२२-२८ डिसेंबर
यशया ११-१३
गीत १४ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. मसीहा कसा असणार होता?
(१० मि.)
तो इशायचा मुलगा दावीद याच्या वंशातून येणार होता (यश ११:१; यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. १३ ¶४-५; टेहळणी बुरूज११ १०/१ ५ ¶१)
त्याच्यावर यहोवाची पवित्र शक्ती असणार होती आणि त्याला यहोवाचं भय असणार होतं (यश ११:२, ३क; यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. १३ ¶६, ¶८; टेहळणी बुरूज२३.०६ १५ ¶५)
तो नीतीने आणि दयेने न्याय करणार होता (यश ११:३ख-५; यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. १३ ¶९, ¶११)
यावर मनन करा: कोणत्याही मानवी शासकापेक्षा येशू श्रेष्ठ का आहे?
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
यश ११:१०—ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? (आयझयाज प्रॉफसी-१ अध्या. १३ ¶१६-१८-mwbr)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) यश ११:१-१२ (शिकवणे अभ्यास ११)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ५)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. समोरच्या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर jw.org या वेबसाईटचा वापर करून द्या. (शिष्य बनवा धडा ८ मुद्दा ३)
६. शिष्य बनवण्यासाठी
(५ मि.) तुमच्यासोबत घरोघरचं साक्षकार्य करण्यासाठी तुमच्या विद्यार्थ्याला तयारी करायला मदत करा. (शिष्य बनवा धडा ११ मुद्दा ४)
गीत ५७
७. तुम्ही “खरेपणाने न्याय” करता का?
(१५ मि.) चर्चा.
आपण दररोज लोकांबद्दल मत बनवत असतो. काही वेळा तर हे अगदी नकळत होतं. वरवर जे दिसतं त्यावरून आपण असं करत असतो. पण आपला आदर्श, येशू असं करत नाही. (यश ११:३, ४) येशू लोकांची मनं पाहू शकतो. तो त्यांच्या मनातले विचार, हेतू आणि त्यांची विचार करायची पद्धत समजू शकतो. आपल्याकडे ही क्षमता नसली तरी आपण येशूचं अनुकरण करायचा होता होईल तितका प्रयत्न करू शकतो. त्याने म्हटलं: “वरवर दिसणाऱ्या गोष्टींच्या आधारावर न्याय करायचं सोडून द्या आणि खरेपणाने न्याय करा.”—योह ७:२४.
आपण जर वरवर दिसणाऱ्या गोष्टींच्या आधारावर इतरांबद्दल मत बनवलं, तर आपल्याला चांगल्या प्रकारे प्रचार करता येणार नाही आणि सेवाकार्यातला आपला आवेश कमी होईल. आपल्या क्षेत्रातले लोक वेगळ्या संस्कृतीचे किंवा धर्माचे आहेत म्हणून त्यांना प्रचार करायला आपण कचरतो का? आपल्या क्षेत्रातले लोक खूप श्रीमंत किंवा खूप गरीब असतील तर काय? समोरच्या व्यक्तीला बघून ती आपलं ऐकून घेणार नाही असा आपण विचार करतो का? आपण हे कधीही विसरू नये, की “सर्व प्रकारच्या लोकांचं तारण व्हावं आणि त्यांना सत्याचं अचूक ज्ञान मिळावं” अशी देवाची इच्छा आहे.—१ती २:४.
टेहळणी बुरूज मधले धडे—वरवर पाहून इतरांबद्दल मत बनवू नका हा व्हिडिओ दाखवा आणि भाऊबहिणींना विचारा:
व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कोणकोणत्या गोष्टींमुळे भेदभाव होऊ शकतो?
भेदभाव करायची वृत्ती जर मंडळीतल्या भाऊबहिणींमध्ये आली तर मंडळीवर कसा परिणाम होऊ शकतो?
वरवर पाहून मत बनवायची वृत्ती टाळायला व्हिडिओतल्या भाऊबहिणींना कशामुळे मदत झाली?
या टेहळणी बुरूज लेखातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ४६-४७