वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb26 जुलै पृ. ४-५
  • १३-१९ जुलै

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १३-१९ जुलै
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
mwb26 जुलै पृ. ४-५

१३-१९ जुलै

यिर्मया १६-१७

गीत ३४ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. तुम्ही योग्य व्यक्‍तीवर भरवसा ठेवताय का?

(१० मि.)

जे लोक माणसांवर भरवसा ठेवतात ते यहोवाला दुःखी करतात (यश ३०:१, २; यिर्म १७:५)

त्यांच्यावर बऱ्‍याच समस्या येतात (यिर्म १७:६)

यहोवावर भरवसा ठेवणाऱ्‍यांची भरभराट होईल (यिर्म १७:७, ८; टेहळणी बुरूज०९ ३/१ १७ ¶२)

कोलाज: १. ओसाड रानात एकही पान नसलेलं आणि वाळलेलं झाड आहे. २. नदीकाठी एक हिरवंगार झाड आहे.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • यिर्म १७:७—यहोवाने नेमलेल्या लोकांवर भरवसा ठेवून आपण कसं दाखवतो की आपला यहोवावर भरवसा आहे? (टेहळणी बुरूज२२.०२ ४ ¶७-८)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) यिर्म १७:५-१८ (शिकवणे अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. शिकवण्याच्या साधनांमधल्या एखाद्या व्हिडिओबद्दल सांगा. (शिष्य बनवा धडा ५ मुद्दा ५)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. बायबल अभ्यास सुरू करायची इच्छा आहे का ते विचारा. (शिष्य बनवा धडा ७ मुद्दा ४)

६. शिष्य बनवण्यासाठी

(५ मि.) कायम आनंद घ्या! धडा १९ थोडक्यात, उजळणी आणि ध्येय (शिष्य बनवा धडा ११ मुद्दा ३)

ख्रिस्ती जीवन

गीत ५४

७. तरुणांनो, बायबलच्या सल्ल्यांवर भरवसा ठेवा

(१५ मि.) चर्चा.

जे तरुण असतात आणि ज्यांच्याकडे कमी अनुभव असतो त्यांच्यावर हल्ला करायला सैतान आतुर असतो. (उत्प ३:१) तुम्हाला शाळेत किंवा कॉलेजमध्ये कदाचित दररोज दबावांचा सामना करावा लागत असेल. पण यहोवावर भरवसा ठेवल्याने आणि बायबलचा सल्ला पाळल्याने तुम्हाला त्या दबावांचा सामना करायला मदत होऊ शकते. पुढे दिलेल्या परिस्थितींचा विचार करा आणि बायबलच्या कोणत्या उदाहरणांमुळे किंवा वचनांमुळे तुम्हाला मदत होऊ शकते ते लिहा.

  • तुम्ही वेगळे असल्यामुळे वर्गातली मुलं तुमची थट्टा करतात

  • मंडळीत मैत्री करण्यासाठी तुमच्या वयाचं कोणीच नाही

  • वर्गातल्या एखाद्याला तुमचा फोन नंबर किंवा सोशल मिडिया आईडी पाहिजे

  • शिक्षण संपल्यावर तुम्ही पूर्ण वेळची सेवा करू नये असं तुमचे शिक्षक तुम्हाला सांगतात

बायबल तुम्हाला खरंच मदत करू शकतं का? हा बोर्डवरची कार्टून्समधला व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  • या व्हिडिओतून तुम्हाला कोणता धडा शिकायला मिळाला?

हे करून पाहा: बायबल वाचनाचं ध्येय ठेवा! दररोज एक अध्याय वाचा आणि त्यातल्या एखाद्या मुद्द्‌याबद्दल आणखी संशोधन करा. आणि हे नियमितपणे करत राहा. यामुळे तुम्हाला येशूसारखा विचार करता येईल. तसंच, एखाद्या परिस्थितीत पटकन निर्णय घ्यावा लागला तरी तुम्हाला तसं करणं शक्य होईल.—१कर २:१६.

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ १०२-१०३

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत २२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा