वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb26 मे पृ. १२-१३
  • १५-२१ जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १५-२१ जून
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
mwb26 मे पृ. १२-१३

१५-२१ जून

यिर्मया ७-८

गीत १५२ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. त्यांनी यहोवाच्या मंदिराचा अनादर केला

(१० मि.)

बरेचसे यहुदी दुष्ट कामं करत होते. पण त्यांना वाटत होतं, की यहोवाचं मंदिर तिथे असल्यामुळे त्यांचं रक्षण होईल (यिर्म ७:४, ८-१०; जेरमाया २१ ¶१२-mwbr)

त्यांच्या कामांतून ते यहोवाच्या नावाचा अनादर करत होते (यिर्म ७:११; इन्साइट “यहोवा” ¶७८-mwbr)

शिलोचं उदाहरण वापरून यहोवाने दाखवून दिलं की मंदिराचं काय होईल (यिर्म ७:१२-१४; टेहळणी बुरूज१५ ९/१५ २७ ¶१७)


यावर विचार करा: ‘माझ्या वागण्याबोलण्यातून नेहमीच यहोवाचा आदर होतो का?’

कोलाज: १. एक भाऊ त्याच्या कामावरच्या सोबत्यावर ओरडतोय. २. तोच भाऊ मंडळीत एका भावाला प्रेमाने भेटतोय.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • यिर्म ८:२२—कोणत्या अर्थाने ‘गिलादमध्ये मलम किंवा बाल्सम नव्हतं’? (जेरमाया १३५ ¶१४-mwbr)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) यिर्म ८:४-१३ (शिकवणे अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा ५ मुद्दा ५)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. शिष्य बनवा माहितीपत्रकातल्या ‘आणखी माहिती—क’ यात दिलेल्या एखाद्या बायबल सत्याबद्दल सांगा. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ३)

६. शिष्य बनवण्यासाठी

(५ मि.) कायम आनंद घ्या! धडा १९ मुद्दा ६ (शिकवणे अभ्यास १९)

ख्रिस्ती जीवन

गीत ९१

७. आपल्या राज्य सभागृहांबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो?

(५ मि.) चर्चा.

“यहोवाचे मित्र बना—यहोवाचं घर स्वच्छ ठेवू या!” या व्हिडिओतलं एक दृश्‍य. सभागृहात केतन खुर्ची पुसतोय.

यहोवाचे मित्र बना—यहोवाचं घर स्वच्छ ठेवू या! हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  • आपण राज्य सभागृहाची काळजी कशी घेऊ शकतो आणि का?

१ तीमथ्य २:९, १० वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:

  • ख्रिस्ती सभांना हजर राहताना भाऊबहीण आणखी कोणत्या मार्गाने आदर दाखवू शकतात?

८. तुमच्या दानाचा वापर—राज्य सभागृहांची देखरेख करणं

(१० मि.) लेखावर आधारित चर्चा. तुमच्या स्थानिक राज्य सभागृहाची देखरेख करताना कोणत्या गोष्टींसाठी खर्च केला जातो ते सांगा.—तुमच्या दानाचा वापर लेख ३०.

  • राज्य सभागृहाला चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी खर्च कसा केला जातो आणि हे काम इतकं महत्त्वाचं का आहे?

  • दुरुस्तीच्या आणि देखरेखीच्या मोठ्या प्रकल्पांच्या व्यवस्थेबद्दल आणि त्यांसाठी लागणारा खर्च भागवण्याबद्दल तुम्हाला कोणती गोष्ट आवडते?

  • तुम्ही कशी मदत करू शकता?


दान करण्याच्या कोणत्या पद्धती उपलब्ध आहेत हे जाणून घेण्यासाठी JW लायब्ररी ॲप किंवा jw.org/mr उघडा आणि सर्वात खाली असलेल्या “दान” या टॅबवर क्लिक करा.

९. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) बायबलमधून शिकू या! भाग १४ ची प्रस्तावना आणि पाठ ९४-९५

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ७१ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा