१-७ जून
यिर्मया १-३
गीत ८४ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
यरुशलेममध्ये खोटी उपासना करणाऱ्यांना यिर्मया यहोवाच्या न्यायदंडाचा संदेश सांगतो
१. “तू घाबरू नकोस, कारण . . . ‘मी तुझ्यासोबत आहे’”
(१० मि.)
[यिर्मया पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
यिर्मयासारखंच काहींना प्रचार करायला भीती वाटते किंवा ते आपल्याला जमणार नाही असं वाटतं (यिर्म १:६)
यहोवा त्याची इच्छा पूर्ण करायला आपल्याला ताकद देतो आणि मदत करतो (यिर्म १:८, ९; टेहळणी बुरूज१० १/१५ ९ ¶७-८)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
यिर्म २:२८—अविश्वासू यहुद्यांना यहोवाने जे म्हटलं त्यावरून आपण काय शिकतो? (टेहळणी बुरूज२३.०७ १५ ¶४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) यिर्म ३:१४-२५ (शिकवणे अभ्यास १२)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. अलीकडच्याच घटनेचा उल्लेख करून संभाषण सुरू करा. मग समोरच्या व्यक्तीला ज्याबद्दल काळजी आहे त्याबद्दल बायबलमधून एखादं वचन दाखवा. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ५)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. बायबल अभ्यास सुरू करायची इच्छा आहे का ते विचारा. (शिष्य बनवा धडा ८ मुद्दा ३)
६. शिष्य बनवण्यासाठी
(५ मि.) प्रगती न करणाऱ्या बायबल विद्यार्थ्यासोबत चर्चा. (शिष्य बनवा धडा १२ मुद्दा ५)
गीत ७६
७. यिर्मयासारखं धाडसी बना
(६ मि.) चर्चा.
चला यहोवाच्या मित्रांकडून शिकू या—यिर्मया हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:
यिर्मया यहोवाचा मित्र कसा बनला?—यिर्म १:६-८
तुम्हाला यहोवाबद्दल कोणाला सांगायचंय?
त्यांनी यहोवाचे मित्र बनावं म्हणून तुम्ही त्यांना काय सांगू शकता?
८. आपल्या आशेबद्दल विचारल्यावर सौम्यतेने आणि मनापासून आदर दाखवून उत्तर द्या
(९ मि.) चर्चा.
आनंदाचा संदेश सांगताना आणि यहोवाच्या नैतिक स्तरांची बाजू मांडताना आपण धाडस दाखवलं पाहिजे. पण त्यासोबतच आपण इतर ख्रिस्ती गुण दाखवणंही गरजेचं आहे.
१ पेत्र ३:१५ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:
आपल्या विश्वासाबद्दल समजावताना इतर कोणते गुण महत्त्वाचे आहेत?
हे गुण इतके महत्त्वाचे का आहेत?
“खऱ्या नीतिमत्त्वामुळे शांती नांदेल.” हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:
समलैंगिकतेबद्दल आपण काय मानतो ते आदराने समजावण्याबद्दल तुम्हाला या व्हिडिओतून काय शिकायला मिळालं?
लक्षात ठेवा: यहोवाच्या नैतिक स्तरांची बाजू मांडताना राजकीय वादविवादांमध्ये पडू नका.—योह १८:३६.
९. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ९०-९१