६-१२ जुलै
यिर्मया १३-१५
गीत १२३ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
यिर्मया यहोवाने दिलेल्या सूचनांचा विचार करतोय
१. नेहमी यहोवाच्या आज्ञा पाळा
(१० मि.)
यिर्मयाला यहोवाच्या सूचना पूर्णपणे समजल्या नसल्या, तरी त्या पाळण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली (यिर्म १३:१-७; जेरमाया अध्या. ४ ¶१७-१८-mwbr)
यिर्मयाला नंतर यहोवाच्या सूचनांमागचं कारण कळलं (यिर्म १३:८-११; जेरमाया अध्या. ४ ¶१९-mwbr)
आपल्यालासुद्धा आज सूचनांमागचं कारण समजलं नाही, तरी आपण यिर्मयासारखं त्या पाळल्या पाहिजेत (टेहळणी बुरूज२२.१२ २१ ¶१६; टेहळणी बुरूज०८ ६/१५ १९ ¶७)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
यिर्म १५:१६, १७—यिर्मयासाखं आपणही निराशेवर कशी मात करू शकतो? (टेहळणी बुरूज०७ ४/१ १० ¶३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) यिर्म १३:१-१४ (शिकवणे अभ्यास २)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. पत्रिकेचा वापर करून संभाषण सुरू करा. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ५)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. मागच्या भेटीत तुम्ही ज्या विषयावर बोललात त्याबद्दलचा एखादा लेख jw.org वरून दाखवा. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ४)
६. भाषण
(५ मि.) शिष्य बनवा ‘आणखी माहिती—क’ मुद्दा १८—विषय: आज ज्या घडामोडी घडत आहेत त्यांबद्दल येशूने आधीच सांगितलं होतं. (शिकवणे अभ्यास ७)
गीत ४९
७. “बलिदानापेक्षा आज्ञा पाळणं चांगलं”
(१५ मि.) चर्चा.
शमुवेलने शौल राजाला यहोवाच्या काही सूचनांबद्दल स्पष्टपणे सांगितलं होतं. पण त्याने त्या पाळल्या नाहीत म्हणून शमुवेल त्याला म्हणाला, “बलिदानापेक्षा आज्ञा पाळणं चांगलं.”
१ शमुवेल १५:३, ७-९, २२, २३ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:
शौलने यहोवाची आज्ञा कशी मोडली आणि त्याने असं का केलं असावं?
यहोवाच्या आज्ञा पाळणं बलिदानांपेक्षा चांगलं का आहे?
बंड करणं हे शकुन पाहण्याइतकं गंभीर पाप का आहे?
लूक १६:१० वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:
आपण छोट्याछोट्या गोष्टींच्या बाबतीतही आज्ञाधारक का असलं पाहिजे?
लोक सहसा कोणत्या गोष्टींना क्षुल्लक लेखतात?
यहोवाचे मित्र बना—देव दिसत नसला तरी आपण त्याचं का ऐकलं पाहिजे? हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:
या व्हिडिओतून तुम्हाला कोणते धडे शिकायला मिळाले?
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ १००-१०१