८-१४ जून
यिर्मया ४-६
गीत ५६ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. आध्यात्मिक रीत्या आजारी असलेल्या यहूदाच्या उदाहरणातून इशारा घ्या
(१० मि.)
यहूदाचे लोक हट्टी आणि बंडखोर होते (यिर्म ४:४, १४; टेहळणी बुरूज१३ ३/१५ ९-१० ¶८-९)
यहोवाने त्यांची चूक दाखवून दिली पण ते त्याचं ऐकायला तयार नव्हते (यिर्म ५:३१)
यहोवाच्या बोलण्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही म्हणून त्यांच्यावर संकटं आली (यिर्म ६:१७-१९)
यावर विचार करा: ‘मी आध्यात्मिक रीत्या आजारी पडायचं कसं टाळू शकतो?’
गंभीर आजार झाल्यावर आपल्याला नेमकं काय झालंय हे डॉक्टरांनी लवकरात लवकर शोधून काढावं असं आपल्याला वाटतं. त्यामुळे वेळेत आपल्याला योग्य तो उपचार मिळू शकतो. त्याच प्रकारे, गरज पडल्यावर आपल्याला यहोवासोबतचं आपलं बिघडलेलं नातं लवकरात लवकर सुधारणं महत्त्वाचं आहे, नाही का?
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
यिर्म ४:१०—यहोवाने कोणत्या अर्थाने त्याच्या लोकांना फसवलं? (टेहळणी बुरूज०७ ४/१ ९ ¶३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) यिर्म ५:१-११ (शिकवणे अभ्यास ५)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(२ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ३)
५. संभाषण सुरू करण्यासाठी
(२ मि.) घरोघरचं साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ३)
६. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. बायबल भरवशालायक आहे की नाही याबद्दल समोरची व्यक्ती शंका व्यक्त करते. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ३)
७. विश्वासाबद्दल समजावून सांगणं
(३ मि.) प्रात्यक्षिक. यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्न, लेख ५—विषय: यहोवाच्या साक्षीदारांना त्यांचे हे नाव कसे मिळाले? (शिकवणे अभ्यास ७)
गीत ६०
८. चुकीच्या माहितीपासून सावध राहा
(८ मि.) चर्चा.
प्राचीन काळात इस्राएलमध्ये खोटे संदेष्टे आणि द्रष्टे गोडगोड बोलून चुकीची माहिती पसरवायचे. (यश ३०:१०; यिर्म ५:३१) आजसुद्धा हीच गोष्ट खरी आहे. खोटी माहिती पसरवणारे ती लोकांना आवडेल अशा प्रकारे त्यांच्यासमोर मांडतात. मग तुम्ही कसं सावध राहू शकता?
चुकीच्या माहितीचा महापूर—जरा जपून! हा व्हिडिओ दाखवा मग भाऊबहिणींना विचारा:
चुकीची माहिती घातक का असू शकते?
‘डीपफेक टेक्नोलॉजी’ म्हणजे काय आणि त्याबद्दल आपल्याला माहिती का असली पाहिजे?
एखादी माहिती खरी आहे की नाही याची आपण पारख कशी करू शकतो?—ईयोब १२:११
यावर विचार करा: ‘मी मानत असलेल्या गोष्टी खऱ्या आहेत असं सांगणाऱ्या माहितीवरच मी भरवसा ठेवतो का? की मी त्या माहितीवर भरवसा ठेवण्याआधी त्याची नीट पारख करतो?’
आपण आधी शोधलेली किंवा आपल्याला आवडणारी माहितीच सहसा इंटरनेट आणि सोशल मिडिया आपल्याला दाखवत असतं. त्यामुळे तुम्हाला कदाचित आणखी लक्ष देऊन भरवशालायक माहिती शोधावी लागेल.
९. मंडळीच्या गरजा
(७ मि.)
१०. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ९२-९३