१०-१६ नोव्हेंबर
गीतरत्न ३-५
गीत ३१ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. खऱ्या सौंदर्याचं महत्त्व
(१० मि.)
शुलेमच्या मुलीचं खरं सौंदर्य तिच्या बोलण्यातून दिसून आलं (गीत ४:३, ११; टेहळणी बुरूज१५ १/१५ ३० ¶८)
ती नैतिकतेबद्दल असलेल्या यहोवाच्या स्तरांप्रमाणे चालत असल्यामुळे त्याने तिची तुलना एका सुंदर बागेशी केली (गीत ४:१२; टेहळणी बुरूज०० ११/१ ११ ¶१७)
शारीरिक सौंदर्यापेक्षा सुंदर गुण असणं, चांगला स्वभाव असणं जास्त महत्त्वाचंय, आणि असं सौंदर्य विकसित करणं सगळ्यांनाच शक्य आहे (सावध राहा!०४ १२/२२ ९ ¶२-५-mwbr)
यावर विचार करा: ‘इतरांमधले कोणते गुण मला जास्त आवडतात?’
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
गीत ३:५—शुलेमच्या मुलीने यरुशलेमच्या मुलींना “रानातल्या हरणांची आणि हरिणींची” शपथ का घातली? (टेहळणी बुरूज०६ १२/१ ४ ¶४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) गीत ४:१-१६ (शिकवणे अभ्यास २)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालकाला बायबल अभ्यास करायला आवडेल का असं थेट विचारा. (शिष्य बनवा धडा ६ मुद्दा ४)
५. संभाषण सुरू करण्यासाठी
(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. jw.org या वेबसाईटवर स्वतःच्या भाषेत माहिती कशी शोधायची ते समोरच्या व्यक्तीला दाखवा. (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ३)
६. भाषण
(५ मि.) बायबलमधून प्रश्नांची उत्तरं लेख १३१—विषय: मेकअप करण्याबद्दल आणि दागदागिने घालण्याबद्दल बायबल काय म्हणतं? (शिकवणे अभ्यास १)
गीत ३६
७. फक्त प्रभूमध्ये लग्न करा (उत्प २८:२)
(८ मि.)
८. चांगला पती किंवा पत्नी बनण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
(७ मि.) चर्चा.
तुम्ही एक चांगला जोडीदार शोधताय का? लग्न करायची इच्छा असलेली एखादी व्यक्ती तुम्हाला पाहते तेव्हा तिला तुमच्यामध्ये चांगले ख्रिस्ती गुण दिसतात का? एखादी व्यक्ती खूप आध्यात्मिक असल्याचं कदाचित सुरुवातीला दाखवेल. पण जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये तिचं निरीक्षण कराल तेव्हा ती खरोखर कशी आहे हे तुम्हाला समजेल.
एका आध्यात्मिक व्यक्तीमध्ये कोणते गुण असले पाहिजेत ते खाली दिलं आहे. या गुणांबद्दल सांगणारं एखादं शास्त्रवचन त्याखाली लिहा.
यहोवावर प्रेम आणि विश्वास
मस्तकपद चालवायची किंवा त्याआधीन राहायची क्षमता
निःस्वार्थ मनोवृत्ती आणि आत्मत्यागी प्रेम
योग्य निवड करायची क्षमता, संतुलित दृष्टिकोन आणि समजूतदारपणा
मेहनती आणि कष्टाळू
९. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ३४-३५