत आले हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:
या व्हिडिओमधून तुम्हाला कोणता धडा शिकायला मिळाला?
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) धैर्य “नियमन मंडळाकडून पत्र” आणि प्रस्तावना