२५-३१ मे
यशया ६५-६६
गीत २४ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. आध्यात्मिक नंदनवनावर आपलं प्रेम आहे!
(१० मि.)
आध्यात्मिक नंदनवनात देवाच्या सेवकांना भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्न मिळत आहे (यश ६५:१३; टेहळणी बुरूज२४.०४ २१ ¶५)
आध्यात्मिक नंदनवनामुळे आपल्याला दुःख सहन करायला आणि समस्यांना तोंड द्यायला मदत होते (यश ६५:१४-१७; टेहळणी बुरूज२४.०४ २२ ¶९-१०)
आपल्याकडे असलेल्या शांतीची आणि सुरक्षेची तुलना जगातल्या कोणत्याच गोष्टीशी करता येणार नाही (यश ६५:२५; टेहळणी बुरूज२४.०४ २३ ¶१३)
अर्थ: “आध्यात्मिक नंदनवन” हे शब्द अशा वातावरणाला सूचित करतात, जिथे आपण यहोवाची उपासना करतो. या आध्यात्मिक नंदनवनात आपण यहोवा आणि इतरांसोबत शांतीचे नातेसंबंध अनुभवतो.
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
यश ६६:२४—गेहेन्नाबदल येशूने मार्क ९:४७, ४८ मध्ये जे सांगितलं ते समजून घ्यायला या वचनामुळे कशी मदत होते? (टेहळणी बुरूज०८ ६/१५ २७ ¶४-५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) यश ६५:१७-२५ (शिकवणे अभ्यास १०)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. समोरच्याला सहज बोलता-बोलता सांगा, की तुम्ही एक यहोवाचे साक्षीदार आहात. (शिष्य बनवा धडा ५ मुद्दा ३)
५. संभाषण सुरू करण्यासाठी
(२ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. समोरच्या व्यक्तीला तुमच्यासोबत वाद घालायचा आहे. (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ५)
६. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. पत्रिकेचा वापर करून संभाषण सुरू करा. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ४)
७. विश्वासाबद्दल समजावून सांगणं
(३ मि.) प्रात्यक्षिक. बायबलमधून प्रश्नांची उत्तरं, लेख ८७—विषय: ख्रिस्तविरोधी कोण आहे? (शिकवणे अभ्यास १७)
गीत ८०
८. तुम्ही काही गमावत आहात का?
(१५ मि.) चर्चा.
‘मी पूर्ण वेळेची सेवा सुरू करू की नको’, असा प्रश्न कधी तुमच्या मनात आला आहे का? समजा ती सुरू केली तर जीवनातल्या बऱ्याच गोष्टी गमवाव्या लागतील अशी चिंता तुम्हाला वाटते का? किंवा तुमच्या मनात असा विचार आला आहे का, की ‘यहोवाच्या सगळ्या सेवकांना सर्वकाळाचं जीवन मिळणार आहे तर सेवा वाढवण्यासाठी आणखी त्याग करायची काय गरज?’ असे प्रश्न तुमच्या मनात आले असतील तर नेहमी लक्षात असू द्या की यहोवावर भरवसा ठेवणाऱ्यांपासून तो “कोणतीही चांगली गोष्ट राखून ठेवणार नाही.” (स्तो ८४:११, १२) जेव्हा आपण स्वतःला यहोवाला सर्वात चांगलं ते देण्यापासून रोखतो तेव्हा खरंतर आपण बऱ्याच चांगल्या गोष्टी गमावत असतो.
यहोवा फक्त भविष्यातच नाही तर आजही आपल्याला बरेच आशीर्वाद देतो. “आनंदाच्या संदेशासाठी” तुम्ही कायकाय कराल? हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:
यहोवाची आणखी जास्त सेवा करायचा निर्णय घेतल्यामुळे या तरुणांना कोणते आशीर्वाद मिळाले?
पूर्ण वेळेची सेवा करायची तुमची परिस्थिती नसेल तेव्हा काय? लक्षात असू द्या यहोवाला सर्वात चांगलं ते देणाऱ्यांना तो आशीर्वाद देतो. त्यामुळे नेहमी यहोवाला सर्वात चांगलं ते देत राहा. कारण आपल्याला माहीत आहे, की “काहीच कमी पडणार नाही इतक्या आशीर्वादांचा वर्षाव” यहोवा आपल्यावर करेल.—मला ३:१०.
९. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ८८-८९