३-९ नोव्हेंबर
गीतरत्न १-२
गीत १३२ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. खऱ्या प्रेमाची गोष्ट
(१० मि.)
[गीतरत्न पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
शलमोनने शुलेमच्या मुलीची भरभरून प्रशंसा केली आणि तो तिला सोन्याचांदीचे दागिने देईल असं म्हणाला (गीत १:९-११)
शुलेमच्या मुलीचं मेंढपाळ असलेल्या तिच्या प्रियकरावर खरं प्रेम होतं म्हणून ती त्याला विश्वासू राहिली (गीत २:१६, १७; टेहळणी बुरूज१५ १/१५ ३० ¶९-१०)
टीप: गीतरत्न पुस्तक वाचताना नवे जग भाषांतर यात दिलेली “पुस्तकाची रूपरेषा” पाहा, म्हणजे कोण बोलत आहे हे तुम्हाला समजेल.
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
गीत २:७—अविवाहित भाऊबहिणींसाठी शुलेमच्या मुलीचं एक चांगलं उदाहरण आहे असं का म्हणता येईल? (टेहळणी बुरूज१५ १/१५ ३१ ¶११)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) गीत २:१-१७ (शिकवणे अभ्यास १२)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. शिष्य बनवा माहितीपत्रकातल्या ‘आणखी माहिती—क’ यात दिलेल्या एखाद्या बायबल सत्याबद्दल सांगा. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ३)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. शिष्य बनवा माहितीपत्रकातल्या ‘आणखी माहिती—क’ यात दिलेल्या एखाद्या बायबल सत्याबद्दल सांगा. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ३)
६. शिष्य बनवण्यासाठी
गीत ४६
७. “उदार माणसाला आशीर्वाद मिळेल”
(१५ मि.) हा भाग एखाद्या वडिलांनी हाताळावा.
आपण जेव्हा उदारपणे आपला वेळ आणि साधनसंपत्ती इतरांसाठी खर्च करतो तेव्हा आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळतात. हे खरंय, की ज्यांच्यासाठी आपण हे करतो त्यांना यामुळे खूप आनंद होतो. पण त्यासोबतच आपल्यालाही आनंद होतो. (नीत २२:९) कारण आपल्याला माहीत असतं, की आपण आपल्या निर्माणकर्त्याचं अनुकरण करत आहोत आणि त्याचं मन आनंदी करत आहोत.—नीत १९:१७; याक १:१७.
उदारता दाखवल्यामुळे आनंद होतो हा व्हिडिओ दाखवा मग भाऊबहिणींना विचारा:
जगभरातल्या भाऊबहिणींनी दाखवलेल्या उदारतेमुळे व्हिडिओत दाखवलेल्या भाऊबहिणींना कशा प्रकारे आनंद झाला?
इतरांना उदारतेने दिल्यामुळेसुद्धा या भाऊबहिणींना कसा आनंद झाला?
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ३२-३३