वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb25 नोव्हेंबर पृ. १०-११
  • ८-१४ डिसेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ८-१४ डिसेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
mwb25 नोव्हेंबर पृ. १०-११

८-१४ डिसेंबर

यशया ६-८

गीत ७५ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यशया वर स्वर्गाकडे पाहत आहे आणि देवाच्या वतीने बोलायला तयार आहे.

१. “मी जाईन! मला पाठव!”

(१० मि.)

देवाच्या वतीने बोलण्यासाठी यशया लगेच पुढे आला (यश ६:८; टेहळणी बुरूज१७.०४ २९ ¶५)

यशयाचं काम सोपं असणार नव्हतं (यश ६:९, १०; टेहळणी बुरूज०९ ३/१५ २९ ¶५)

जसं बऱ्‍याच लोकांनी यशयाचं ऐकलं नाही, तसंच ते येशूचंही ऐकणार नव्हते (मत्त १३:१३-१५; यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. ८ ¶२३; टेहळणी बुरूज१४ १२/१५ ६ ¶२)

यशया बाजारात इस्राएली लोकांना यहोवाचा संदेश सांगत आहे. काही जण दुर्लक्ष करतात तर काही जण रागाने निघून जातात.

यावर मनन करा: पुढे येऊन सेवा करण्याच्या बाबतीत मला यशयाचं अनुकरण कसं करता येईल?

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • यश ७:३, ४—दुष्ट राजा आहाजचा जीव वाचवण्यासाठी यहोवा का तयार होता? (टेहळणी बुरूज०६ १२/१ १३ ¶४)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) यश ८:१-१३ (शिकवणे अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. शिष्य बनवा माहितीपत्रकातल्या ‘आणखी माहिती—क’ यात दिलेल्या एखाद्या बायबल सत्याबद्दल सांगा. (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ५)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. बायबल अभ्यास सुरू करायची इच्छा आहे का ते विचारा. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ३)

६. पुन्हा भेटण्यासाठी

(५ मि.) घरोघरचं साक्षकार्य. बायबल अभ्यास कसा केला जातो ते दाखवा. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ५)

ख्रिस्ती जीवन

गीत ८३

७. घरोघरचं प्रचारकार्य—आपली ओळख

(१५ मि.) चर्चा.

येशूसारखं आणि पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांसारखं आज यहोवाचे साक्षीदार घरोघरचं प्रचारकार्य करतात आणि त्यासाठी त्यांना ओळखलं जातं.—लूक १०:५; प्रेका ५:४२.

पण कोव्हिड-१९ महामारीच्या काळात आपल्याला घरोघरचं साक्षकार्य काही काळासाठी थांबवावं लागलं होतं. त्यामुळे आपण अनौपचारिक साक्षकार्य, पत्रलेखन आणि टेलिफोन साक्षकार्य करून प्रचार करत होतो. प्रचारकार्याच्या या पद्धती नक्कीच खूप चांगल्या आहेत. आणि त्या काळात या पद्धती वापरून साक्ष द्यायचं कौशल्यं वाढवण्याची चांगली संधी आपल्याला मिळाली. पण तरीही घरोघरचं प्रचारकार्य हा साक्ष द्यायचा आपला सगळ्यात मुख्य मार्ग आहे. तर मग तुम्ही नियमितपणे घरोघरच्या प्रचारकार्यात सहभाग घेऊ शकता का?

घरोघरच्या प्रचारकार्यामुळे पुढे सांगितलेल्या गोष्टी करायला आपल्याला कशी मदत होते?

  • आपल्या प्रचाराच्या क्षेत्रात पूर्णपणे साक्ष द्यायला

  • आपलं शिकवण्याचं कौशल्य वाढवायला, तसंच भेदभाव न करता, निःस्वार्थ मनोवृत्तीने आणि धैर्याने साक्ष द्यायला

  • बायबल अभ्यास सुरू करायला

“हवामान कसंही असो, प्रचार करत राहू या” या व्हिडिओतलं एक दृश्‍य. दोन बहिणी एका स्त्रीच्या घरासमोर उभं राहून तिच्याशी बोलत आहेत.

हवामान कसंही असो, प्रचार करत राहू या हा व्हिडिओ दाखवा आणि मग भाऊबहिणींना विचारा:

  • फेरो बेटांवर प्रचार करणाऱ्‍यांच्या निःस्वार्थ मनोवृत्तीवरून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ४२-४३

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १२३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा